Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

केंद्रीय गृहमंत्री शाहांचं मुख्यमंत्री ठाकरेंना पुन्हा खोटे ठरवत आव्हान! “हिंमत असेल तर राजीनामा देऊन लढा, भाजपा तयार आहे!”

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा पुण्यातून आघाडी सरकारवर आक्रमक हल्ला

December 19, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
Amit Shah Pune 19-12-21

मुक्तपीठ टीम

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी पुण्यातून राज्यातील आघाडी सरकारवर जोरदार हल्ला केला. त्यातही त्यांनी एकेकाळचा मित्र पक्ष असणाऱ्या शिवसेनेवर आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कडवट टीका केली. शाह यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनाच खोटे ठरवण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, “दोन पिढ्या ज्यांच्याविरोधात लढले, त्यांच्याच मांडीवर जाऊन ते बसले. २०१९ मध्ये महाराष्ट्रात निवडणुका होत्या. त्यावेळी मी स्वत: इथे आलो होतो. मी स्वत: शिवसेनेशी संवाद साधला. तेव्हा फडणवीसांच्या नेतृत्वातच निवडणुका लढायचं ठरलं होतं. मुख्यमंत्रीही भाजपचाच होणार हे सुद्धा ठरलं होतं. पण शिवसेना फिरली. त्यांनी हिंदुत्वाशीही तडजोड केली. दोन पिढ्यांपासून ज्यांच्याविरोधात लढले त्यांच्याच मांडीवर जाऊन बसेल आणि म्हणतात आम्ही असं म्हणालोच नाही.

अमित शाह एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलं, “हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्या. तिन्ही पक्षांनी एकत्र लढावं आणि भाजपाला हरवून दाखवा!”

 

अमित शाहांनी पुन्हा उद्धव ठाकरेंना खोटे ठरवले!

  • ‘ते म्हणतात मी खोटं बोलत आहे. ठिक आहे. मी खोटं बोलतोय असं मानू.
  • पण तुमच्या सभेच्या पाठी जे बॅनर लागत होते त्यावर तुमच्या फोटोची आणि मोदींच्या फोटोची साईज पाहा. तुमची केवळ एक चतुर्थांश होती.
  • प्रत्येक भाषणात तुम्हाला मोदींचं नाव घ्यावं लागत होतं.
  • तुमच्या उपस्थितीत मी आणि मोदींनी सांगितलं होतं फडणवीसांच्या नेतृत्वात निवडणुका लढल्या आहेत आणि एनडीए निवडणूक जिंकल्यानंतर फडणवीस मुख्यमंत्री होतील.
  • पण तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं. तुम्ही आमच्यासोबत विश्वासघात केला सत्तेत बसलात.

 

सत्ता पर बैठने की लालच में शिवसेना ने महाराष्ट्र की जनता के साथ विश्वासघात किया।

इन्होने सत्ता के लिए अपनी विचारधारा के साथ समझौता कर लिया और दो पीढ़ी से ये जिनका विरोध करते थे, उनकी ही गोदी में जाकर बैठ गए। pic.twitter.com/BrmK7mKbs1

— Amit Shah (@AmitShah) December 19, 2021

अमित शाहांच्या या विधानांमुळे त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खोटे ठरवल्याचे मानले जाते. शिवसेना भाजपा युती तुटण्यासाठी उद्धव ठाकरेंना खोटे ठरवले जाण्याचा मुद्दाच कळीचा ठरला होता. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी ठाकरे घराण्यावर प्रथमच कुणी खोटेपणाचा आरोप केल्याचं म्हटलं होतं. अशा खोटे बोलणाऱ्यांबरोबर आपल्याला राहायचं नाही, असं त्यांनी बजावलं होतं. अमित शाहांनी मातोश्रीतील बंद दाराआढील चर्चेत अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता. पण ते फिरलेत, असा उद्धव ठाकरेंनी दावा केला होता. आता अमित शाहांनी पुन्हा तोच आरोप केला आहे.

 

ज्यांच्याशी लढले त्यांच्याच मांडीवर बसले!

  • २०१९मध्ये महाराष्ट्रात निवडणुका होत्या. त्यावेळी मी स्वत: इथे आलो होतो.
  • मी स्वत: शिवसेनेशी संवाद साधला. तेव्हा फडणवीसांच्या नेतृत्वातच निवडणुका लढायचं ठरलं होतं. मुख्यमंत्रीही भाजपचाच होणार हे सुद्धा ठरलं होतं.
  • पण शिवसेना फिरली. त्यांनी हिंदुत्वाशीही तडजोड केली.
  • दोन पिढ्यांपासून ज्यांच्याविरोधात लढले त्यांच्याच मांडीवर जाऊन बसेल.

 

हिंमत असेल तर राजीनामा द्या, लढून दाखवा!

  • लोकमान्य टिळक म्हणालेले, स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे.
  • शिवसेना म्हणते, सरकार आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे.
  • मी म्हणतो झालात मुख्यमंत्री. हिंमत असेल तर राजीनामा द्या. तिन्ही एकत्र लढा. भाजपाचा कार्यकर्ता तयार आहे.

 

लोकमान्य बाल गंगाधर तिलक जी ने कहा था कि स्वराज्य मेरा जन्मसिद्ध अधिकार है और हम इसे लेकर रहेंगे लेकिन शिवसेना वाले कहते हैं कि सत्ता मेरा जन्मसिद्ध अधिकार है और मैं इसे किसी भी प्रकार से लेकर रहूँगा। pic.twitter.com/dYQIOswtIf

— Amit Shah (@AmitShah) December 19, 2021

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीने ‘डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर’चा अर्थ काय घेतला?

  • पंतप्रधान मोदी यांनी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरची योजना सुरु केली.
  • काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीने त्याची नवी व्याख्या बनवली.
  • काँग्रेसनं त्यातील डी पकडला. त्यांनी डायरेक्ट ऐवजी डिलर शब्द घेतला. शिवसेनेने बी चा अर्थ ब्रोकर असा घेतला आणि राष्ट्रवादीने ट्रान्सफरमध्ये कटमनी सुरु केला.
  • आम्ही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणतो हे डिलर, ब्रोकर आणि ट्रान्सफरचा बिझनेस म्हणतात.
  • मग महाराष्ट्राला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हवं की डिलर, ब्रोकर आणि ट्रांसफरमध्ये कटमनी घेणारं सरकार हवं?

 

मोदींनी इंधन तर यांनी दारू स्वस्त केली!

  • देशात इंधर दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक ताण सहन करावा लागत होता.
  • त्यावेळी पंतप्रधान मोदींनी इंधनाचे दर कमी करण्याचा निर्णय घेत त्यावरील kj कमी केला.
  • त्यावेळी मोदींनी राष्ट्राला संबोधित करताना राज्य सरकारांनीही आपला कर कमी करण्याचं आवाहन केलं.
  • भाजपशासित राज्यांनीही मोदींच्या आवाहनला प्रतिसाद देत इंधनावरील कर कमी केला.
  • पण यांना काही वेगळंच ऐकायला आलं, यांनी इंधन नाही तर दारू स्वस्त केली. दारू स्वस्त करायची नव्हती, तर पेट्रोल आणि डिझेल स्वस्त करायचं होतं.
  • आता उद्धव ठाकरे सरकारला विचारायला हवं की देशात पेट्रोल-डिझेल १५ रुपयांनी स्वस्त झालं, महाराष्ट्रात का नाही?
  • महाराष्ट्रातील जनतेला दारु नाही तर पेट्रोल आणि डिझेल स्वस्त हवं आहे, असंही शाह म्हणाले.

 

मोदी जी ने पूरे देश में टैक्स घटाकर पेट्रोल व डीजल सस्ता करने का काम किया लेकिन ये महाराष्ट्र की अघाड़ी सरकार की समझ देखिए इन्होने पेट्रोल डीजल की जगह शराब सस्ती कर दी… pic.twitter.com/pwkM0ez4ja

— Amit Shah (@AmitShah) December 19, 2021

आघाडी सरकार म्हणजे पंक्चर रिक्षा!

  • राज्यातील आघाडी सरकार म्हणजे तीन चाकांचं ऑटो रिक्षावालं सरकार आहे. या सरकारची तिन्ही चाकं पंक्चर आहेत. हे सरकार हलतही नाही आणि चालतही नाही.
  • महाराष्ट्रातील जनतेच्या घराघरात जा. हे सरकार महाराष्ट्राचं कल्याण करू शकते का? असा सवाल करा.

 

मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीसाठी शुभेच्छा, पण चांगली होती तेव्हाही कुठे बाहेर होते?

  • मुख्यमंत्र्यांची तब्येत ठिक नाही. त्यांचं आरोग्य उत्तम राहावं.
  • पण जेव्हा त्यांची तब्येत चांगली होती तेव्हाही कुठे ते बाहेर फिरत होते?
  • तेव्हाही सरकार कुठे आहे याचा जनता शोध घेत होती.
  • कोरोना काळात मोदींनी वीस वेळा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. तीन वेळा राज्यपालांशी संवाद साधला. अनेक रुग्णालयांशी संवाद साधला.

 


Tags: Amit ShahBJPcm uddhav thackerayhome minister amit shahShivsenaगृहमंत्री अमित शाहभाजपामुख्यमंत्री उद्धव ठाकरेशिवसेना
Previous Post

मनसे नेते संदिप देशपांडेंनी कर्नाटक सरकारला कानडीतूनच ठणकावलं!

Next Post

राज्यात ओमायक्रॉनचे सहा नवे रुग्ण, आजवर एकूण ५४! २८ बरे होऊन घरी! कोरोनाची रग्णसंख्याही वाढतीच, पुन्हा हजाराकडे!  

Next Post
MCR maharashtra corona report 22-11-21

राज्यात ओमायक्रॉनचे सहा नवे रुग्ण, आजवर एकूण ५४! २८ बरे होऊन घरी! कोरोनाची रग्णसंख्याही वाढतीच, पुन्हा हजाराकडे!  

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!