Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“हिजाब असो की बिकिनी, काय घालायचं तो महिलांचा अधिकार!” – प्रियंका गांधी

February 9, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
HijabROW

मुक्तपीठ टीम

मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब घालून वर्गात बसण्यापासून रोखण्यात आल्याने कर्नाटकात महाविद्यालये आणि शाळांबाहेर हिजाब समर्थक आणि हिजाब विरोधक गटांकडून निदर्शने करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रियंका गांधी यांनी हे वक्तव्य केले आहे. प्रियंका गांधी म्हणाल्या की, बिकिनी असो वा हिजाब किंवा जीन्स असो, तो महिलांचा अधिकार आहे. हा अधिकार भारतीय राज्यघटनेने त्यांना दिलेला आहे. महिलांवरील अत्याचार थांबवा.यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेससाठी दिलेल्या ‘लडकी हूं लड़ सक्ती हूं’ घोषणेचा हॅशटॅगमध्ये उल्लेख केला आहे.

 

हिजाब वादामागे काँग्रेसचा हात, भाजपाचा आरोप

  • दरम्यान, हिजाबच्या वादामागे काँग्रेसचा हात असल्याचे भाजपाने म्हटले आहे.
  • कर्नाटक भाजपाने ट्विट केले की, हिजाब वादामागे काँग्रेसचा हात असल्याचे आम्ही म्हणत आहोत.
  • उच्च न्यायालयात हिजाबच्या बाजूने युक्तिवाद करणारे वकील काँग्रेसच्या कायदेशीर सेलचे प्रतिनिधी आहेत.
  • काँग्रेस या दिशेने काम करत आहे हे सांगण्यासाठी दुसरे उदाहरण हवे का?
  • भाजपाच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना वकील देवदत्त कामत म्हणाले, “मी सुदैवाने स्वतंत्र देशात राहतो.
  • एक वकील या नात्याने, मला निर्देशित केलेल्या कोणत्याही विषयावर मी हजर राहून युक्तिवाद करतो.
  • कोणताही तृतीय पक्ष किंवा कोणताही राजकीय पक्ष माझ्या निवडीवर शंका घेऊ शकत नाही!

 

हिजाबचा मुद्दा जानेवारीपासून होता चर्चेत

  • हिजाबचा हा मुद्दा कर्नाटकात जानेवारीमध्ये सुरू झाला होता.
  • जानेवारीमध्ये उडुपी येथील सरकारी पीयू कॉलेजमध्ये ६ मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब घालून वर्गात बसण्यापासून रोखण्यात आले होते.
  • महाविद्यालयाने गणवेश धोरणाचे कारण सांगितले, त्यानंतर विद्यार्थिनींनी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि असा युक्तिवाद केला की त्यांना हिजाब घालण्याची परवानगी न देणे हे घटनेच्या कलम १४ आणि २५ अंतर्गत मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे.
  • राज्य सरकारने तीन दिवस शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
  • याशिवाय सरकारने सर्व पक्षांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

Tags: BJPHijabkarnatakapriyanka gandhiकर्नाटककाँग्रेसप्रियंका गांधीभाजपाहिजाब
Previous Post

रायगड जिल्ह्यातील दरड कोसळलेल्या गावांच्या कायम पुनर्वसनाकरिता निधी मंजूर – विजय वडेट्टीवार

Next Post

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडून सागरी सुरक्षेचा आढावा

Next Post
गृहमंत्र्यांनी घेतला सागरी सुरक्षेचा आढावा 1

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडून सागरी सुरक्षेचा आढावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!