मुक्तपीठ टीम
गुगलने त्यांच्या ग्राहकांसाठी नवनवीन अपडेट लाँच करत आहे. गुगल आता गुगल मीटमध्ये एक नवीन फीचर आणणार आहे. या नवीन फिचर्ससह, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग दरम्यान फ्रेम पाहीजे तशी सेट केला जाईल. नवीन फीचर युजर्सना फ्रेममध्ये चेहऱ्यावर झूम इन करण्याची परवानगी देईल. हे नवीन फिचर पुढील महिन्यात २ नोव्हेंबर रोजी सर्व युजर्ससाठी उपलब्ध होईल.
युट्युबवर लाइव्ह स्ट्रीमिंगचेही फीचर!
- कंपनीने गुगल मीटसाठी आणखी एक चांगले फीचर दिले आहे.
- युजर्सना थेट युट्युबवर गुगल मीटचे सत्र थेट लाईव्ह करण्याची सुविधाही मिळणार आहे.
- या फिचरमुळे युजर्स त्यांच्या इच्छेनुसार नंतर प्रेझेंटेशन थांबवून किंवा रीप्ले करून पाहू शकतील.
हे फिचर कसे वापरू शकता
- गुगल मीटवर प्रशासक युजर्सना युट्युबवर मीटिंग लाइव्ह स्ट्रीम करण्याचा पर्याय देण्यात आला आहे.
- युजर्सना त्यांच्या युट्युब चॅनेलवर लाइव्ह स्ट्रीमिंगसाठी मंजुरी घ्यावी लागेल.
- परवानगी मिळाल्यास युजर्स गुगल मीटचे हे नवीन फिचर वापरू शकतील.
- या साठी गुगल मीटिंगच्या क्रियाकलाप पॅनलवर जावे लागेल.
- येथे ‘लाइव्ह स्ट्रीमिंग’ वर क्लिक करा.
- युट्युब चॅनल निवडा तुम्हाला मीटिंगची लाईव्हस्ट्रीम लिंक शेअर करा.
गुगल मीटचे फ्रेम सेट हे नवीन फिचर कसे काम करेल?
- कोणत्याही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुरु होण्यापूर्वी फ्रेम दर आपोआप समायोजित करता येईल.
- त्यामुळे सगळे युजर्स कॉन्फरन्समध्ये सारखेच दिसणार.
- युजर्सना स्वत: आता फ्रेम दर सेट करण्याची सुविधा मिळणार आहे.
- यामुळे यूजर फ्रेममध्ये काय दाखवायचे आणि काय नाही हे स्वतः सेट करू शकेल.
- या नवीन फीचरवर प्रशासकाचे कोणतेही नियंत्रण राहणार नाही.
- हे फिचर बाय डीफॉल्ट बंद असेल त्यामुळे युजर्सना ते वापरण्यासाठी ते चालू करावे लागेल.