मुक्तपीठ टीम
कोरोनासंकटातच नाही तर इतरवेळीही रक्तदाब हा छुपा असा मोठा शत्रू मानला जातो. उच्च रक्तदाबामुळे शरीराचं एकंदरीतच आरोग्य बिघडते. अवयवांवर परिणाम होण्याचा धोका असल्यानं एकप्रकारे शरीर पोखरले जाते. त्यामुळे
आरोग्य तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनी त्यांच्या आहाराची विशेष काळजी घ्यावी. त्यांच्या आहारात संत्री, केळी, पालक आणि ब्रोकोली यासारख्या पोटॅशियमयुक्त फळ-भाज्या असल्याच पाहिजेत.
उच्च रक्तदाबाचा वाढता धोका
• उच्च रक्तदाब हा जीवघेणा आजार मानला जातो.
• ज्यामुळे केवळ हृदयच नव्हे तर मूत्रपिंड आणि मेंदूसंबंधित समस्या उद्भवतात आणि त्या वाढतात.
• ताण, चिंता, अस्वस्थपणा ही प्रमुख कारणं असतात.
• तसेच पौष्टिक नसलेला आहार किंवा अनुवांशिक विकारामुळेही उच्च रक्तदाबाच्या समस्या उद्भवतात.
उच्च रक्तदाबाने कोरोना संकटात वाढता धोका
• कोरोना झालेल्या रूग्णात उच्च रक्तदाबाचा दबाव फुफ्फुसे, हृदय, मूत्रपिंड, मेंदू या अवयवांवर वाढत आहे, ज्यामुळे मृत्यू होत आहे.
• उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनी काही विशिष्ट गोष्टींकडे लक्ष दिल्यास या आजाराने जीव गमावण्याचा धोका बर्याच प्रमाणात कमी होऊ शकतो.
• कोरोनाचा ५ ते १० दिवसांचा उपचाराचा काळ हा अतिशय गंभीर असतो, यावेळी रक्तदाब नियंत्रित ठेवणे खूप महत्वाचे आहे.
मीठाचं काय करायचं?
• उच्च रक्तदाब रूग्णांनी पांढरे मीठ किंचित खावे कारण त्यात सोडियम आहे ज्यामुळे रक्तदाब वाढतो. मीठ कमी केले तर हृदय रोग किंवा स्ट्रोकसारख्या समस्या टाळता येतील.
• लोकांनी दिवसातून फक्त ५ ग्रॅम मीठाचे सेवन करावे.
• सैंधव मीठामध्ये सुमारे ६५ प्रकारचे खनिजे आढळतात जी शरीरासाठी पोषक असतात.
• सैंधव मीठ ताण कमी करण्यास देखील उपयुक्त आहे.
• सैंधव मीठचे सेवन केल्याने शरीरात सेरोटोनिन आणि मेलाटोनिनची पातळी सुधारते, हे दोन्ही हार्मोन्स नियंत्रित करतात.
गाजर हृदय आणि मूत्रपिंडासाठीही गुणकारी!
• गाजरात पोटॅशियम आणि बीटा-कॅरोटीन जास्त प्रमाणात असते.
• ज्यामुळे उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होते.
• गाजराचा रस हृदय आणि मूत्रपिंडाचे कार्य नियंत्रित करण्यास मदत करतो.
• गाजर पेशींमधील सूज कमी करते
• गाजराच्या योग्य सेवनामुळे रक्तदाब सामान्य होतो.
आंबट फळांमुळे उच्च रक्तदाबाचे प्रमाण कमी
• आंबट फळे केवळ रोग प्रतिकारशक्ती वाढवत नाहीत तर उच्च रक्तदाब कमी करण्यास देखील मदत करतात.
• खनिजे आणि जीवनसत्त्वे समृद्ध, ही फळे हृदय निरोगी ठेवतात आणि उच्च रक्तदाब कमी करतात.
• जे रोज कोणत्याही रूपात लिंबूचा रस घेतात आणि दररोज चालतात, त्यांचा रक्तदाब हळूहळू नियंत्रित होतो.
केळींमुळे तणाव कमी!
• पोटॅशियम समृद्ध आहे, त्यामुळे उच्चरक्तदाब नियंत्रित होतो.
• पोटॅशियम शरीरातील सोडियमचे प्रभाव कमी करते आणि तणावही कमी करते.
पिस्ता खाण्यामुळे होतो फायदा!
• पिस्ता हा पोटॅशियमयुक्त असल्यानं रक्तदाब कमी करण्यास मदत करतो.
• पिस्तामध्ये आढळणारे पोषक द्रवपदार्थ सिस्टोलिक आणि डायस्टोलिक रक्तदाब दोन्ही नियंत्रित करतात.