आपल्या नखांवरून आपण निरोगी आहोत की नाही हे देखील समजते. नखांमध्ये दिसणारे वेगवेगळे बदल एखाद्या आजाराचे संकेत दर्शवतात. उदाहरणार्थ, नखांचा रंग निळा पडणे, हा शरीरात ऑक्सिजनच्या कमतरतेचे संकेत देतो आणि नखांचा पिवळसर रंग पडणे म्हणजे मधुमेह किंवा हायपोथायरॉईडचा रुग्ण असू शकतो ही लक्षणं दिसतात. नखांमध्ये दिसणारे हे ५ बदल शरीरातील रोग सूचित करतात.
१. नखांचे वारंवार तुटणे
नखांचे वारंवार तुटणे हे आपल्या शरीरातील हायपोथायरॉईड किंवा व्हिटॅमिन-ए आणि सीची कमतरता सूचित करते.
२. नखांचा रंग निळा किंवा पिवळा पडणे
नखांचा रंग निळा पडणे हे आपल्या शरीरात ऑक्सिजनची कमतरता किंवा फुफ्फुसांचा त्रास दर्शवितो. आणि नखांचा रंग निळा पडणे हे मधुमेह, हायपोथायरॉईड, सोरायसिस, फुफ्फुसाचा रोग किंवा नेल फंगस हे आजार दर्शवितो.
३. नखांवर गडद रंगाची खूण येणे
हृदय संक्रमण, मेले नोमा किंवा धमनी नुकसान हे आजार सूचित करते.
४. नखांवर सरळ रेषा व उभ्या रेषा येणे
नखांवर सरळ रेषा येणे म्हणजे शरीरात झिंकची कमतरता, मधुमेह किंवा मूत्रपिंडाचा आजार ही लक्षणं दर्शवितो. तसेच वाढते वय आणि लोहाच्या कमतरतेचा प्रभाव यामुळे नखांवर उभ्या रेषा येतात.
५. नखांवर खड्डे येणे
सोरायसिस किंवा अलोपेशिया एरेटा सारखी लक्षणं सूचित करतो.