मुक्तपीठ टीम
होंडा म्हटले की कार, बाइक ग्राहकांच्या मनात एक विश्वास जागतो. याच होंडाने आता आपल्या हजारो गाड्या रिकॉल केल्या आहेत. म्हणजे त्या गाड्यांमधील काही तांत्रिक समस्या लक्षात आल्यामुळे त्यांना दुरुस्तीसाठी परत बोलवले आहे. त्या होंडाकडून कंपनीच्या खर्चाने समस्यामुक्त करण्यात येणार आहे.
गेली अनेक वर्षे भारतातील कोट्यावधी ग्राहकांच्या मनामध्ये स्थान निर्माण करणाऱ्या कंपन्यांपैकी होंडा आहे. होंडाची कार असो वा बाईक या उच्च दर्जा आणि श्रेणींच्या असतात. अशातच आता ऑटोमोबाइल प्रमुख होंडा कार्स इंडियाने आपल्या ७७ हजार ९५४ कार परत मागवल्या आहेत. ज्यात विविध मॉडल्सचा समावेश आहे. कंपनी या कारमधील फ्यूएल पंप बदलणार आहे.
होंडाच्या गाड्यांमध्ये काय आहे समस्या?
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कारच्या फ्यूएल पंपमध्ये लावण्यात आलेले इम्पेलर्स खराब होऊ शकते. सोबत इंजिन थांबू शकते. किंवा पुन्हा सुरूच होत नाही. त्यामुळे आता कंपनीने याला बदलण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे. कंपनीने एका निवेदनात सांगितले की, ही प्रक्रिया १७ एप्रिल २०२१ पासून सुरू होणार आहे. हा बिघाड टप्प्याटप्याने कंपनीच्या खर्चाने दुरुस्त करून दिला जाणार आहे.
सध्या सुरक्षा नियमामुळे डिलरशिपवर मर्यादित कर्मचारी आहेत. त्यामुळे ग्राहकांनी जाण्याआधी वेळ ठरवून जावे.
होंडाने हे मॉडेल्स केले रिकॉल…
• होंडा अमेज
• फोर्थ जनरेशन सिटी
• डब्ल्यूआर-व्ही
• जॅज
• सिविक
• बीआर वी
• सीआरव्ही