Wednesday, June 4, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आठवलेंची महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी

March 21, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
18

मुक्तपीठ टीम

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्राच्या गृह विभागावर कलंक लागला गेला आहे.त्यामुळे नैतिकेच्या दृष्टीने अनिल देशमुख यांनी तात्काळ गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

 

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके असलेल्या गाडीच्या प्रकरणात पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना एन आय ए ने अटक केली आहे.अशा गंभीर प्रकरणात पोलीसांची नावे येणे ; मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचे प्रकरण; तसेच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि आता थेट माजी पोलीस आयुक्तांनी राज्याच्या गृहामंत्र्यांवरच वसुलीच्या टार्गेट चे केलेले गंभीर आरोप पाहता महाराष्ट्र राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेच्या यंत्रणेवर जनतेचा विश्वास राहिला नाही.

 

त्यामुळे राज्य सरकार बरखास्त करून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी या मागणीचे पत्र उद्या सोमवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन आपण देणार असल्याची माहिती ना. रामदास आठवले यांनी आज दिली.

 

सचिन वाझे सारख्या पोलीस अधिकाऱ्याची शिवसेनेने अनेकदा बाजू घेतली आहे.शिवसेनेशी सचिन वाझे यांचे जवळचे संबंध राहिले आहेत. वाझे सारख्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव एन आय ए च्या चौकशीत दोषी म्हणून आले आहे.त्यांना वाचविण्यासाठी वाझे ला पाठीशी घालण्याचा प्रयत्न शिवसेने ने केला आहे. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके ठेवण्याच्या गंभीर प्रकरा मागे मोठे षडयंत्र असण्याची शक्यता आहे.या मागे कोण बडे लोक आहेत त्याचा उलगडा होण्यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी ना रामदास आठवले यांनी केली आहे.

 

गुन्हेगारी स्वरूपाच्या कारवाईमध्ये पोलीस अधिकाऱ्याचे नाव येणे हा गंभीर प्रकार आहे.कायदा आणि सुव्यवस्थेवरून जनतेचा विश्वास उडविणारा प्रकार आहे. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके ठेवणे या मागे कुणाचे षडयंत्र आहे त्याचा शोध घेतला पाहिजे. त्या घटने नंतर घडलेल्या घटनाक्रमात राज्याचा गृह विभाग कलंकित झाला असून गृहमंत्री अनिल देशमुख यांना पदावर राहण्याचा अधिकार राहिला नाही. त्यांनी नैतिकेच्या दृष्टीने तात्काळ राजीनामा दिला पाहिजे तसेच राज्यात ढासळलेल्या कायदा आणि सुव्यस्थेला राज्याचे प्रमुख म्हणुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा जबाबदार असल्याने राज्य सरकार बरखास्त करावे असे पत्र मी उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना देणार असल्याचे ना रामदास आठवले यांनी आज स्पष्ट केले.


Tags: cm uddhav thackerayramdas athwaleअमित शहागृहमंत्री अनिल देशमुखमुकेश अंबानीमुख्यमंत्री उद्धव ठाकरेरामदास आठवलेरिपब्लिकन पक्षसचिन वाझे
Previous Post

#व्हाअभिव्यक्त! भाजपाच्या षडयंत्राला व गोदी मीडियाच्या दबावाला सरकारने बळी पडू नये!

Next Post

जीवनावश्यक कायद्याची शिफारस मागे घेण्याची शेतकरी आंदोलकांची मागणी

Next Post
farmer protest

जीवनावश्यक कायद्याची शिफारस मागे घेण्याची शेतकरी आंदोलकांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!