मुक्तपीठ टीम
थंडीनंतर वसंत ऋतूचे आगमन म्हणजे पुनर्निर्मितीचा, नूतनीकरणाचा, पुन्हा नव्याने वाढ होण्याचा काळ. महामारीच्या दोन वर्षांनंतर भारतीयांमध्ये नेहमीपेक्षा वेगळ्या, अनोख्या आणि प्रायोगिक शैलीची आवड निर्माण होत आहे, जिची मुळे निसर्गात खोलवर रुजलेली आहेत. या ऋतूमध्ये लोकांना ताजेपणा हवा असेल आणि घर कसे असावे, ताजेपणा कसा निर्माण केला जावा याविषयीच्या काटेकोर कल्पना दूर सारल्या जातील.
नैसर्गिक धाग्यांसाठी भारतातील सर्वात मोठी आणि एकमेव फार्म-टू-फॅशन डिजिटल इकोसिस्टिम रेशामंडीने आपल्या नुकत्याच प्रकाशित केलेल्या ट्रेंड फोरकास्ट रिपोर्टनुसार, २०२३ च्या वसंत ऋतूमध्ये घरगुती सजावटीमध्ये वनस्पतींनी प्रेरित, प्रफुल्लित आणि कलेचा वारसा दर्शवणाऱ्या थीम्स, रंग व मोटिफ्सचे प्रभुत्व राहील. टेबल कव्हर्स, रनर्स, मॅट्स, नॅपकिन्स, टॉवेल्स, बेडशीट्स, क्विल्ट्स, कुशन्स, पिलो कव्हर्स इत्यादींचा यामध्ये समावेश आहे. लोककला/ आदिवासी रूपांकनांची आधुनिक व्याख्या ‘निओ हेरिटेज‘ (नवा वारसा), आनंददायी, प्रफुल्लित वातावरण दर्शवणारे ‘प्लेफुल पॅरॅडाईस‘ आणि निसर्गासोबत गहिरे नाते दर्शवणारे ‘बोटॅनिकल ब्लिस‘ या प्रमुख थीम्स असणार आहेत.
२०२३ च्या वसंत ऋतूमध्ये घरगुती सजावटीच्या ट्रेंड्सवर रेशामंडीच्या नुकत्याच जारी करण्यात आलेल्या अनुमानांनुसार, ग्राहक अजून जास्त उठावदार व चमकदार प्रिंट आणि रंगांना पसंती दर्शवतील.
२०२३ च्या वसंत ऋतूमध्ये प्रमुख ट्रेंड्स हे असतील:
- या ऋतूमध्ये चमकदार, न्यूट्रल आणि म्यूटेड रंग जास्त पसंत केले जातील. बेस रंगांमध्ये सौम्य रंगांमध्ये व्हिस्पर व्हाईट, आईस मेल्ट, क्लाऊड डान्सर आणि चमकदार रंगांमध्ये टोमॅटो प्युरी, स्पाईस रूट आणि ट्रेंडिल यासारखे रंग असतील. सर्व थीम्समध्ये कूल ब्ल्यू, सेट सेल आणि मेडिटेरियन ब्ल्यू हे क्रॉसओव्हर रंग वापरले जातील.
- तपशीलांबद्दल बोलायचे झाल्यास, बोटॅनिकल ब्लिस थीममध्ये स्ट्राइप्स, पायपिंग आणि फ्लॅनगेस, डिजिटल प्रिंटिंग, कट आणि शिवलेल्या पॅटर्न्स जास्त चालतील, प्लेफुल थीममध्ये ट्रीम्स, क्वर्की बटन्स, कांथा टाके, ऍबस्ट्रॅक्ट पॅचवर्क पसंत केले जाईल. दुसरीकडे लोककला प्रेरित थीम्समध्ये कट आउट, रनिंग टाके आणि ट्रायबल स्ट्राइप्स असणार आहेत.
- वनस्पती, प्राणी ही वसंत ऋतूची वैशिष्ट्ये आहेत. सर्व थीम्समध्ये हे घटक दिसून येतील. इकत, फुलकारी, एजटेक प्रिंट्स यासारख्या पारंपरिक डिझाइन्स लोकप्रिय होतील.
- लिनन, फ्लॅक्स, ज्यूट आणि हेम्प यासारखी कापडे या सीझनमध्ये लोकप्रिय होतील, ही कापडे आपली मुळे आणि पुन्हा वळून निसर्गाशी नाते जोडण्याची प्रतीके आहेत. लहरदार विणकाम पॅटर्न्स, सुझानी कशिदाकारी, पेबल स्टिच, एप्लिक आणि लेझर कट आउट यांना देखील चांगली मागणी असेल.
कपडे आणि कापडांचे एक नवे जग निर्माण करण्यासाठी आणि उद्योगांमध्ये नवे परिवर्तन घडवून आणण्यासाठी रेशामंडी पर्यावरणानुकूल कपडे, फॅब्रिक आणि होम फर्निशिंगसाठी सातत्याने काम करत आहे. त्यांचा उद्देश ग्राहक आणि उद्योगांना अशा स्थिर, टिकाऊ सुविधा पुरवणे आहे ज्या सहजपणे आणि योग्य किमतींना उपलब्ध असतील.
रेशामंडीने आपली सुरुवात सिल्कवर लक्ष केंद्रित करत केली होती आणि त्यानंतर त्यांनी कॉटन, ज्यूट आणि बनाना या वेगवेगळ्या नैसर्गिक फायबर्समध्ये विस्तार केला आहे. आज ही संघटना नैसर्गिक फायबर्सच्या संपूर्ण इकोसिस्टिमचे व्यवस्थापन करते, शेतकरी, रीलर्स, विणकर, रिटेलर्स, मिल्स, उत्पादक, निर्यातक, कॉर्पोरेट्स, डिझायनर्स आणि अगदी शेवटचे ग्राहक अशा अनेक वेगवेगळ्या ग्राहकांना आपल्या सेवा प्रदान करते.