मुक्तपीठ टीम
आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत घटलेल्या कमाईमुळे अडचणीत आलेल्या होंडा मोटर्सने आपल्या कर्मचाऱ्यांना बोनसबाबत मोठा फटका दिला आहे. जपानी कार निर्माता कंपनी होंडा मोटर्सने आपल्या कर्मचार्यांना ‘ओव्हरपेड’ म्हणजेच बोनसपेक्षा जास्त पैसे दिले आहेत आणि आता कंपनी संपूर्ण पैसे परत करण्याची मागणी करत आहे. अमेरिकेतील होंडाच्या कर्मचार्यांमध्ये चांगला बोनस मिळाल्याच्या आनंदाला सीमा नव्हती. त्यानंतर जपानी कार निर्मात्याने मेरीसविले, ओहायो येथील आपल्या कर्मचार्यांना एक मेमो पाठवला आणि त्यांना कळवले की कंपनीने बोनसच्या रकमेपेक्षा जास्त पैसे दिले आहेत आणि त्यांना ते परत करण्यास सांगितले गेले.
होंडाने हा निर्णय घेण्यामागे काय आहे कारण?
- आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत घटत्या कमाईमुळे नाराज, होंडा मोटर्सने आपल्या कर्मचाऱ्यांना सांगितले आहे की त्यांना ‘ओव्हरपेड’ बोनस देण्यात आला आहे, जो मागे घेतला जाईल.
- सध्याच्या वाढत्या महागाईच्या काळात कर्मचाऱ्यांसाठी बोनस हा मोठा आधार मानला जातो.
- अशा स्थितीत कर्मचाऱ्यांच्या खात्यावर आलेल्या बोनसचा मोठा हिस्सा परत करण्याच्या आदेशाला विरोध आणि निषेध व्यक्त होत आहे.
- होंडा मोटर्सला मागील वर्षाच्या तुलनेत मागील तिमाहीत नफ्यात सुमारे ५ टक्क्यांनी घट झाली आहे.
याबाबत विचारणा केली असता कंपनीने मेमो पाठवल्याची पुष्टी केली आहे. कंपनीने सांगितले की त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस रकमेचा काही भाग परत करण्यास सांगितले आहे. कंपनीचे हे पाऊल पूर्णपणे कायदेशीर असल्याचा दावाही केला आहे. कंपनीच्या अधिकार्यांनी मात्र किती बोनस दिला आणि कर्मचार्यांना किती हिस्सा परत करायचा हे सांगण्यास नकार दिला.