मुक्तपीठ टीम
वाहन विमा पॉलिसीचा दावा मंजूर झाला नाही तर खराब झालेली कार दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला खिशातून पैसे द्यावे लागतील. विमा तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, विमा कंपन्या तुमच्या कार विम्याचा दावा त्वरीत निकाली काढत नाहीत किंवा नाकारत नाहीत. याची मुख्य कारणं काय आहेत जाणून घ्या.
- जर तुमच्याकडे कार असेल तर त्यासाठी वाहन विमा पॉलिसी बनवणे आवश्यक आहे.
- हे केवळ कोणत्याही प्रकारच्या अपघात, चोरी आणि नुकसानीशी संबंधित खर्चाचा समावेश करत नाही तर तुम्हाला आर्थिक सुरक्षादेखील देतात.
- पॉलिसीच्या अटी नीट समजून घ्या.
- अर्धवट माहिती आणि कोणत्याही प्रकारची चूक यामुळे विमा कंपन्या आपला दावा नाकारु शकतात.
- मोटार वाहन कायद्यांतर्गत व्यावसायिक वाहनांचे विमा संरक्षण आणि कायदे वेगळे आहेत.
- जर तुम्ही तुमची वैयक्तिक कार नियमीतपणे व्यावसायिक हेतूंसाठी वापरत असाल, तर अपघात झाल्यास विमा कंपन्या तुमचा दावा नाकारू शकतात.
- पॉलिसी अवधीत मोडिफिकेशन करणे किंवा एक्सेसरीज लावणे, असे प्रकार केल्यास पॉलिसीचे नूतनीकरण करताना विमा कंपनीला नक्की कळवा.
- अन्यथा, कार इन्शुरन्सचा लाभ उपलब्ध होणार नाही. कारण विमा कंपनीने नवीन पॉलिसीमध्ये अतिरिक्त अॅक्सेसरीज समाविष्ट केल्यावरच त्याची तपासणी केली जाते आणि आवश्यक प्रीमियम आकारला जातो.
- विमा पॉलिसी बनवताना किंवा नूतनीकरण करताना, काही लोक पैसे वाचवण्यासाठी कारशी संबंधित महत्त्वाची माहिती लपवतात.
- याव्यतिरिक्त, बहुतेक कार मालक बोगस दावे देखील करतात.
- बहुतेक प्रकरणांमध्ये, या दोन्ही कारणांमुळे दावा नाकारला जातो.
- बनावट दावा आढळल्यास विमा कंपनी कायदेशीर कारवाईदेखील करू शकते.
- प्रिमियम वेळेवर भरला नाही तर पॉलिसी अमान्य होते.
- भारतातील बहुतेक कंपन्या ९० दिवसांचा वाढीव कालावधी देतात. या कालावधीत तुम्ही पॉलिसीचे नूतनीकरण न केल्यास, तुम्ही कार विम्याचे सर्व फायदे गमावून बसाल.
- ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय कार चालवणे कायद्याने गुन्हा आहे.
- जर तुमचा अपघात झाला आणि तुम्ही ड्राइविंग लायसन्सशिवाय कार चालवत असाल तर विमा कंपनी तुमचा दावा नाकारेल.
- लोकल मैकेनिककडून कार दुरुस्त करुन घेऊ नये.
- आजच्या युगात संगणकीकृत अॅप्सच्या मदतीने गाड्यांची रचना केली जात आहे.
- अपघातामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे कारचे नुकसान झाले असल्यास स्वत: किंवा लोकल मेकॅनिककडून कार दुरुस्त करु नये यामुळे वॉरंटी आणि विम्यावर परिणाम होतो. असे केल्याने विमा कंपन्या तुमचा दावा नाकारु शकतात.