मुक्तपीठ टीम
कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना झाल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त झाला. मात्र, कोल्हापूरकरांनी महाराजांचा महिमा मांडण्यासाठी वेगळीच शक्कल लढवली. शिवद्रोह्यांना कोल्हापुरात दणक्यात पण सकारात्मक उत्तर देण्यात आलं. त्यासाठी तिथं ४०० चौरस फुटांचा भव्य शिवफलक उभारण्यात आला. हा एवढा मोठा भव्य शिवफलक उभारणे काही सोप नव्हते. शिवसेनेचे माजी आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवप्रेमी एकवटले. त्यांनी अशक्य ते शक्य, अवघड ते सोपे केले. तुम्हीच पाहा कसा उभारला गेला भव्य शिवफलक…
कोल्हापूरमध्ये छत्रपती शिवाजी चौकात महाआरती करून शिवरायांचे चित्र असलेला भव्य फलक उभारला गेला आणि आसमंत शिवरायांच्या जयघोषाने दणाणला.
कोल्हापूरमध्ये कर्नाटकात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ संताप व्यक्त होत आहे. रोजच वेगवेगळ्या मार्गाने तो व्यक्त होत असतानाच महाराजांची थोरवी जगासमोर सकारात्मकरीत्या मांडण्यासाठी छत्रपती शिवाजी चौकात १०० फूट उंची आणि ४० फूट रुंदीचा भव्य फलक तयार करण्यात आला. सोमवारी रात्री तो चारशे चौरस फुटांचा भव्य शिवफलक क्रेनने उभारण्यात आला. तिथं जमलेल्या शिवप्रेमींनी शिवरायांचा जयघोष केला. शिवरायंची थोरवी गाणारी आरती, इतर गीते सादर करण्यात आली.
कोल्हापुरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकांमध्ये शिवाजी महाराज की जय ,जय भवानी जय छत्रपती शिवाजी महाराजाचा जयघोष सुरु होता. नेत्रदीपक लेसर व साऊंड सिस्टिमचा नाद, शिवभक्तांचा सळसळता उत्साह यामुळे वातावरण शिवमय झाले होते. कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी करण्यात आलेला हा सकारात्मक प्रयत्न शिवसेना नेते, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.
आंदोलनास हरकत नाही पण साऊंड सिस्टिम वाजवण्यास गुन्हे नोंद करण्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला होता. मात्र शिवप्रेमींना दणक्यातच करण्याचे ठरवल्याने ते आणि पोलिसांमध्ये तणाव निर्माण झाला होता. मात्र, अखेर त्यावरही मार्ग निघाला.
पाहा व्हिडीओ:
जबरदस्त इलेक्ट्रिक कार, फुल चार्जवर हजार किलोमीटर धावणार!