Saturday, June 7, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“नंदूरबारमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी खासगी संस्थेला रेमडेसिवीर दिल्याचा आरोप”

April 28, 2021
in घडलं-बिघडलं
0
hina gavit

मुक्तपीठ टीम

नंदूरबार जिल्ह्यातील गरीब आदिवासी कोरोना रुग्णांवर उपचारांसाठी सीएसआर फंडातून सरकारला मोफत मिळालेली एक हजार रेमडेसिवीर इंजेक्शन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या खासगी संस्थेला विक्रीसाठी दिली, असा खळबळजनक आरोप भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. हीना गावित यांनी बुधवारी ऑनलाईन पत्रकार परिषदेत केला.

 

यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आणि माध्यमप्रमुख विश्वास पाठक उपस्थित होते.

 

डॉ. हीना गावित म्हणाल्या की, नंदूरबारच्या नगराध्यक्ष रत्ना चंद्रकांत रघुवंशी ज्या काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या आहेत, त्यांनी ६ एप्रिल २०२१ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून रोटरी वेलनेस सेंटर या खासगी संस्थेसाठी एक हजार रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी केली. रोटरी वेलनेस सेंटर ही संस्था शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्याशी संबंधित आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी पत्र मिळाल्याच्या दिवशीच ६ एप्रिल रोजीच रोटरी वेलनेस सेंटर अँड मेडिसीन यांना शासकीय दरात एक हजार रेमडेसिविर उपलब्ध करून द्यावेत असा लेखी आदेश नंदूरबारच्या जिल्हा शल्य चिकित्सकांना दिला. विशेष म्हणजे अशी इंजेक्शन मिळण्यासाठी रोटरी वेलनेसकडून नंदूरबारच्या जिल्हा रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकाऱ्यांना पाच लाख ९४ हजार ५०० रुपयांचा चेक ६ एप्रिल रोजीच मिळाल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात नमूद केले.

डॉ. हीना गावित म्हणाल्या की, सीएसआर फंडातून नंदूरबारच्या गरीब रुग्णांना उपचारासाठी मोफत मिळालेल्या ४,००० रेमडेसिवीर इंजेक्शनपैकी एक हजार इंजेक्शन जिल्ह्याधिकाऱ्यांनी एका खासगी संस्थेला विक्रीसाठी देणे नियमबाह्य आहे. या इंजेक्शनची विक्री करता येणार नाही, असे स्पष्ट असताना जिल्हाधिकाऱ्यांनी पाच लाख ९४ हजारांचा धनादेश स्वीकारून संस्थेला विक्रीसाठी दिली, हे सुद्धा चुकीचे आहे. शिवसेनेच्या नेत्याशी संबंधित खासगी संस्थेला लाभ पोहोचविण्यासाठी काँग्रेसच्या नगराध्यक्षांच्या विनंतीवरून जिल्हाधिकाऱ्यांनी हे कृत्य केले आहे. नगराध्यक्षांचे विनंती पत्र आले, त्याच दिवशी संबंधित संस्थेकडून जिल्हा रुग्णालयाकडे धनादेश जमा झाला व आणि त्याच दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी खासगी संस्थेला रेमडेसिविर देण्याचा आदेश दिला ही तत्परताही संशयास्पद आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी आपण करत आहोत.

 

त्यांनी सांगितले की, नंदूरबार जिल्ह्यात कोरोनाची साथ मोठ्या प्रमाणावर आहे. अनेक रुग्णांची नोंद होत नाही. ज्यांची नोंद होते अशा रुग्णांनी रुग्णालये भरलेली आहेत. रेमडेसिवीरचा तुटवडा आहे. अशा स्थितीत जिल्हाधिकाऱ्यांनी खासगी संस्थेला एक हजार रेमडेसिवीर देणे धक्कादायक आहे.

 


Tags: BJP keshav upadhyehina gavitnandurbar stateShivsenaडॉ. राजेंद्र भारूडडॉ. हीना गावितमाधव भांडारीविश्वास पाठक
Previous Post

आज राज्यात ६३ हजार नवे कोरोना रुग्ण, ६१ हजार बरे! विदर्भात सर्वाधिक नवे रुग्ण!

Next Post

माणुसकी अनलिमिटेड…पत्नीचे दागिने विकून गरजूंना ऑक्सिजन

Next Post
pascal

माणुसकी अनलिमिटेड...पत्नीचे दागिने विकून गरजूंना ऑक्सिजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!