मुक्तपीठ टीम
बॉलीवूडमध्ये 90’s च्या काळात आपल्या स्टंट आणि डान्ससाठी ओळखला जाणारा हिरो म्हणजे ‘हृतिक रोशन’. सध्या हृतिक त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्थ आहे. देशातील पहिल्या एरियल अॅक्शन ड्रामा ‘फायटर’च्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. भारतात सर्वात फिट आणि बॉडीसाठी फेमस असरणाऱ्या अभिनेत्यांपैकी तो ओळखला जातो. पण त्याचा सोशल मीडियावर एक फूडी अंदाज व्हायरल होत आहे. त्याने त्याच्या टीमचा व्हिडीओ शेअर केला आहे. ही मजेशीर पोस्ट शेअर करत हृतिक रोशनने लिहिले, “मला अशी टीम सापडली आहे जी माझ्याइतकीच खाण्यावर प्रेम करते. हा व्हिडिओ पाहून त्याचे सर्व सोशल मीडिया चाहते चकित झाले आहेत. त्यात दीपिका पदुकोणनेही त्याच्या या व्हिडिओवर केलेल्या कमेंटने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून मस्त प्रतिक्रिया येत आहेत.
View this post on Instagram
हृतिक रोशनच्या व्हिडिओची चर्चा
- हृतिकने त्याच्या इंस्टाग्रामवर टीमसह खातानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
- यामध्ये टीम बर्गर, फ्रेंच फ्राईज खाऊन आणि शूटमधून वेळ काढून याचा आनंद घेताना दिसत आहे.
- ही मजेशीर पोस्ट शेअर करत हृतिक रोशनने लिहिले, “मला अशी टीम सापडली आहे जी माझ्याइतकीच खाण्यावर प्रेम करते.!”
हृतिक रोशनच्या व्हिडीओवर दीपिका पदुकोणची कमेंट
- हृतिक रोशनची फायटर को-स्टार दीपिका पदुकोण, एक फूडी आहे. तिला खाण्यावर अतिशय प्रेम आहे.
- हृतिकच्या व्हिडीओला कमेंट करत दिपीकाने लिहिले आहे की, ‘माझी वाट पाहा’ असे लिहिले आहे.
दीपिका आणि हृतिक पहिल्यांदाच ‘फायटर’मध्ये एकत्र दिसणार
सिद्धार्थ आनंदच्या ‘फाइटर’मध्ये हृतिक पहिल्यांदाच दीपिका पदुकोणसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला, त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटात जॉन अब्राहम देखील मुख्य भूमिकेत आहे. हृतिक आणि दीपिकाला पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.