Sunday, May 11, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

देशभरातील कला कौशल्याची मुंबईत बहरलेली ‘हुनर हाट’ जत्रा, मनात ठसा उमटवणारी!

बुधवारी हुनर हाटची सांगता होणार...

April 27, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
Hunar Haat

अपेक्षा सकपाळ / मुक्तपीठ टीम

मुंबईतील बीकेसी म्हणजे बिझनेस सेंटर पण गेले काही दिवस ते देशाचं आर्ट सेंटरही झालं आहे. त्याचं कारण तिथं रंगलेलं “हुनर हाट”. भारतीय पारंपरिक कारागिरांचं कौशल्य कपडे, धातू, क्रोकरी, चित्रकला, हस्तकलेतून झळकलं. त्यामुळे चोखंदळ मुंबईकरांनी हुनर हाटला प्रतिसादाच्या माध्यमातून दादही दिली.

काश्मिरची प्रसिद्ध कावा चहा…सिक्किमचे मोमोज, राजस्थानी चपला, बिहारचा लिट्टी-चोखा, दिल्लीचे गोलगप्पे, हैद्राबादी बिर्याणी, पंजाबचे मक्के दी रोटी आणि सरसोका साग आणि मणिपूरच्या आदिवासाचे बांबू आर्ट अशी देशभरातील हस्तकला, खाद्यपदार्थ आणि लोककलांची झलक हुनर हाटमध्ये पाहायला मिळाले. ‘हुनर हाट’ मुळे देशातल्या दुर्गम भागांतून शिल्पकार, विणकरांच्या कलेला मंच देऊन त्यांना राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्यात आली आहे. ‘हुनर हाट’, ‘स्थानिक उत्पादनांना जागतिक ब्रँड’ बनविण्यासाठीचे भक्कम व्यसपीठ ठरले आहे.

बीकेसीतील एमएमआरडीए मैदानातील ‘हुनर हाट’ प्रदर्शनाला आजवर लाखभर मुंबईकरांनी भेट दिली. देशातील विविध राज्यांचे वैशिष्ट्य असणारे खाद्यपदार्थांचे जवळपास साठीहून अधिक स्टॉल्स या प्रदर्शनात आहेत. शनिवारी, १६ एप्रिलला सुरु झालेल्या या हाटमध्ये पहिल्या दिवसापासूनच लोकांनी मोठी गर्दी केली होती. येथे उभारलेल्या स्टॉल्समध्ये देशभरातील कारागिरांनी हस्तकला, शिल्पकला आणि चित्रकला, दैनंदिन वापराच्या वस्तु, शोभेच्या वस्तु विकण्यास मांडलेल्या.

नव्या पिढीला वारसा पुढे नेण्यास प्रोत्साहन!

विणकाम आणि शिल्पकलेशी संबंधित कुटुंबांची तरुण पिढी आपल्या स्वदेशी वारशापासून दूर जात आहे. या उत्पादनांना बाजारपेठ आणि संधी नसल्यामुळे हा वारसा नामशेष होण्याच्या मार्गावर होता. मात्र, सध्या सरकारने स्वदेशी विणकर, शिल्पकार, कारागीरांच्या पिढीजात वारशाचा विकास आणि संवर्धनासाठी प्रभावी पावले उचलली आहेत.‘हुनर हाट’ सारख्या कार्यक्रमांच्या आयोजनातून आता विणकर, शिल्पकारांची तरुण पिढी आपला पिढीजात वारसा पुढे नेत आहे. त्यांना ‘हुनर हाट’ ने अनेक संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांना अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आणले गेल्याचा दावा, अल्पसंख्याक विकास मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी उद्घाटनाच्यावेळी केला होता. मुक्तपीठच्या टीमशी बोलताना हुनर हाटमधील अनेक कारागिरांनी याला दुजोरा दिला. आम्हाला हुनर हाटमुळे देशभरातील ग्राहकांपर्यंत पोहचता आले याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केलं.

हुनर हाटचा भारतीय कारागिरांना फायदा!

आज ‘हुनर हाट’चा प्रत्येक विणकर, शिल्पकार, कारागीर मोठ्या संख्येने स्वदेशी उत्पादनांची विक्री करत आहे. यामुळे विणकर, शिल्पकारांच्या आयुष्यात आर्थिक क्रांती आली आहे. ‘हुनर हाट’ने महिला विणकरांना, शिल्पकारांच्या आकांक्षांना नवी उंची, नवी आशा दिली आहे. ‘हुनर हाट’ मध्ये महिला विणकर, कारागिरांच्या मेहनत आणि यशाच्या अनेक गाथा आहेत. या महिला विणकर, शिल्पकार स्वतःच्या प्रगतीसोबतच आपल्या कुटुंबाला देखील समृद्ध करत आहेत.

देशभरातील हजारावर विणकर, शिल्पकार, कारागीर !

मुंबईत, वांद्रे कुर्ला संकुलमधील ‘हुनर हाट’ मध्ये ३१ पेक्षा जास्त राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील जवळपास १००० विणकर, शिल्पकार, कारागीर सहभागी होत आहेत, ज्यात मोठ्या संख्येने महिला कारागीर, शिल्पकारांचा समावेश आहे. मुंबई ‘हुनर हाट’ मध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, दिल्ली, नागालँड, मध्य प्रदेश, मणिपुर, बिहार, आंध्रप्रदेश, झारखंड, गोवा, पंजाब, लडाख, कर्नाटक, गुजरात, हरियाणा, जम्मू-काश्मीर, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, छत्तीसगड, तामिळनाडू, केरळसह देशातील प्रत्येक क्षेत्रातून नावाजलेले कारागीर आपली सुंदर हस्तनिर्मित दुर्मिळ उत्पादने घेऊन आले होते.

खा – प्या – मजा करा!

‘हुनर हाट’च्या उपहारगृहात (फूड कोर्ट) इथे येणारे लोक देशाच्या विविध भागांतील पारंपारिक पदार्थांचा आनंद घेऊ शकतील. याशिवाय, ‘मेरा गांव मेरा देश’, ‘विश्वकर्मा वाटिका’, दररोज होणारे सर्कशीचे खेळ, ‘महाभारता’चे सादरीकरण, प्रसिद्ध कलावंतांच्या गीत-संगीताचे कार्यक्रम, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव पॅव्हेलीयन, सेल्फी पॉइंट इत्यादी, मुंबई इथे आयोजित ‘हुनर हाट’ चे मुख्य आकर्षण आहेत.

मुंबईच्या हुनर हाटमध्ये मनोरंजनही!

१२ दिवस चालणाऱ्या मुंबई ‘हुनर हाट’ मध्ये येणाऱ्या लोकांना प्रसिद्ध कलाकारांच्या विविध गीत – संगीताच्या भव्य कार्यक्रमांचा आनंद घेता येणार आहे, असे त्यांनी सांगितले. अन्नू कपूर, पंकज उधास, सुदेश भोसले, सुरेश वाडेकर, साधना सरगम, अमित कुमार, शैलेन्द्र सिंह, शब्बीर कुमार, महालक्ष्मी अय्यर, भूमि त्रिवेदी, कविता पौडवाल, दलेर मेहदी, अल्ताफ राजा, रेखा राज, उपासना सिंह (हास्य कलाकार), एहसान कुरैशी (हास्य कलाकार), भूपिंदर सिंह भुप्पी, रानी इन्द्राणी, मोहित खन्ना, प्रिया मलिक, व्हीआयपी हास्यकलाकार, जॉली मुखर्जी, प्रियंका मैत्रा, विवेक मिश्रा, दीपक राजा (हास्य कलाकार), अदिति खांडेगल, अंकिता पाठक, सिद्धांत भोसले, राहुल जोशी, सुप्रिया जोशी, भूमिका मलिक, प्रेम भाटिया, पोश जेम्स आदि कलाकार आपले कार्यक्रम सदर करतील. २६ एप्रिल रोजी मेगा शो चे आयोजन केले जाईल ज्यात लेझर शो प्रमुख आकर्षण असेल. या व्यतिरिक्त प्रसिद्ध कलाकार अन्नू कपूर यांचा ‘अंताक्षरी’ हा कार्यक्रम देखील आकर्षणाचा केंद्र बिंदू असेल.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Art CenterArt exhibitiongood newsHunar HaatKnittingmuktpeethMumbai BKCMumbaikarprime minister narendra modisculptureआर्ट सेंटरकलाप्रदर्शनचांगली बातमीपंतप्रधान नरेंद्र मोदीमुक्तपीठमुंबई बीकेसीमुंबईकरविणकामशिल्पकलाहुनर हाट
Previous Post

राज्यात १५३ नवे रुग्ण, १३५ रुग्ण बरे! सक्रिय रुग्णांची संख्या हजाराखाली!!

Next Post

मिक्स आणि मॅच लसीकरण हा कोरोनावर प्रभावी उपाय!

Next Post
vaccine

मिक्स आणि मॅच लसीकरण हा कोरोनावर प्रभावी उपाय!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!