मुक्तपीठ टीम
सूर्याशिवाय मानवी जीवनाची कल्पनाच करता येत नाही. मुळात सूर्य नसता तर काहीच नसतं. पाण्याप्रमाणेच प्रकाश हेही मनुष्यासाठी जीवनावश्यक आहे. मानवी शरीर, निसर्ग, प्राणी, पक्षी या सर्वांनाच सूर्यप्रकाश महत्त्वाचा आहे. असं असलं तरीही पृथ्वीवरील काही ठिकाणे अशी आहेत की जिथे सूर्याचा प्रकाशच पोहचत नाही. उत्तर इटलीतील विग्नेला गाव त्यापैकीच एक. त्या गावात हिवाळ्यात सूर्यप्रकाशच नसल्याने गावकऱ्याने मस्त डोकं लढवलं आणि हिवाळ्यात गावाने सूर्यप्रकाशासाठी स्वतःचा ‘सूर्य’ बनवला आहे.
गावात ८३ दिवस सूर्यप्रकाश नाही!
इटलीतील या गावात हिवाळ्यात ८३ दिवस सूर्यप्रकाश मिळत नाही. त्यामुळे गावात पर्यटक कमी येत. गावातीव व्यवहारांवरही त्याचा परिणाम होत असे. त्यामुळे मग नैसर्गिक सूर्यप्रकाश थेट मिळत नसेल तर तोच प्रकाश परावर्तित करुन मिळवण्याची कल्पना पुढे आली.
इटलीतील गावाला मिळाला ‘सूर्य’
- इटलीतील विग्नेलाचे उपमहापौर, पिअर फ्रँको मिडाली यांनी गावात सूर्यप्रकाश आणण्याचा निर्णय घेतला.
- त्यांना गावात पर्यटकांची गजबज पाहिजे होती. त्यासाठीच त्यांनी आपल्या छोट्याशा गावाला कृत्रिम ‘सूर्य’ दिला.
- डोंगराच्या माथ्यावर बसवलेला एक महाकाय आरसा शहराच्या चौकात सूर्यप्रकाश पसरवतो, ज्यामुळे गावकऱ्यांना हिवाळ्यातही सूर्य दिसू शकतो.
- त्यामुळे कृत्रिम सूर्यवाले हे गाव जगभर चर्चेचा विषय झाला.
लक्षावधीच्या खर्चिक प्रकल्पातून अवतरला कृत्रिम सूर्य!
- डोंगराच्या माथ्यावर एक मोठा आरसा आहे, ज्यातून सूर्यप्रकाश परावर्तित होऊन गावात पोहोचतो.
- गावात सुमारे २०० लोक राहतात.
- या कृत्रिम सूर्यापासून त्यांना सुमारे ६ तास प्रकाश मिळतो.
- या प्रकाशामुळेच लोक हिवाळ्यात घराबाहेर पडतात आणि एकमेकांना भेटू शकतात.
- ज्या विशाल काचेतून सूर्यप्रकाश गावात पोहोचतो, त्याचे वजन १.१ टन आहे.
- हे आरसे संगणकाच्या मदतीने चालवले जाते.
- हा पदार्थ ९५ टक्के सूर्यप्रकाश बदलतो.
- या प्रकल्पाचा खर्च १ लाख युरो आहे.
- या प्रकल्पाला खूप खर्च आला.