मुक्तपीठ टीम
आयएफएस अधिकारी विवेक कुमार यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते २००४ बॅचचे आयएफएस अधिकारी आहेत. भारत सरकारने जारी केलेल्या आदेशात असे सांगण्यात आले आहे की, मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने आयएफएस विवेक कुमार यांची पंतप्रधान कार्यालयात संयुक्त सचिव स्तरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांचा मुंबईशी संबंध आहे.
विवेक कुमार यांनी आयआयटी मुंबईमधून बीटेक केले आहे. ते आता भारताचे पंतप्रधान नरेंद मोदींचे प्रधान सचिव म्हणून पंतप्रधान कार्यालयातील सर्वात वरिष्ठ नोकरशहा आणि प्रशासकीय अधिकारी आहेत. प्रधान सचिवाची निवड भारतीय प्रशासकीय सेवा आणि भारतीय परराष्ट्र सेवेतून केली जाते.
विवेक कुमार सध्या पंतप्रधान कार्यालयात संचालक आहेत. याआधी विवेक कुमार २०१३-१४ पर्यंत परराष्ट्र मंत्रालयात कार्यरत होते. त्यांनी आयआयटी मुंबईमधून बीटेकचे शिक्षण घेतले आहे. विवेक कुमार २०१४ मध्येच पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून रुजू झाले होते.