मुक्तपीठ टीम
आज महिला कोणत्याही क्षेत्रात पाठी नाहीत, हे आपल्या सर्वानाच ठाऊक आहे. परंतु ही बातमी पाकिस्तानमधील त्यामुळे स्वाभाविकच तिचं महत्व वेगळं आहे. एका हिंदू महिलेची सनदी सेवेत सहाय्यक आयुक्तपदी निवड म्हणजे तेथे असलेल्या कट्टरपंथी कोंदटपणातील ताज्या हवेची झुळूक मानली जातेय. डॉ.सना रामचंद गुलवानी या महिलेने पाकिस्तानात इतिहास रचला आहे. त्या पाकिस्तानातील पहिल्या हिंदू महिला सनदी सेविका झाल्या आहेत. सनाने पहिल्याच प्रयत्नात सेंट्रल सुपीरियर सर्व्हिसेस परीक्षा उत्तीर्ण केली आहे. ही परीक्षा पाकिस्तानमधील सर्वात कठीण स्पर्धा परीक्षांपैकी एक मानली जाते.
सनानं नेमकं काय केलं?
- ही सेवा भारताच्या UPSC नागरी सेवा परीक्षेसारखे आहे.
- सीएसएस परीक्षा उत्तीर्ण झालेल्या २२१ उमेदवारांमध्ये गुलवानीचा समावेश होता. एकूण १८,५५३ उमेदवार परीक्षेला बसले होते.
- २७ वर्षीय सनाच्या कारकीर्दीची सुरुवात वेगळी होती.
- ती वैद्यकीय शाखेची विद्यार्थीनी आहे.
- तिने शहीद मोहतारमा बेनझीर भुट्टो मेडिकल युनिव्हर्सिटीमधून २०१६ मध्ये बॅचलर ऑफ मेडिसिन, बॅचलर ऑफ सर्जरी या पदवीसह पदवी प्राप्त केली.
- सना रामचंद्र यांनी युरोलॉजिस्ट म्हणून अभ्यास केला.
- नंतर फेडरल पब्लिक सर्व्हिस कमिशनमध्ये नोंदणी केली.
सना रामचंद्र म्हणाली की, “प्रशिक्षणाच्या वेळी माझी शिकारपूर जिल्ह्यातील एका रुग्णालयात महिला वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. ग्रामीण सिंधमध्ये सार्वजनिक वैद्यकीय सेवेची स्थिती अत्यंत वाईट आहे. मी दररोज अनेक रुग्णांना भेटायची. परंतु त्यांच्यासाठी सर्व औषधे उपलब्ध नव्हती आणि भरती करण्याची क्षमता देखील कमी होती. टेटनस, रेबीज विरोधी इंजेक्शन आणि मूलभूत आपत्कालीन औषधांचाही तुटवडा होता.
उपायुक्तांना पाहून या क्षेत्रात करिअरची प्रेरणा
- २०१९ मध्ये शिकारपूरच्या उपायुक्तांनी हॉस्पिटलला भेट दिली.
- ते अधिकारी सर्वांचा आदर करतात. ते काम करण्यास आणि रुग्णालयातील कमतरता भरून काढण्यासाठी तयार आहेत.
- त्यांना पाहून सनाने नागरी सेवेत करिअर करण्याचा आणि समाजात बदल घडवण्याचा निर्णय घेतला.
मनीषा रोपेटा यांची सिंध पोलिसात उपअधीक्षक
- त्याच वेळी, या वर्षी, सिंधमधील मनीषा रोपेटा या हिंदू महिलेनेही इतिहास रचला.
- मनीषा यांची पाकिस्तान पोलीस उपअधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- २६ वर्षीय मनीषाला डॉक्टर व्हायचे होते. पण नंतर पोलीस अधिकारी बनण्याचा निर्णय घेतला.