Monday, May 19, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

उच्च शैक्षणिक क्षेत्रातील सर्वंकष क्रमवारीत देशात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक!

पहिल्या दहामध्ये मुंबई आयआयटीचा तिसरा क्रमांक

July 17, 2022
in featured, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
India Ranking-2022

मुक्तपीठ टीम

उच्च शैक्षणिक क्षेत्रातील सर्वंकष १०० उत्कृष्ट संस्थांमध्ये महाराष्ट्राच्या १२ शैक्षणिक संस्थांच्या समावेशसह देशात राज्याने दुसऱ्या क्रमांक पट‍काविला आहे. यासह प्रथम दहामध्ये मुंबई आयआयटी तिसऱ्या क्रमांकावर आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने ‘इंडिया रँकिंग -२०२२’ हा कार्य‍क्रम इंडिया हॅबीटेट सेंटरच्या स्टेन सभागृहात आयोजित करण्यात आला. केंद्रीय शिक्षण मंत्री धमेंद्र प्रधान, केंद्रीय उच्च शिक्षण सचिव के. संजय मुर्ती, युजीसीचे अध्यक्ष एम. जे. कुमार तसेच शिक्षण क्षेत्रातील वरिष्ठ मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. यावेळी केंद्रीय मंत्री श्री. प्रधान यांनी उच्च शिक्षण क्षेत्रातील सर्वंकष क्रमवारी तसेच उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध ९ अभ्यासक्रमांची श्रेणी  ‘इंडिया रँकिंग-२०२२’ ची यादी जाहीर केली.

या कार्यक्रमात प्रत्येक श्रेणीतील प्रथम तीन संस्थांना प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. उच्च शिक्षण क्षेत्रातील सर्वंकष १०० उत्कृष्ट संस्थांमध्ये राज्याचा दुसरा क्रमांक आहे. प्रथम क्रमांकांवर तामिळनाडूतील १८ उच्च शैक्षणिक संस्थांचा समोवश आहे. प्रथम १०० उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये राज्यातील १२ संस्था आहेत. यामध्ये तिस-या क्रमांकावर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई (आयआयटी), २५ व्या क्रमांकावर सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ, २६ व्या क्रमांकावर भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था पुणे, 28 व्या क्रमांकावर इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई, ३३ व्या क्रमांकावर होमी भाभा राष्ट्रीय संस्था, मुंबई, ६२ व्या क्रमांकावर सिम्बायोसिस इंटरनॅशनल, पुणे, ६८ व्या क्रमांकावर विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर, ७६ व्या क्रमांकावर  डॉ.डी वाय पाटील विद्यापीठ, पुणे, ८१ व्या क्रमाकांवर मुंबई विद्यापीठ, मुंबई, ८९ व्या क्रमांकावर एसव्हीकेएम नरसी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, मुंबई, ९२ व्या क्रमांकावर दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, वर्धा, ९९ व्या क्रमांकावर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई या महाराष्ट्रामध्ये असणा-या संस्था पहिल्या १०० सर्वोत्कृष्ट संस्थांमध्ये समाविष्ट आहेत.

IIT Bombay

देशभरातील उत्कृष्ट १०० विद्यापीठांमध्ये राज्यातील १३ विद्यापीठांचा समावेश आहे. यामध्ये अनुक्रमे १२, १४, १७, ३२, ४१, ४५, ५१, ५४, ६०, ७३, ७६, ८१ आणि ८३ या क्रमांकांवर आहेत.

उत्‍कृष्ट १०० महाविद्यालयांमध्ये राज्यातील ३ महाविद्यालयांचा समावेश आहे यामध्ये ५७, ६९, ८७ क्रमांकांवर आहेत. उत्कृष्ट ५० संशोधन संस्थांमध्ये राज्यातील ५ संस्थांचा समावेश आहे. यामध्ये ४, ७, ११, १७ आणि २५ या क्रमांकांवर आहेत.

उत्कृष्ट २०० अभियांत्रिकी महाविद्यालय/संस्था/विद्यापीठांमध्ये राज्यातील १७ संस्थांचा समावेश आहे. यामध्ये ३, १८, ३२, ७१, ७२, ११६, ११९, १३१, १३५, १४२, १४६, १६३, १६७, १७२, १८५, १९३ आणि १९७ या क्रमांकांवर आहेत. उत्कृष्ट १०० व्यवस्थापन संस्थांमध्ये राज्यातील 10 संस्थांचा समावेश आहे. यामध्ये ९, ११, १७, २१, २५, ४३, ६८,७१, ९१, आणि ९५ या क्रमांकांवर आहेत.

उत्कृष्ट १०० फॉर्मसी महाविद्यालय/संस्था/ विद्यापीठांमध्ये राज्यातील १६ संस्थांचा समोवश आहे. यामध्ये ७, ११, २१, ३२, ३८, ४१, ४२, ४६, ५३, ६५, ७४, ७६, ८७, ८८, ९० आणि ९९ या क्रमांकांवर आहेत. उत्कृष्ट ५० वैद्यकीय महाविद्यालय/संस्था/विद्यापीठांमध्ये राज्यातील 4 महाविद्यालये/संस्था/ विद्यापीठांचा समावेश आहे. यामध्ये १७, २४, ४२, ४५ क्रमांकांवर आहेत. उत्कृष्ट ४० दंत महाविद्यालय/संस्था/ विद्यापीठांमध्यें राज्यातील ६ महाविद्यालय/संस्था/विद्यापीठांचा समावेश आहे. यामध्ये ३, ९, ११, १७, ३५ आणि ३७ या क्रमांकांवर आहेत.

 उत्कृष्ट ३० विधी महाविद्यालय/संस्था/विद्यापीठांमध्ये राज्यातील एका संस्थेचा समोवश आहे. यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर सिम्बायोसिस लॉ स्कुल, पुणे या संस्थेचा समावेश आहे.  उत्कृष्ट वास्तुकला महाविद्यालय/संस्था/ विद्यापीठांमध्ये राज्यातील ८ व्या क्रमांकावरील विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर, या एका  संस्थेचा समावेश आहे.

या संकेतस्थळावर सविस्तर यादी उपलब्ध आहे.  https://www.nirfindia.org/2022/Ranking.html


Tags: good newshappeningsHigher Education SectorIndia Ranking-2022Maharashtra 2nd rank in countrymuktpeethMumbai IIT 3rd rankइंडिया रँकिंग-२०२२उच्च शैक्षणिक क्षेत्रघडलं-बिघडलंचांगली बातमीदेशात महाराष्ट्र दुसरा क्रमांकमुक्तपीठमुंबई आयआयटी तिसरा क्रमांक
Previous Post

आरोग्य क्षेत्रातील स्टार्टअप्सच्या विकासासह आयटीआयचे सक्षमीकरण, टाटा कम्युनिटी इनिशिएटीव्ह ट्रस्ट आणि इंडिया हेल्थ फंडशी सामंजस्य करार!

Next Post

नववे विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलन मंचर येथे ९ ऑगस्टला होणार 

Next Post
Student-Teacher Literature Conference

नववे विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलन मंचर येथे ९ ऑगस्टला होणार 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!