मुक्तपीठ टीम
आज कालच्या काळात आधार कार्ड हे एक महत्त्वाचे कागदपत्र मानले जाते. आधारकार्डच्या आधारावर तुम्ही अन्य कागदपत्रे ही बनवू शकता, तसेच अनेक योजनांचा लाभ घेऊ शकता. इतकेच नाही तर अगदी बँकेत खाते उघडण्यापासून ते सिमकार्ड घेण्यापर्यंत आधार कार्डची आवश्यकता असते. अगदी छोट्या छोट्या कामांसाठी आधार कार्ड मागितले जाते. जिथे ही ओळखपत्राची आवशक्यता असेल तिथे आधार कार्ड दाखवले जाते. त्यामुळे कोणत्याही वेळी आधारकार्डची गरज आपल्याला भासते. अशात जर आपले आधार कार्ड हरवले तर, आपण जणू काही एखाद्या संकटात सापडू. कारण हे आधार कार्ड एखाद्या चुकीच्या व्यक्तीच्या हातात गेले तर, आपला डेटा लीक होण्याची भीती असते. त्यामुळे कधीही आपले आधार कार्ड हरवल्यास सर्वात पहिले ते ब्लॉक करायचे आणि ते ही कुठेही न जाता अगदी घरी बसून होऊ शकते.
एकदा का तुमचे आधारकार्ड लॉक झाले त्यानंतर हॅकर्स तुमच्या परवानगीशिवाय आधार वेरिफिकेशन नाही करू शकत. तुमचा डेटा ही पूर्णपणे सुरक्षित राहील. तसेच आधारकार्ड किंवा अनलॉक करण्यासाठी ही तुम्हाला कोठे बाहेर जाण्याची गरज नाही.
- कसे कराल आधार लॉक
१) आधार कार्ड हरवल्यानंतर सेफ्टी साठी सर्वात पहिल्यांदा ते लॉक करा. आणि यासाठी तुम्हाला १९४७ वर गेट ओटीपी असे लिहून एसएमएस पाठवायचा आहे. यानंतर धारकाच्या फोनवर ओटीपी प्राप्त होईल.
२) या ओटीपीला लॉक यूआयडी आधार नंबर असे लिहून पुन्हा या १९४७ नंबरवर एसएमएस पाठवा. हा मेसेज पाठवल्यानंतर तुमचा आधार नंबर लॉक होऊन जाईल.
- आधारनंबर अनलॉक करण्यासाठी काय करावे
१) आधारनंबर लॉक केल्यानंतर याला तुम्ही अनलॉकही करू शकता. यासाठी तुम्हाला आपल्या रजिस्टर मोबाईल नंबर वरून गेट ओटीपी आधार नंबर लिहून १९४७ या नंबर वर पाठवायचे आहे. याच्यानंतर तुम्हाला एक ओटीपी मिळेल.
२) यानंतर अनलॉक यूआयडी आधारनंबर आणि ओटीपी लिहिल्यानंतर तुम्हाला पुन्हा १९४७ या नंबरवर मेसेज पाठवायचा आहे. फक्त एवढे केल्यानंतर तुमचा आधार नंबर ऑनलाइन होईल.