मुक्तपीठ टीम
युरिक अॅसिडचे प्रमाण वाढणे ही अशी समस्या आहे ज्यासाठी खराब आहार आणि बिघडलेली जीवनशैली जबाबदार आहे. यूरिक अॅसिड वाढण्याची समस्या वयाच्या ४० वर्षांनंतरच उद्भवते, परंतु आजकाल तरुणाईमध्येही ही समस्या वाढताना दिसत आहे. युरिक अॅसिडच्या रुग्णांना थंडीत जास्त त्रास होतो. ज्या लोकांच्या शरीरात यूरिक अॅसिडचे प्रमाण जास्त असते त्यांना सांधेदुखी, जडपणा आणि सूज यासारख्या समस्या जाणवतात. युरिक अॅसिडवर वेळीच उपचार न केल्यास याचा गंभीर परिणाम हा किडनी आणि यकृतावर होऊ शकतो.
युरिक अॅसिड वाढल्यामुळे रुग्णाला हृदयविकाराचा झटका येण्यासारख्या समस्याही उद्भवू शकतात. सांधे आणि पेशींमध्ये युरिक अॅसिड तयार होते, ज्यामुळे जळजळ आणि वेदना होतात. जेव्हा यूरिक अॅसिड तयार होते, तेव्हा ते गुठळ्यांच्या रूपात सांध्यामध्ये जमा होऊ लागते, ज्याला हायपरयुरिसेमिया म्हणतात. जेव्हा यूरिक अॅसिड सामान्य मर्यादेपेक्षा जास्त होते तेव्हा हात, पाय आणि गुडघे दुखतात.
यूरिक अॅसिडची कसे वाढते? त्याची पातळी किती?
- युरिक अॅसिड तयार होणे धोकादायक नाही, ते प्रत्येकाच्या शरीरात तयार होते आणि मूत्रपिंड ते फिल्टर करते आणि मूत्राद्वारे ते काढून टाकते.
- युरिक अॅसिडची पातळी कुणाच्या शरीरात कमी तर कुणाच्या शरीरात जास्त असते.
- त्याची सामान्य पातळी महिलांमध्ये २.४ ते ६.० एमजी/ डीएल आणि पुरुषांमध्ये ३.४ ते ७.० एमजी/ डीएल असते.
- जेव्हा महिला आणि पुरुषांमध्ये यूरिक ऍसिडची पातळी यापेक्षा जास्त असते तेव्हा ते सांध्यामध्ये गोठण्यास सुरवात होते.
- शरीरातील युरिक अॅसिड कसे नियंत्रित करावे?
१. पाण्याचे जास्त सेवन करावे
जर यूरिक अॅसिडची पातळी झपाट्याने वाढत असेल तर पाण्याचे जास्त सेवन करा. यूरिक अॅसिडची पातळी नियंत्रित करण्यासाठी दिवसभरात किमान १० ते १२ ग्लास पाणी प्यावे. जितके जास्त पाणी प्याल तितक्या लवकर किडनी लघवीद्वारे शरीरातील युरिक अॅसिड काढून टाकेल.
२. मांसाहार, बिअर आणि अल्कोहोल पूर्णपणे टाळावे
ज्या लोकांच्या शरिरात यूरिक अॅसिड जास्त असते त्यांनी मांसाहार, बिअर आणि अल्कोहोल टाळावे. या पदार्थांचे सेवन केल्याने शरीरातील डिहायड्रेशनची समस्या वाढू शकते, ज्यामुळे किडनीला शरीरातील यूरिक अॅसिड बाहेर काढण्यात अडचण येते.
३. ७-८ तास पुरेशी झोप घ्यावी
झोपेच्या कमतरतेमुळे समस्या वाढतात. जर शरीरातील युरिक अॅसिडची पातळी ७.० एमजी/ डीएलपेक्षा जास्त झाली असेल, तर त्यासाठी पुरेशी झोप घ्यावी.