मुक्तपीठ टीम
दरवर्षी २६ जानेवारीला भारत प्रजासत्ताक दिन साजरा करतो. २६ जानेवारी १९५० ला याच दिवशी भारतीय राज्यघटना लागू झाली. यावेळी भारतीय २६ जानेवारीला ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहेत. देशाच्या स्वातंत्र्यानंतर, भारतीय संविधानाची निर्मिती झाली. भारतीय राज्यघटनेची मूळ प्रत गॅस चेंबरमध्ये ठेवण्यात आली आहे. पण संविधान संग्रहालयात ठेवण्याऐवजी गॅस चेंबरमध्ये का ठेवण्यात आले आणि हा गॅस चेंबर कुठे आहे? या रंजक गोष्टींबद्दल नक्कीच जाणून घ्या.
२६ जानेवारीला संविधान का लागू झाले?
- भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी, संविधान सभेने भारतीय राज्यघटना स्वीकारली, परंतु त्याची अंमलबजावणी आणि दरवर्षी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्याची तारीख २६ जानेवारी निश्चित करण्यात आली.
- यामागे महत्वाचे कारण म्हणजे संविधान लागू करण्यासाठी २६ जानेवारीची निवड करण्यात आली कारण या दिवशी १९३० मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने भारताला पूर्ण स्वराज म्हणून घोषित केले.
- त्यामुळे २० वर्षांनंतर याच दिवशी भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी करून भारत हा लोकशाही आणि संविधानप्रधान देश असल्याचा संदेश संपूर्ण जगाला देण्यात आला.
भारताची राज्यघटना इतर देशांपेक्षा वेगळी
- भारताची राज्यघटना एका बाबतीत जगातील देशांपेक्षा वेगळी आहे आणि ती म्हणजे तिची मूळ प्रत.
- भारतीय राज्यघटना हाताने बनवलेल्या कागदावर लिहिलेली आहे.
- देशाच्या संविधानाच्या मूळ प्रतीच्या प्रत्येक पानावर सोन्याच्या पानांच्या फ्रेम्स बनवल्या आहेत.
- प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीच्या पानावर एक कलाकृतीही तयार करण्यात आली आहे.
राजेंद्र प्रसाद यांनी जाहीर केले होते
- भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी २१ तोफांच्या सलामीनंतर भारतीय राष्ट्रध्वज फडकवून भारतीय प्रजासत्ताका दिवसाच्या ऐतिहासिक घोषणा केली.
- स्वातंत्र्यानंतर ८९४ दिवसांनी भारत स्वतंत्र राज्य झाला.
संविधानाची मूळ प्रत गॅस चेंबरमध्ये ठेवली जाते
- भारतीय राज्यघटनेची मूळ प्रत नायट्रोजन गॅसच्या चेंबरमध्ये ठेवण्यात आली आहे.
- संसद भवनाच्या वाचनालयात हा गॅस चेंबर बांधण्यात आला आहे.
- ज्या वेळी भारतात संविधान तयार झाले, त्या वेळी हे गॅस चेंबर वैज्ञानिक पद्धतीने तयार केले गेले.
यासाठी संविधान चेंबर बांधण्यात आले
- भारतीय राज्यघटनेची मूळ प्रत प्रथम फ्लॅनेलच्या कपड्यात ठेवण्यात आली होती, परंतु संविधानाच्या प्रती सुरक्षित नसल्याचे आढळून आले.
- भारतीय संविधान काळ्या शाईने लिहिलेले आहे.
- शाईचे ऑक्सिडायझेशन होते, म्हणजेच लिखित शाईचा रंग कालांतराने फिका पडू लागतो, त्यामुळे याला खर्या अर्थाने आर्द्रतेची गरज असते.
- संविधानाच्या प्रतीसाठी प्रति घनमीटर ५० ग्रॅम आर्द्रता आवश्यक आहे.
- म्हणून, हवाबंद कक्ष अशा प्रकारे तयार केला गेला की त्यात आर्द्रतेचे विशिष्ट प्रमाण राखले जाईल.
- शास्त्रज्ञांनी १९९४ मध्ये संसद भवनाच्या लायब्ररीमध्ये एक चेंबर तयार केले, ते अधिक सुरक्षित करण्यासाठी, अशा गॅसचा वापर करण्यात आला, ज्याचा कागद आणि शाईवर परिणाम होत नाही.
- यासाठी चेंबरमध्ये नायट्रोजन वायूचा वापर करण्यात आला.
दर दोन महिन्यांनी गॅस चेंबर तपासले जाते
- भारतीय राज्यघटनेच्या रक्षणासाठी, दरवर्षी चेंबरमधील नायट्रोजन वायू रिकामे करून त्याची कसून चाचणी केली जाते.
- दर दोन महिन्यांनी चेंबरही तपासले जाते.
- याशिवाय सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे सतत देखरेख ठेवली जाते.