सर्व चालेल पण मधुमेह नको…एक रोग पण अनेक व्याधी वाढवत नेतो. कोणत्याही मधुमेह झालेल्याला विचाराल तर तो अनेकदा अशा अनेक व्यथा मांडतो. खरंतर मधुमेह हा एक असाध्य रोग आहे, हे जरी खरं असलं तरी त्यावर नियंत्रण मिळवताच येत नाही असंही नाही. मधुमेह एकदा होतो, तो आयुष्यभरासाठी राहतो, पण काही पथ्य पाळलीत तर खूप चांगलं जगताही येतं. त्यामुळे मधुमेह झाल्यावर सर्वच संपलं असं मानून निराश होऊ नये. कारण तसं झालं तर त्रास आणखी वाढू शकतो.
मग करायचं तरी काय? या आजारात रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणे खूप कठीण असते. तज्ञांच्या मते, रक्तातील साखरेची पातळी वाढल्यास आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो. मूत्रपिंड, यकृत, मेंदू यासह शरीराच्या अनेक महत्त्वपूर्ण अवयवांना याचा त्रास होतो. मधुमेहाचे मुख्य कारण अद्याप समजू शकलेले नाही. अशी अनेक लक्षणे आहेत जी मधुमेह असल्याचे सूचित करते. त्यामुळे सर्वात महत्वाचं हेच की मधुमेहाच्या लक्षणावर कायम लक्ष ठेवणे. जर तो सुरुवातीच्या किंवा होण्यापूर्वीच्या काळातच लक्षात आला तर नियंत्रण मिळवणे अधिक चांगले जाते.
मधुमेहाची लक्षणे ओळखायची कशी?
१) अस्पष्ट दिसणे
मधुमेहाची सुरुवातीची लक्षणे डोळ्यांना अस्पष्ट दिसणे. अशा परिस्थितीत, रक्त आणि डोळ्यांची तपासणी करा.
२) त्वचेत बदल
मधुमेह झाल्यावर त्वचेत विशेष बदल घडतात. त्वचा कोरडी होण्यास सुरवात होते.
३) थकवा येणे
रक्तातील साखरेच्या अतिप्रमाणामुळे थकवा येतो. छोटी कामे करुनही व्यक्तीला थकवा जाणवतो.
४) वारंवार लघवी येणे
जेव्हा रक्तातात साखरेची पातळी जास्त असते, मूत्रपिंड रक्त शुध्दीकरणाचे कार्य थांबवते. यामुळे मूत्रात साखरेची पातळी वाढते. यामुळे पीडित व्यक्तीला वारंवार लघवी करावी लागते. याव्यतिरिक्त, हे बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे देखील होऊ शकते. शौचालयाचे वारंवार वापर हा मधुमेहाचे लक्षण आहे.
५) अचानक वजन कमी होणे
जर अचानक वजन कमी झाले तर ते मधुमेहाचे पहिले लक्षण आहे. यामुळे, उर्जेचे कार्य शरीरात साठवलेल्या अतिरिक्त चरबीद्वारे केले जाते. यामुळे वजन वेगाने कमी होते.