मुक्तपीठ टीम
महाराष्ट्र शासनामार्फत विविध कृषि पुरस्कार देण्यात येतात. शेतकऱ्यांनी कृषि पुरस्कारांसाठी प्रस्ताव तात्काळ तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रकाश सुर्यवंशी यांनी केले आहे.
विविध कृषि पुरस्कारनिहाय निकष व कंसात पुरस्काराचे स्वरूप पुढीलप्रमाणे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार (राज्यस्तर-१) – कृषि क्षेत्रातील विस्तार, प्रक्रिया, निर्यात, उत्पादन पिक फेरबदल, आधुनिक तंत्रज्ञान वापर इत्यादी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेस देण्यात येतो (पारितोषिक ७५ हजार रूपये, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र (व्यक्तीचा सपत्नीक/पतीसह सत्कार)). वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार (आठ कृषि विभागातून प्रत्येकी १ याप्रमाणे ८) – कृषि व कृषि संलग्न क्षेत्रामध्ये स्पृहणीय कार्य करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेस देण्यात येतो (पारितोषिक ५० हजार रूपये, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र (व्यक्तीचा सपत्नीक/पतीसह सत्कार)). जिजामाता कृषिभूषण पुरस्कार (आठ कृषि विभागातून प्रत्येकी १ याप्रमाणे ८) – कृषि क्षेत्रामध्ये महिलांचे उल्लेखनिय कार्य (पारितोषिक ५० हजार रूपये, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र (व्यक्तीचा पतीसह सत्कार)). वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार (आठ कृषि विभागातून प्रत्येकी १ याप्रमाणे ८) – पत्रकारीतेव्दारे अथवा इतर अन्य मार्गाने कृषि विषयक ज्ञानाचा फायदा परीसरातील शेतकऱ्यांना करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेस देण्यात येतो (पारितोषिक ३० हजार रूपये, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र (व्यक्तीचा सपत्नीक/पतीसह सत्कार)).
वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गटासाठी प्रति जिल्हा एक याप्रमाणे ३४ आणि आदिवासी गटासाठी प्रति विभाग एक याप्रमाणे सहा असे एकूण ४०) – अधुनिक तंत्र सुधारीत बी-बीयाणे इत्यादींचा वापर करणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांना देण्यात येतो (पारितोषिक ११ हजार रूपये, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र (व्यक्तीचा सपत्नीक/पतीसह सत्कार)). कृषिभूषण (सेंद्रीय शेती) पुरस्कार (आठ कृषि विभागातून प्रत्येकी एक याप्रमाणे आठ) – सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सेंद्रीय निविष्ठा वापरण्यास प्रोत्साहन देणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येतो (पारितोषिक ५० हजार रूपये, स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र (व्यक्तीचा सपत्नीक/पतीसह सत्कार). उद्यानपंडीत पुरस्कार (आठ कषि विभागातून प्रत्येक एक याप्रमाणे आठ) – फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येतो (पारितोषिक 25 हजार रूपये, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र (व्यक्तीचा सपत्नीक/पतीसह सत्कार). पदमश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवा रत्न पुरस्कार (आठ कृषि विभागातून प्रत्येकी एक याप्रमाणे आठ व आयुक्तालय / मंत्रालय स्तरावरून एक अधिकारी/कर्मचारी एक या प्रमाणे एकूण 9) – कृषि विभागामध्ये अतिउत्कृष्ठ कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात येतो (पारितोषिक स्मृतीचिन्ह, सन्मपनपत्र (व्यक्तीचा सपत्नीक सत्कार). युवा शेतकरी पुरस्कार (आठ कृषि विभागातून प्रत्येकी एक या प्रमाणे आठ) – कृषि क्षेत्रात उल्लेखनीय व नाविन्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना (वय १८ ते ४० वर्षे) देण्यात येतो (पारितोषिक ३० हजार रूपये, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र (व्यक्तीचा सपत्नीक /पतीसह सत्कार).