मुक्तपीठ टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतीच उज्ज्वला योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरूवात केली आहे. २०१६ मध्ये, योजनेचा पहिला टप्पा उत्तर प्रदेशातूनच सुरू झाला होता. त्याच वर्षी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी उज्ज्वला योजनेअंतर्गत १ कोटी अतिरिक्त एलपीजी कनेक्शनसाठी निधी जारी केला. अतिरिक्त कनेक्शन त्या गरीब कुटुंबांना दिले जातील जे उज्ज्वला योजनेच्या पहिल्या टप्प्यात सामील होऊ शकले नाहीत. त्यामुळे आता या दुसऱ्या टप्प्याचा फायदा घेत गॅस सिलिंडर कसे मिळवायचे ते या बातमीतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
उज्जला योजनेचा पहिला टप्पा
- उज्ज्वला योजनेचा पहिला टप्पा १ मे २०१६ रोजी उत्तर प्रदेशच्या बलिया जिल्ह्यातून सुरू करण्यात आला.
- याअंतर्गत ५ कोटी गरीब कुटुंबांतील महिलांना गॅस कनेक्शन वितरित करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते.
- महिलांचे चुलीच्या धुरापासून संरक्षण करणे आणि एलपीजीचा वापर वाढवून प्रदूषण कमी करणे ही योजना सुरू करण्याचा उद्देश होता.
पहिल्या टप्प्याचा विस्तार
- एप्रिल २०१८ मध्ये, सरकारने योजनेच्या लाभार्थ्यांच्या व्याप्तीचा विस्तार केला, जेणेकरून महिलांच्या आणखी ७ श्रेणींना समाविष्ट केले गेले.
- यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अंत्योदय अन्न योजना, मागासवर्गीय, चहाच्या मळ्यात काम करणारे कामगार, वनवासी आणि बेटांवर राहणारे लोक यांचा समावेश आहे.
- यानंतर लाभार्थ्यांची संख्या वाढून ८ कोटी झाली.
दुसऱ्या टप्प्यातील नेमकं काय बदललं?
- उज्ज्वलाच्या पहिल्या टप्प्यात सरकार एलपीजी कनेक्शनसाठी १६०० रुपयांची आर्थिक मदत करते.
- या योजनेअंतर्गत, गॅस कनेक्शन मिळविणारी कुटुंबे स्टोव्ह आणि सिलेंडरसाठी बिनव्याजी कर्ज घेऊ शकतात.
- दुसऱ्या टप्प्यात, एलपीजी कनेक्शन व्यतिरिक्त, पहिल्या सिलेंडरची रिफिलिंग देखील मोफत असेल.
- याशिवाय गॅस शेगडीही मोफत दिली जाईल.
- दुसऱ्या टप्प्यात अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे आणि इतर कागदपत्रेही कमी करण्यात आली आहेत.
- केवायसीसाठी कोणत्याही नोटरी किंवा प्रतिज्ञापत्राची आवश्यकता नाही. तसेच, इतर ठिकाणी राहणाऱ्या लोकांकडे अधिवास प्रमाणपत्र नसल्यास त्यांना सेल्फ डिक्लेरेशनचा पर्यायही मिळेल.
योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन कोणाला मिळणार?
- १८ वर्षांवरील महिलांना परंतु ती महिला सरकारने निर्धारीत केलेल्या वर्गातील असावी.
- एससी, एसटी, प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण), सर्वाधिक मागासवर्ग (एमबीसी), अंत्योदय अन्न योजना (एएवाय), चहा बाग जमाती, वनवासी, एसईसीसी कुटुंबे यावर्गातील उमेदवारांना कनेक्शन मिळणार.
कागदपत्रांविषयी विशेष माहिती
- आसाम आणि मेघालय वगळता इतर सर्व राज्यांमध्ये ईकेवायसी असणे आवश्यक आहे.
- ओळख आणि पत्त्याच्या पुराव्यासाठी आधार कार्ड महत्त्वाचे आहे.
रेशन कार्ड किंवा कुटुंबातील सदस्यांची नावे असलेले कागदपत्र असावे. - लाभार्थी आणि कुटुंबातील प्रौढ सदस्यांचे आधार कार्ड असावे.
- बँक खाते क्रमांक आणि आयएफएससी असावे.
- पासपोर्ट आकाराचा फोटो असावा.
अर्ज कसा करावा?
- प्रथम https://www.pmuy.gov.in/ujjwala2.html वेबसाइट उघडा.
- येथे तुम्हाला ३ वेगवेगळ्या गॅस कंपन्यांचा पर्याय दिसेल – इंडेन, एचपी आणि भारत गॅस. तुमच्या सोयीनुसार ज्या कंपनीचे वितरक तुमच्या घराजवळ आहे त्यावर क्लिक करा.
- क्लिक केल्यानंतर, कंपनीच्या वेबसाइटवर रिडायरेक्ट केले जाईल. येथे कागदपत्रांवर आधारित संपूर्ण तपशील प्रविष्ट करावे लागतील.
- ऑनलाईन अर्ज पूर्ण झाल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी होईल. सर्व कागदपत्रे मूळ असली पाहिजेत. मूळ कागदपत्रांशिवाय पडताळणी केली जाणार नाही.