Monday, June 2, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नवरा मुस्लिम, बायको हिंदू…बुरखा घालत नसल्याने हत्येचा आरोप!

September 27, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
-husband-killed-wife-for-refusing-to-wear-burqa-follow-islamic-tradition

मुक्तपीठ टीम

मुंबईतील टिळक नगर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे सोमवारी रात्री मुस्लिम समाजातील एका व्यक्तीने आपल्या हिंदू पत्नीची भर रस्त्यात गळा चिरून हत्या केली. बुरखा घालण्यास आणि मुस्लिम रितीरिवाज पाळत नसल्याने तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे. इक्बाल मोहम्मद शेख असे आरोपीचे नाव आहे. तीन वर्षांपूर्वी पीडित रुपाली चंदनशिव आणि आरोपी इक्बाल यांनी प्रेमविवाह केला होता. या दाम्पत्याला दोन वर्षांचा मुलगा आहे.

रितीरिवाज पाळत नसल्याने भांडणं!!

  • मृत महिलेच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे टिळक नगर पोलिसांनी घटनेसंदर्भात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
  • रुपालीच्या कुटुंबीयांनी पोलिस तक्रारीत म्हटले आहे की, इक्बाल आणि त्याच्या कुटुंबीयांनी लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच तिच्यावर मुस्लिम रितीरिवाज पाळण्यासाठी आणि बुरखा घालण्यासाठी दबाव आणला.
  • मात्र, रुपालीला हे मान्य नव्हते.
  • यावरून दोघांमध्ये वारंवार वाद व्हायचे आणि रुपालीही गेल्या काही महिन्यांपासून वेगळी राहत होती.
  • टिळक नगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विलास राठोड यांनी सांगितले, “इक्बाल मोहम्मद शेख याने २६ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास पत्नीचा गळा चिरून आणि चाकून तिच्या सपासप वार करून हत्या केली.

यामुळे केला खून…

  • पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “गेल्या काही महिन्यांपासून ते वेगळे राहत होते. मात्र, त्यांच्यात फोनवर बोलणे आणि भांडणे व्हायची.
  • सोमवारी दोघे फोनवर बोलत असताना महिलेने आरोपीकडे घटस्फोट मागितला.
  • यानंतर आरोपीने आपल्या मुलाचा ताबा मागितला, त्याला महिलेने विरोध केला.
  • यावरून त्यांच्यात वाद झाला आणि त्यातून हा खून झाला.

घटनास्थळी नेमकं काय घडलं?

  • इक्बाल रुपालीला घरी परतण्यासाठी तिला भेटायला गेला होता.
  • पण रुपाली घटस्फोटाच्या निर्णयावर ठाम होती.
  • त्यानंतर रागाच्या भरात आरोपीने पत्नीला जवळच्या रस्त्यावर ओढून नेले आणि तिचा गळा चिरून तिच्यावर चाकूने वार केले, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला.
  • गुन्हा केल्यानंतर इक्बालने घटनास्थळावरून पळ काढला.
  • रुपालीचा आरडाओरडा ऐकून स्थानिक लोक तिच्या मदतीला धावले आणि ही बाब पोलिसांना कळवण्यात आली.
  • पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
  • काही वेळातच पोलिसांनी आरोपीला अटक केली.
  • पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत.

Tags: BurqaLawmumbaiMurderMuslim Traditionकायदाघटस्फोटबुरखामुंबईमुस्लिम रितीरिवाजहत्या
Previous Post

मंत्रालय सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

Next Post

पदवीधर व शिक्षक निवडणुकीसाठी नोंदणी सुरू

Next Post
मा. निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची पत्रकार परिषद 1

पदवीधर व शिक्षक निवडणुकीसाठी नोंदणी सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!