मुक्तपीठ टीम
रशियासारखा आजही प्रबळ असणारा देश. पण त्या देशाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन अवघ्या पाच तासांच्या दौऱ्यासाठी भारतात आले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. निमित्त होते २१ व्या भारत-रशिया वार्षिक परिषदेत सहभागाचे. व्लादिमीर पुतिन यांचा भारत दौरा हा दोन्ही देशांसाठी महत्वाचा आहे. तो पंधरा मुद्द्यांमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करुया.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कोरोना संकट असूनही भारत-रशिया संबंधात कोणताही बदल झालेला नाही. कोरोनाचे आव्हान असूनही, भारत आणि रशियामधील द्विपक्षीय संबंध आणि धोरणात्मक भागीदारीत कोणताही बदल झालेला नाही. कोरोनाविरुद्धच्या लढाईतही दोन्ही देशांदरम्यान सहकार्य झाले आहे, याचाही त्यांनी खास उल्लेख केला.
भारत-रशिया मैत्री संबंधित महत्त्वाचे १५ मुद्दे
- रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारताचा उल्लेख महान शक्ती म्हणून करणे मोठी गोष्ट आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही रशियाला भारताचा कायमचा मित्र संबोधून गौरवले.
- रशिया हा भारताचा सर्वात जुना मित्र आहे. बांग्लादेश युद्धाच्यावेळी अमेरिकेने पाकिस्तानच्या मदतीला आरमार पाठवण्याचे ठरवताच, रशियाने प्रत्युत्तराची तयारी दाखवली. त्यामुळे ते युद्ध दोन देशांपुरतेच मर्यादित राहिले.
- भारताने पाकिस्तानचे कंबरडे मोडत बांग्लादेशाला स्वातंत्र्य मिळवून दिले.
- भारत आणि अमेरिकेचे संबंध वाढत असल्याने निर्माण झालेल्या संशयाचं धुकं भारत – रशियात झालेल्या २८ करारांमुळे हटले आहे.
- रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी एस-४०० हवाई संरक्षण प्रणालीचे मॉडेल भारताला सोपवले. त्यामुळे अमेरिकेकडून भारतावर निर्बंधांच्या धोक्याची शक्यता आहे. तरीही भारताने हे पाऊल उचलले,
- चीनचा वाढता धोका लक्षात घेता भारतासाठी अशी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा अत्यावश्यक आहे.
- पुतिन यांनी उल्लेख केला तसे, भारताने यातून हा देश फक्त अमेरिकेवर अवलंबून नसून स्वत:चे निर्णय स्वत: घेत असतो, हेही दिसले.
- भारताने रशियाशी एके-२०३ असॉल्ट रायफलच्या निर्मितीसाठी ५१०० कोटी रुपयांहून अधिकचा करार केला.
- या रायफलींची निर्मिती भारतात यूपीच्या अमेठीमध्ये होणार आहे.
- इन्सास रायफलच्या जागी एके-२०३ रायफलचा समावेश केला जाईल. यापैकी ७.५ लाख रायफल भारतीय लष्कराला मिळण्याची अपेक्षा आहे.
- भारत-रशियाचा पाच लाखांहून अधिक रायफल्सच्या निर्मितीसाठी करार झाला आहे.
- भारत आणि रशिया यांच्यात संरक्षण क्षेत्रातील संयुक्त कवायतींप्रमाणेच आणखी काही परस्परहिताच्या बाबींवर भविष्यात करार होऊ शकतात.
- परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मोदी-पुतिन चर्चेत अफगाणिस्तानातील परिस्थितीवरही चर्चा झाली.
- सर्वात महत्वाचं म्हणजे भारत हा फक्त एका मोठ्या शक्तीशाली देशाशी संबंध राखत नसून, त्यांच्यावर अवलंबून नाही, असा चांगला संदेश जगाला गेला.