मुक्तपीठ टीम
नवीन वर्ष सुरु होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. १ जानेवारी २०२२ पासून नवा महिना आणि नव्या वर्षाला सुरुवात होईल. जगात १ जानेवारीपासून नवीन वर्षाला सुरुवात करतात आणि नवं वर्षाचे स्वागत करून एकमेंकाना शुभेच्छा देतात. मात्र तुम्हाला माहित आहे का? नवं वर्ष १ जानेवारीपासूनच का साजरा केला जातो आणि वर्षाच्या पहिल्या महिन्याला पूर्वी जानूस का म्हणायचे?
जानेवारी हे महिन्याचे नाव का ठेवण्यात आले?
- रोमच्या देवाचे नाव जानुस होते, ज्याच्या नावावरून जानेवारी महिन्याचे नाव जानुस ठेवण्यात आले.
- पुढे जानुसला जान असे नाव पडले.
- जानुस व्यतिरिक्त मंगळ नावाचा एक महिना होता.
- मार्स हे युद्धाच्या देवतेचे नाव आहे.
- पुढे मार्सला मार्च असे नाव पडले.
१० महिने जुने वर्ष
- सर्वात जुन्या कॅलेंडरमध्ये वर्षात १० महिने होते, परंतु नंतर रोम कॅलेंडर तयार केले गेले ज्यामध्ये वर्षात १२ महिने होते.
एका वर्षात ३१० दिवस होते
- शतकांपूर्वी, जेव्हा वर्षात १० महिने होते, तेव्हा संपूर्ण वर्षात केवळ ३१० दिवस होते.
- त्या काळी आठवडय़ात ८ दिवस असायचे.
- परंतु रोमचा शासक, ज्युलियस सीझर याने रोमन कॅलेंडरमध्ये बदल केले, त्यानंतर १२ महिन्यांचे वर्ष होते, ज्यामध्ये ३६५ दिवस निश्चित केले गेले.
- सीझरला खगोलशास्त्रज्ञांकडून समजले की पृथ्वी सूर्याभोवती ३६५ दिवस आणि सहा तासांत फिरते.
- म्हणून सीझरने वर्षाचे दिवस वाढवले.
- त्याचवेळी १ जानेवारीपासून वर्ष सुरू झाले.
या दिवशी भारतात नवीन वर्ष साजरे केले जाते
भारतासह संपूर्ण जगात, ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीनंतर कॅलेंडर बदलते आणि नवीन वर्ष जानेवारीपासून सुरू होते, परंतु भारतातील लोक त्यांच्या धार्मिक रितीरिवाजानुसार नवीन वर्ष वेगवेगळ्या दिवशी साजरे करतात. पंजाबमध्ये, नवीन वर्षाची सुरुवात बैसाखी म्हणून होते, जी १३ एप्रिल रोजी असते. दुसरीकडे, शीख अनुयायी नानकशाही कॅलेंडरनुसार मार्चमध्ये होळीच्या दुसऱ्या दिवसापासून नवीन वर्ष साजरे करतात. जैन धर्माचे अनुयायी दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी नवीन वर्ष साजरे करतात.