Wednesday, March 11, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

घर आणि सोसायटीतील कचऱ्याचं तिथंच कसं करावं व्यवस्थापन? मराठी विज्ञान परिषदेतर्फे प्रात्यक्षिकांसह व्याख्यान

April 18, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
Solid Waste Management

मुक्तपीठ टीम

मराठी विज्ञान परिषद, पुणे विभागातर्फे ‘घर व गृहसंकुलातील घनकचरा व्यवस्थापन’ या विषयावर प्रात्यक्षिकासह व्याख्यान झाले. बदलती जीवनशैली, शहरीकरण यामुळे वाढत्या कचऱ्याचे नियोजन कसे करावे, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. “ओला व सुका कचरा वेगळा करणे हे तर आपले कर्तव्यच आहे. त्याबरोबरच सुका कचरा, प्लॅस्टिक आणि इतर असे वर्गीकरण आवश्यक आहे. घनकचऱ्याचे सोसायटीत व्यवस्थापन करणे ही काळाची गरज आहे,” असे मत तज्ज्ञांनी मांडले.

 

नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या व्याख्यानावेळी जैवतंत्रज्ञान वैज्ञानिक डॉ. प्रबीर घोष, ग्रीन थंब संस्थेचे फिर्दोष रुवाल्ला, अभियंता नीलम केणी या वक्त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र सराफ, माजी अध्यक्ष प्रा. विनय र र, कोषाध्यक्ष शशी भाटे, कार्यवाह संजय मालती कमलाकर आदी उपस्थित होते.

 

डॉ. प्रबीर घोष यांनी घरच्याघरी कंपोस्ट खत तयार करण्याचे फायदे व अडचणी सांगितल्या. ते म्हणाले, “वाढत्या प्रमाणातील कचरा कुठे जमा करावा, हा प्रश्न कमी होतो. त्यातून कोणताही दुर्गंध येत नाही. प्रदूषणात भर पडत नाही. शेतीसाठी, बागेसाठी खत तयार होते. रासायनिक शेतीला हा उत्तम पर्याय आहे. तसेच याचे मोठे फायदे म्हणजे घरपट्टीमध्येही सुट मिळते. खताची विक्री करून उत्पन्न मिळते. योग्य पद्धतीने कचऱ्याचे वर्गीकरण करून हा प्रयोग अमलात आणावा.”

 

सुका कचराविषयी नीलम केणी म्हणाल्या, “माझ्या घरचा किंवा सोसायटीचा कचरा जातो कुठे, याचा विचार करायला हवा. सुका कचऱ्याचे वर्गीकरण, तसेच पुनर्वापर करावा. परिणामी, प्लॅस्टिक निर्मिती, प्रदूषण कमी होईल. सुका कचरा वर्गीकरण करून विकला जाऊ शकतो. त्यातून सोसायटीला चांगले उत्पन्न मिळू शकते. यासाठी व्यवस्थापन समितीचे सहकार्य गरजेचे असते. स्वतःबरोबर कचरा वेचक आणि इतरांचीही काळजी घ्यायला हवी.”

 

ओल्या कचऱ्यावर मार्गदर्शन करताना फिर्दोष रुवाल्ला म्हणाले, “महाराष्ट्राच्या तिप्पट भागात पॅसिफिक समुद्रात १२ लाख चौरस फूट प्लास्टिक जमा झाले आहे. कचरा प्रश्नामुळे देवाची उरळी येथे मुलांचे लग्न ठरणे कठीण झाले आहे. त्यामुळे घरातील, सोसायटीतील कचरा व्यवस्थापन करणे अनिवार्य झाले आहे. प्लास्टिकचा वापर टाळण्याची आणि निसर्गाचे संवर्धन करण्याची गरज आहे. आपल्या प्रत्येकाचा त्यात पुढाकार महत्वाचा आहे.”

 

प्रा. राजेंद्र सराफ म्हणाले, “समाज सुधारणेच्या तळमळीने व पर्यावरण संरक्षणासाठी हे लोक काम करत आहेत. सुरुवात स्वतः पासूनच करायला हवी. हे काम फार मोठे होणे गरजेचे आहे. जागरुकता वाढणे आवश्यक आहे. आपण प्रयोगशील झालो, तर प्रत्येकजण खूप काही करू शकतो.” विनय र. र. यांनी प्रास्तविक केले व वक्त्यांचा परिचय करून दिला. शशी भाटे यांनी आभार मानले.

 

पाहा व्हिडीओ:

 


Tags: Good news MorningpuneSolid waste management in houses and housing complexesघर व गृहसंकुलातील घनकचरा व्यवस्थापनपुणेमराठी विज्ञान परिषद
Previous Post

रिक्षाचालकांची भन्नाट कल्पना, उन्हाळ्यात रिक्षा गारेगार ठेवण्यासाठी छतावर हिरवेगार गवत!

Next Post

देशात मायक्रो एटीएमची संख्या तीनपटीने वाढली!

Next Post
MICRO ATM

देशात मायक्रो एटीएमची संख्या तीनपटीने वाढली!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!