Tuesday, June 3, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“सचिन वाझे माफीचा साक्षीदार कसा होऊ शकतो?”

May 30, 2022
in featured, कायदा-पोलीस
0
sachin waze

अॅड. सुनिल चव्हाण

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित भ्रष्टाचाराच्या आरोपप्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे हा माफीचा साक्षीदार बनला आहे. सीबीआयने वाझेला माफीचा साक्षीदार होण्यासाठी मंजुरी दिली आहे. माफीचा साक्षीदार बनल्यानंतर वाझेला आवश्यक सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडाव्या लागणार आहेत. मात्र माफीचा साक्षीदार म्हणून एखाद्या आरोपिस उभे करताना काय निकष असावेत हे जाणून घेणे महत्वाचं आहे.

माफीचा साक्षीदार कसा असावा?

  • जिथे गुन्हा घडताना गुन्हेगारांशिवाय कोणतीही दुसरी व्यक्ती घटनास्थळी उपस्थित नसते. न्यायालयात गुन्हा सिद्ध करण्यासाठी सबळ पुरावा आणि साक्षीदारांची गरज असते. ज्या गुन्हेगारांना शिक्षा करण्यासाठी कोणताही स्वतंत्र पुरावा आणि साक्षीदार उपलब्ध नसतो, अशा वेळी माफीचा साक्षीदार मदतीस येतो.
  • माफीचा साक्षीदार म्हणजे अशी व्यक्ती जी गुन्हा करते, गुन्हा होण्यास प्रवृत्त करते, गुन्हेगाराला गुन्ह्यांत मदत करते किंवा चिथावणी देते, गुन्हेगाराला संरक्षण देते किंवा त्यांना गुन्ह्याच्या स्थानापासून पळून जाण्यास मदत करते. माफीचा साक्षीदार म्हणजे जो व्यक्ती गुन्ह्याचा साक्षीदार आहे, बेकायदेशीर कृतीशी किंवा गुन्ह्याशी जोडलेला आहे, त्याचा गुन्ह्यामध्ये सक्रिय किंवा असक्रिय सहभाग आहे आणि त्या व्यक्तीने या गुन्ह्यात त्याच्या सक्रिय किंवा असक्रिय सहभागाची कबुली दिली आहे.
  • सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार नसावा, इतर कोणत्याही गंभीर गुन्ह्यात तो मुख्य आरोपी नसावा.
  • न्यायालयाचे न्यायाधीश आरोपीस माफीचा साक्षीदार करण्याची परवानगी देऊ शकतात. ही परवानगी केवळ ज्या गुन्ह्यास सात वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कारावासाची शिक्षा असलेल्या प्रकरणात दिली जाऊ शकते पण हे गुन्हे आर्थिक स्वरूपाचे नसावेत अशी मार्गदर्शक तत्त्वे आहेत.
  • माफीच्या साक्षीदारावर सहसा विश्वास ठेवणे धोकादायक असू शकते. काही वेळा हा माफीचा साक्षीदार उलटा फिरू शकतो आणि स्वतः साक्ष बदलू शकतो किंवा खोटी शपथ घेऊ शकतो. माफीच्या साक्षीदाराने जर खोटी साक्ष किंवा पुरावा दिला तर त्याला खोटी साक्ष देण्याच्या गुन्ह्याखाली अटक व शिक्षा होऊ शकते.

माफीचा साक्षीदार
अनिल देशमुख यांना अटक झालेल्या प्रकरणात CBI सचिन वाझे यास माफीचा साक्षीदार करण्यासाठी अर्ज करणार असल्याची बातमी वाचनात आली. त्यासाठी माफीचा साक्षीदार म्हणून एखाद्या आरोपिस उभे करताना काय निकष असावेत याविषयी थोड़ी माहिती घेवूया.

— Adv Sunil Chavan (@AdvSunilChavan1) May 29, 2022

अनिल देशमुख प्रकरणातील सचिन वाझे या आरोपीविषयी काही तथ्ये…

  • सचिन वाझे हा मनसुख हिरेन प्रकरणात मुख्य आरोपी असून त्याच्यावर खून करणे हा आरोप आहे.
  • या प्रकरणात सीबीआय, ईडी आणि आयकर विभागाने १०० पेक्षा जास्त धाडी टाकल्या आहेत त्यात काही पुरावा मिळाला नाही का?
  • या प्रकरणात अनिल देशमुख यांच्या विरुद्ध काहीही पुरावा नसल्याने माफीचा साक्षीदार म्हणून वाझे याला उभे करत नाही ना?
  • यात राजकीय सूड उगावण्यासाठी सीबीआयचा वापर होत नाही ना?
  • या प्रश्नांची उत्तरे जनतेला माहित आहेत.

क्रोनालॉजी समजून घ्या…

  1. अंबानींचे निवासस्थान असलेल्या अँटेलियासमोर स्फोटक जिलेटिनच्या कांड्या ठेवल्या गेल्या.
  2. त्यातील माहितगार मनसुख हिरेन याची हत्त्या.
  3. दोन्ही प्रकरणी सचिन वाझे याला अटक, परमबीर सिंग यांचा सहभाग उघड.
  4. परमबीर सिंग यांची बदली
  5. परमबीर सिंग दिल्ली दौरा, एका भाजपा नेत्याची भेट.
  6. परमबीर यांचे १०० कोटी वसूली बाबत मुख्यमंत्री यांना पत्र.
  7. परमबीर सिंग यांची आणि जयश्री सदावर्ते यांची अनिल देशमुख यांच्या विरोधात याचिका.
  8. उच्च न्यायालयाचे सीबीआयला एफआयआर दाखल करून तपास करण्याचे निर्देश.
  9. ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाच्या अनिल देशमुख यांच्यावर धाडी आणि शेवटी अटक.

 

(अॅड. सुनिल चव्हाण हे १७ वर्षे ठाणे जिल्हा सत्र न्यायालय आणि इतर न्यायालयांमध्ये सक्रिय आहेत. अभ्यासपूर्ण युक्तिवादासाठी ते ओळखले जातात.)

ट्विटर – @AdvSunilChavan1

 

Adv. Sunil Chavan


Tags: anil deshmukhCBIcrimeEDparambir singhsachin wazeअनिल देशमुखईडीकायदापरमबीर सिंगसचिन वाझेसीबीआय
Previous Post

जळगावात राष्ट्रीय आरोग्य अभियानात वैद्यकीय पदांवर भरती, अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस

Next Post

कालाटॉप…ट्रेकिंग मस्त!

Next Post
कालाटॉप…ट्रेकिंग मस्त!

कालाटॉप...ट्रेकिंग मस्त!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!