मुक्तपीठ टीम
१ मे १९६० साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती आणि हा दिवस ‘महाराष्ट्र दिन’ म्हणून साजरा केला जातोय, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पण भारतात गेल्या ९९ वर्षांपासून जागतिक कामगार दिनही याच दिवशी साजरा केला जातो. याचा इतिहासही खूप रंजक आहे. दरवर्षी १ मे हा दिवस कामगार आणि कामगारांना आदर देण्याच्या उद्देशाने त्यांना समर्पित केला जातो. कामगार दिन हा केवळ कामगारांना सन्मान देण्यासाठी नाही तर या दिवशी कामगारांच्या हक्कांसाठी आवाज उठवला जातो. जेणेकरून त्यांना समान अधिकार मिळू शकतील. चला तर मग जाणून घेऊया काय आहे कामगार दिनाचा इतिहास.
कामगार दिनाचा इतिहास
- कामगार दिनाचा इतिहास पॅरिस आणि अमेरिकेतून सुरू झाला.
- १ मे १८८६ रोजी अमेरिकेत कामगारांनी संपही पुकारला होता.
- या आंदोलनात अमेरिकेतील कामगार रस्त्यावर उतरले होते आणि त्यांनी आपल्या हक्कासाठी आवाज उठवायला सुरुवात केली होती.
- कामगारांना दिवसातून १५-१५ तास काम करावे लागत असल्याने हे आंदोलन करण्यात आले होते.
- आंदोलनादरम्यान पोलिसांनी कामगारांवर गोळीबार केला आणि अनेक कामगारांनी प्राण गमवावे लागले.
- तर १०० हून अधिक कामगार जखमी झाले.
- त्यानंतर १८८९ मध्ये पॅरिसमध्ये आंतरराष्ट्रीय मार्क्सवादी समाजवादी काँग्रेसने कामांचे तास ८ तास असावे अशी मागणी केली होती.
- या मागणीमुळे कामगार दिनाला आंतरराष्ट्रीय रुप प्राप्त झाले.
- या परिषदेतच १ मे रोजी कामगार दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.
- यासोबतच दरवर्षी १ मे रोजी सुट्टी देण्याचा निर्णयही घेण्यात आला.
- अमेरिकेत आठ तास काम करणाऱ्या कामगारांच्या नियमानंतर अनेक देशांमध्ये हा नियम लागू करण्यात आला.
भारतात सुरुवात कधी झाली?
- अमेरिकेत १ मे १८८९ रोजी कामगार दिन साजरा करण्याचा प्रस्ताव आला असला तरी.
- भारतातल्या ‘लेबर किसान पार्टी’ने १ मे १९२३ रोजी पहिल्यांदा कामगार दिन साजरा केला होता. याचवेळी भारतात पहिल्यांदाच लाल झेंडा कामगार दिनाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी वापरण्यात आला.
- कामगार नेते सिंगरवेलू चेत्तीअर यांनी कामगार दिन कार्यक्रमाच्या आयोजनात पुढाकार घेतला होता. मद्रास उच्च न्यायालयासमोरील जागेत हा दिवस साजरा झाला होता.
कामगार दिनाचा उद्देश काय?
- दरवर्षी १ मे रोजी कामगार दिन साजरा करण्याचा उद्देश कामगार आणि कामगारांच्या कामगिरीचा सन्मान करणे आणि योगदानाचे स्मरण करणे हा आहे.
- यासोबतच कामगारांच्या हक्क व हक्कासाठी आवाज उठवणे आणि शोषण थांबवणे.
- या दिवशी अनेक संस्थांमध्ये कर्मचाऱ्यांना एक दिवस सुट्टी दिली जाते.