मुक्तपीठ टीम
मधुमेह! सगळ्यांनाच हा आजार नकोसा वाटतो. त्यासाठी नियमित व्यायाम कारणे, जंक फूड न खाणे, भाज्या खाणे, फळांचा रस पिणे इत्यादी गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. स्वस्थ राहण्यासाठी ते आवश्यकही आहे. आजकाल मधुमेह ही एक सामान्य समस्या बनली आहे. मधुमेहामुळे शरीरातील ग्लुकोजची पातळी वाढते. काही लोक शरीरात होत असलेल्या बदलांकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे ही समस्या नंतर आरोग्य समस्यांचे कारण बनू शकते.
मधुमेहाची सुरुवातीची लक्षणं कशी ओळखावी?
१. वारंवार लघवी येणे
- मधुमेहामुळे रक्तातील अतिरिक्त साखर काढून टाकण्यासाठी किडनीला जास्त मेहनत करावी लागते.
- अशा स्थितीत जेव्हा साखरेचे प्रमाण जास्त असते तेव्हा किडनी हे लघवीतूम काढून टाकते, त्यामुळे लघवी वारंवार येते.
- जर तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त आणि विशेषत: रात्री बाथरूममध्ये जावे लागत असेल तर ते रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याचे लक्षण आहे.
२. युरिन इन्फेक्शन होणे
- साखरेमुळे युरिन इन्फेक्शन वारंवार होते.
- लघवीतील अतिरिक्त साखर यीस्ट आणि बॅक्टेरियासाठी अन्न म्हणून काम करते. तसेच उबदार आणि ओलसर क्षेत्र त्यांना वाढण्यास मदत करते.
- विशेषत: ज्या महिलांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांना याचा अधिक अनुभव येऊ शकतो.
३. जास्त तहान लागणे
- जेव्हा साखरेचा त्रास होतो तेव्हा वारंवार लघवीला जाण्याने डिहायड्रेशन होते.
- अशा स्थितीत वारंवार तहान लागते, पण तरीही जास्त पाणी प्यायल्याने तहान भागत नाही. हे देखील मधुमेहाचे लक्षण आहे.
४. सतत भूक
- शरीरात सेवन केलेले अन्न ग्लुकोजमध्ये बदलते. ज्याचा वापर पेशी ऊर्जेसाठी करतात, परंतु मधुमेह असल्यास पेशी योग्यरित्या ग्लुकोज शोषू शकणार नाहीत.
- त्यामुळे शरीराला मिळणाऱ्या अन्नातून पुरेशी ऊर्जा मिळत नाही. अशा स्थितीत पोट भरले असले तरी काही वेळाने भूक लागेल.
५. शरीरात मुंग्या येणे किंवा सुन्न होणे
मधुमेहामध्ये मज्जातंतूंच्या नुकसानीमुळे हात आणि पायांना मुंग्या येतात, सुन्न होणे किंवा वेदना जाणवते.
६. त्वचेवर गडद डाग
- मधुमेहामुळे रक्तातील इन्सुलिनच्या अतिरेकीमुळे मानेच्या, बगलांच्या किंवा मांडीच्या पटीत त्वचेवर गडद, डाग येतात.
- या लक्षणांची लवकर काळजी घेतल्यास टाइप २ मधुमेहाचा सामना करता येतो. ही लक्षणे जाणवताच डॉक्टरांना भेट देणे आवश्यक आहे.