Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

रेल्वेगाड्या सुरक्षितपणे चालविण्यासाठी खबरदारी, कोकण रेल्वेद्वारे रुळांवर गस्त पावसाळी!

June 4, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
Konkan Railway

मुक्तपीठ टीम

कोकण भागात पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडतो. कोकण रेल्वेने आपल्या ७४० किलोमीटर मार्गावर नियोजित सुरक्षिततेची कामे पूर्ण केली असून ती आता पावसाळ्यासाठी सज्ज झाली आहे. कोकण रेल्वे गाड्या पावसाळ्यात सुरक्षितपणे चालवता याव्यात, यासाठी कोकण रेल्वे आवश्यक ती सर्व काळजी घेणे सुरू करणार आहे. सुमारे ८४६ कर्मचारी पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावर गस्त घालतील.असुरक्षित ठिकाणी चोवीस तास गस्त घातली जाईल, चोवीस तास सुरक्षारक्षक तैनात केले जातील. तसेच या ठिकाणी वेगावर निर्बंध घातले जातील. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत जलद हालचाल करण्यासाठी, उत्खनन केलेल्या ठिकाणी बीआर एन(BRN) बसविण्यात येतील.

पाणलोटाच्या जागांची साफसफाई, खोदकाम केलेल्या ठिकाणांची तपासणी याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे.गेल्या काही वर्षांमध्ये रेल्वे मार्गावर मोठ्या प्रमाणात भू-सुरक्षा कार्ये राबविली गेल्याने दरड पडण्याच्या आणि माती खचण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाली आहे, त्यामुळे गाड्या सुरक्षितपणे चालवल्या जात आहेत. गेल्या ९ वर्षांत पावसाळ्यात दरड कोसळल्यामुळे रेल्वेसेवेत कोणताही मोठा व्यत्यय आलेला नाही.

मुसळधार पाऊस पडल्यास दृश्यमानता मर्यादित असताना रेल्वेगाड्या चालकांना ताशी ४० किमीच्या पेक्षा कमी वेगाने गाड्या चालवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. रत्नागिरी आणि वेर्णा येथे ऑपरेशन थिएटर आणि आपत्कालीन वैद्यकीय मदतीची तरतूद असलेली स्वयंचलित अपघात निवारण वाहने (सेल्फ-प्रोपेल्ड एआरएमव्ही) सज्ज ठेवण्यात आली आहेत. वेर्णा येथे अपघात निवारण गाडी(एआरटी,ॲक्सिडेंट रिलीफ ट्रेन) देखील सज्ज ठेवण्यात आली आहे.

सर्व सुरक्षा श्रेणी कर्मचार्‍यांना आपत्कालीन परिस्थितीत नियंत्रण कार्यालय/स्थानकाशी संपर्क साधण्यासाठी मोबाईल फोन प्रदान करण्यात आले आहेत. दोन्ही लोको पायलट आणि गार्डना वॉकी-टॉकी सेट प्रदान करण्यात आले आहेत तसेच कोकण रेल्वेवरील प्रत्येक स्थानकावर २५ वॅटचे व्हीएच एफ(VHF) बेस स्टेशन बसवले आहे, ज्याद्वारे रेल्वेतील कर्मचारी आणि स्टेशन मास्टर यांच्यात वायरलेस संभाषण होऊ शकते. कोकण रेल्वे मार्गावर सरासरी १ किमी अंतरावर इमर्जन्सी कम्युनिकेशन (EMC) सॉकेट्स (आपत्कालीन संभाषणासाठी बटणे)प्रदान केले गेले आहेत जे गस्तीवर असलेले वॉचमन, लोको पायलट, गार्ड आणि इतर फिरत्या देखभाल कर्मचार्‍यांना कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत स्टेशन मास्टर आणि नियंत्रण कार्यालयाशी संपर्क साधण्यास मदत करु शकतील. आपत्कालीन संपर्कासाठी एआरएमव्ही (ॲक्सिडेंट रिलीफ मेडिकल व्हॅन) मध्ये सॅटेलाईट फोन संपर्क प्रदान करण्यात आला आहे. सिग्नल दृश्यमानता सुधारण्यासाठी कोकण रेल्वेवरील सर्व मुख्य सिग्नल आता एलईडीने बदलले आहेत.

९ स्थानकांवर स्वतः नोंदणी करु शकतील असे,(सेल्फ रेकॉर्डिंग) पर्जन्यमापक बसवण्यात आले आहेत,जे माणगाव, चिपळूण, रत्नागिरी, विलवडे, कणकवली, मडगाव, कारवार, भटकळ आणि उडुपी या प्रदेशातील पावसाची नोंद करतील आणि पावसाचा जोर वाढल्यास अधिकाऱ्यांना सतर्क करतील.तीन ठिकाणी पुलांसाठी पूराची सूचना देणारी चेतावणी प्रणाली बसवण्यात आली आहे,जी काळी नदी (माणगाव आणि वीर दरम्यान), सावित्री नदी (वीर आणि सापे वामणे दरम्यान), वशिष्ठी नदी (चिपळूण आणि कामठे दरम्यान) याठिकाणी पाण्याचा प्रवाह धोक्याच्या पातळीपेक्षा जास्त झाल्यास अधिकाऱ्यांना सतर्क करेल. वाऱ्याच्या वेगाचे निरीक्षण करण्यासाठी पानवल मार्ग (रत्नागिरी आणि निवासर दरम्यान), मांडवी पूल (थिविम आणि करमाळी दरम्यान), झुआरी पूल (करमाळी आणि वेर्णा) आणि शरावती पूल (होन्नावर आणि मानकी दरम्यान) या चार ठिकाणी ॲनिमोमीटर बसवण्यात आले आहेत.

बेलापूर, रत्नागिरी आणि मडगाव येथील नियंत्रण कक्ष, गाड्या सुरक्षितपणे चालवण्यासाठी पावसाळ्यात २४ x ७ काम करतील. हे पावसाळी वेळापत्रक १० जून २०२२ पासून ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत लागू असेल.प्रवासी पावसाळ्यात www.konkanrailway.com या संकेतस्थळावर भेट देऊन किंवा Google Play Store वरून KRCL ॲप डाउनलोड करून किंवा १३९ डायल करून ऑनलाइन पद्धतीने गाडीची स्थिती तपासू शकतात.


Tags: good newsKonkan RailwayKonkan Railway SecuritymuktpeethPatrol on the tracksrainy seasonTrainsकोकण रेल्वेकोकण रेल्वे सुरक्षाचांगली बातमीमुक्तपीठरुळांवर गस्त पावसाळीरेल्वेगाड्या
Previous Post

एका तरुणीच्या स्वत:शीच लग्नाची गोष्ट! समजून घ्या सोलोगामीचा ट्रेंड नेमका कसा…

Next Post

खेलो इंडियात महाराष्ट्राच्या मुला-मुलींच्या कबड्डी संघांची विजयी सलामी

Next Post
khelo india 2022: maharashtra boy girls kabaddi teams victory over andhra & jharkhand

खेलो इंडियात महाराष्ट्राच्या मुला-मुलींच्या कबड्डी संघांची विजयी सलामी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!