मुक्तपीठ टीम
पंजाब नॅशनल बँकेने ग्राहकांकडून 2020-21 मध्ये सुमारे 170 कोटी रुपये कमवले आहेत. माहिती अधिकाराच्या माध्यमातून ही माहिती समोर आली आहे. ही कमाई खात्यांमध्ये आवश्यक कमीत कमी बॅंक बॅलेन्स न ठेवल्याबद्दलच्या शुल्कांमधून बँकेने मिळवली आहे. बँका एका आर्थिक वर्षात तिमाही आधारावर असे शुल्क आकारतात.
2020-21 च्या एप्रिल-जून कालावधीत तिमाही सरासरी शिल्लक (क्यूएबी) 35.46 कोटी रुपये (बचत आणि चालू खात्यावर दोन्ही) होते. आर्थिक वर्ष 2021 च्या दुसऱ्या तिमाहीत असे कोणतेही शुल्क आकारले गेले नाही.
माहिती अधिकारातून झाली बँकेची कमाई उघड
- मध्य प्रदेशातील सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर गौर यांना दिलेल्या माहिती अधिकाराखालील उत्तरात पुढील माहिती उघड झाली आहे.
- तिसऱ्या आणि चौथ्या तिमाहीत क्यूएबी नॉन-मेंटेनन्स शुल्क अनुक्रमे 48.11 कोटी आणि 86.11 कोटी रुपये होते.
- बँकेने वर्षभरात एटीएम व्यवहार शुल्क म्हणून 74.28 कोटी रुपये कमावले.
- यापूर्वी 2019-20 मध्ये ते 114.08 कोटी रुपये होते. बँकेने म्हटले आहे की, त्यांनी आयबीएचे सूचना पत्र आणि सरकारी मार्गदर्शक तत्त्वांनुसार 2020-21 च्या पहिल्या तिमाहीत एटीएम व्यवहार शुल्क माफ केले होते.