मुक्तपीठ टीम
महिला घर चालवताना काही पैशाची बचत करतात. त्यांना पतीकडून काही पैसे मिळतात. काही त्या छोट्या मोठ्या कामांमधून कमवतात. वाचवतात. मुलांना घरी येणार्या काही नातेवाईकांकडून पैसे देखील मिळतात. तेही बऱ्याचदा गृहिणीच्या बचतीत जातात. या रकमेला आयकर विभागाकडून त्या महिलेचे उत्पन्न मानले जाऊ शकत नाही, असा निकाल आग्रा येथील आयकर अपीलेट न्यायाधिकरणाने दिला आहे.
गृहिणी पैशाची बचत कशी करतात?
• गृहिणी असलेल्या महिलांवर गृह व्यवस्थापनाची जबाबदारी असते.
• दररोज घरातील शेकडो कामे केली जातात.
• त्यांचे काम सकाळी सुरू होते आणि संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू राहते. दरम्यान, ती रेशन घेते, दूध, अंडी, फळे, भाज्या अशा कित्येक गोष्टी ती खरेदी करते.
• घरातील काही कामे करण्यासाठी प्लंबर आणि इलेक्ट्रिशियन लागतो.
• अशा कामावर बोलणी करुन ती काही पैशाची बचत करते.
• अशा प्रकारे गृहिणी हजारोच नव्हे तर काही वेळा लाख रुपये वाचवते.
• अशा परिस्थितीत यावर प्रश्न उपस्थित होतो. या उत्पन्नावर कर लावला जाईल का?
नोटाबंदीत समोर आली गृहिणींची बचत
सन २०१६ मध्ये नोटाबंदी आली तेव्हा अशी बचत समोर आली. अशाच एका गृहिणीने तिच्या बचतीतून २,११,५०० रुपयांच्या जुन्या नोटा बँकेत जमा केल्या. ही रक्कम त्या महिलेने आपली बचत म्हणून सांगितले. प्राप्तिकर अधिकार्यांनी या रकमेस जास्तीचे उत्पन्न मानून त्यावर आयकर मिळवून देण्याची मागणी केली. यानंतर महिलेने आयटीएटीची मदत घेतली.
आयटीएटीचा गृहिणींसाठी फायद्याचा निकाल
आग्रा येथील आयकर न्यायाधिकरणाचे न्यायिक सदस्य ललित कुमार आणि लेखा सदस्य डॉ. मीठा लाल मीना म्हणाले की,
१. नोटाबंदीच्या वेळी या महिलेने जमा केलेल्या २,११,५०० रुपयांची रक्कम अडीच लाखांच्या मर्यादेतील आहे.
३. त्यामुळे या उत्पन्नाला अतिरिक्त उत्पन्न मानले जाऊ शकत नाही.
४. ते उत्पन्न नाही. यावर कोणताही कर आकारला जाणार नाही.
५. महिलेने तिचे पती, मुले व नातेवाईकांकडून मिळणाऱ्या थोड्या पैशांची भर घालत ही रक्कम वाचवली आहे.
६. यासंदर्भात संपूर्ण माहिती आणि तपशीलही देण्यात आले.
७. त्यामुळे कोणतेही कर प्राधिकरण त्यावर कर वसूल करू शकत नाही.
८.या प्रकरणात महिलेला उत्पन्नाचे कोणतेही साधन नव्हते असे म्हणता येणार नाही. कारण असे मानले जाते की गृहिणी गेली अनेक वर्षे कुटुंबात अनेक आर्थिक कामे करत असते. परंतु ही रक्कम कोणत्याही व्यवसायात किंवा इतर मार्गातील नाही आहे.