मुक्तपीठ टीम
छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार ब्रिटनकडून मिळावी, यासाठी राज्य सरकारडून प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा शिवाजी महाराजाच्या तिन्ही तलवारींचा मुद्दा चर्चेत आला आहे. भवानी, जगदंबा, तुळजा या महाराजांच्या ३ तलवारींचा तळपता इतिहास जाणून घेऊया…
महाराजांच्या तीन तलवारी!
- शिवाजी महाराजांकडे तीन तलवारी होत्या.
- भवानी, जगदंबा आणि तुळजा अशी त्यांची नावे होती. जगदंबा तलवार ब्रिटनच्या संग्रहालयात ठेवण्यात आली आहे.
- त्याचबरोबर भवानी आणि तुळजा तलवार या सुमारे २०० वर्षांपासून बेपत्ता आहेत.
- या तलवारींचा शोध आणि जगदंबा तलवार भारतात आणण्याचे प्रयत्न अनेक दिवसांपासून सुरू आहे.
महाराजांनी वापरलेली जगदंबा तलवार ब्रिटनच्या संग्रहालयात!
- शिवाजी महाराजांची छायाचित्रं पाहिलीत तर काही छायाचित्रात त्यांच्या हातात एक तलवार दिसते.
- ज्या तलवारीवर दहा हिरे जडले होते असा दावा केला जातो, ती तलवार जगदंबा तलवार आहे.
- ७ मार्च १६५९ ला छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार मिळाली. त्या तलवारीचे गुणधर्म (लांबीला जास्त, पातळ, अप्रतिम वार क्षमता, वजनास हलकी इ.) असलेल्या तलवारी आपल्या सैन्यामध्ये असाव्यात असे महाराजांना वाटत.
- त्यासाठी महाराजांनी चौकशी करून स्पेनमधून तलवारी मागवल्या.
- स्पेनमधून त्या तलवारी मराठा सरदार, सैनिकांची शारीरिक ठेवण लक्षात घेत खास बनवण्यात आल्या.
- महाराजांच्या केलेल्या तलवारींच्या मागणीमुळे स्पेनचा फायदा झाला.
- त्यामुळे स्पेनच्या राजाने खूशी व्यक्त करण्यासाठी हिरे, नाणे, पाचू लावलेली रत्नजडित तलवार भेट दिली.
- ती तलवार हीच जगदंबा तलवार आहे, तलवार सध्या ब्रिटनमध्ये राणीच्या पॅलेसमधील संग्रहालयात आहे.
- कोल्हापूरचे चौथे शिवाजी महाराज यांनी नोव्हेंबर १८७५ मध्ये महाराजांची ही तलवार प्रिन्स ऑफ वेल्स एडवर्ड सातवा यांना भारत भेटीदरम्यान भेट दिली होती.
- खरेतर चौथे शिवाजी महाराज हे त्यावेळी अल्पवयीन होते, पण त्यांचा दिवाण महादेव बर्वेने एवढी महत्वाची मोलाची तलवार ब्रिटनच्या प्रिन्सला देण्यास प्रवृत्त केले.
- ती तलवार ही छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली जगदंबा तलवार असल्याचे इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी सिद्ध केले आहे.
इंग्लंडमधील साऊथ केनस्टिंग गॉन म्युझियमचे संचालत सी. प्युरडॉन क्लार्क यांनी २०२१मध्ये त्या संग्रहालयातील भारतीय शस्त्रांच्या यादीत जगदंबा तलवारीची छायाचित्रासह माहिती दिली होती. - त्यानंतर ती तलवार भारतात परत आणण्याची मागणी जोर धरू लागली.
भवानी तलवार आहे तरी कुठे?
- बराच काळ जगदंबा तलवार हीच भवानी तलावर असल्याचा संभ्रम होता.
- ७ मार्च १९५९ रोजी शिवाजी महाराज कोकणात आले होते.
- तेव्हा त्यांचे शिलेदार अंबाजी सावंत यांनी स्पॅनिश जहाजावर हल्ला केला.
- येथून त्यांना पोर्तुगालचा सेनापती डायग फर्नांडिस याच्याकडून तलवार मिळाली.
- १६ मार्च १९५९ हा महाशिरात्रीचा दिवस होता.
- शिवाजी महाराज सप्तकोटेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेले होते.
- येथेच अंबाजीचा मुलगा कृष्ण याने शिवाजी महाराजांना तलवार भेट दिली, महाराजांना ती तलवार खूप आवडली.
- पण आज खरी भवानी तलवार कुठे आहे हे कोणालाच माहीत नाही.
- भवानी तलवार कशी होती, हे कुणालाच माहीत नाही.
- रियासतकारांनुसार, रायगड राजधानीच्या पाडावानंतर औरंगजेबाच्या हाती महाराजांची भवानी तलवार लागली.
- ती तलवार त्याने शाहू महाराजांना त्यांच्या विवाहप्रसंगी भेट दिली.
- जर तसं असेल तर ती भवानी तलवार सातारच्या छत्रपतींच्या घराण्याकडे असावी, अशी शक्यता आहे.
- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी १९७४मध्ये मुंबईत शिवसृष्टी प्रदर्शन भरविले होते, तेव्हा त्यांनी सातारच्या राजघराण्यातील तलवार भवानी तलवार असल्याचा दावा केला होता.
- पण ज्येष्ठ इतिहाससंशोधक ग. ह. खरे यांनी तलवार तपासून कोरीव मजकूर ‘सरकार राजा शाहू छत्रपती कदिम’ असा असल्याचं दाखवत ती भवानी तलवार नसल्याचे स्पष्ट केले.
- अनेकदा काही जण पुढे येऊन भवानी तलवार आपल्याकडे असल्याचा दावा करतात, पण पुराव्यासह तसं कुणीही सिद्ध करू शकलेलं नाही.
तुळजा तलवारही चर्चेत!
- खंडोबाचे स्थान असलेल्या पुणे जिल्ह्यातील जेजुरीला १६६२मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पिता शहाजी राजे यांची जेजुरीत भेट झाली.
- तेथून शहाजी राजे पुण्यात आले.
- या भेटीतच शहाजीराजेंनी शिवाजी महाराजांना तुळजा तलवार भेट दिली.
- शहाजी राजेंनी कर्नाटकातून खास शिवाजी महाराजांसाठी ती उत्कृष्ठ तलवार बनवून घेतली होती.
- भोसले घराण्याची कुलदेवता तुळजापूरच्या भवानीमातेवरून या तलवारीचे नाव तुळजा ठेवण्यात आले.
- सध्या ही तलवार कुठे त्याची माहिती उपलब्ध नाही.
- त्याच जेजुरीतून छत्रपती शिवाजी महाराजांना तुळजा तलवार भेट देण्यात आली.
- मात्र, त्या तलवारीची जास्त माहिती उपलब्ध नाही.