मुक्तपीठ टीम
शाळा-महाविद्यालयात हिजाब घालायचे की नाही? यावर सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने हिजाब प्रकरणात विभाजित निर्णय दिला आणि पुढील निर्देशांसाठी हे प्रकरण मुख्य न्यायाधीशांकडे पाठवले आहे. न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांनी याचिका फेटाळून लावली, तर न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांचा निर्णय बंदीच्या विरोधात आहे. त्यामुळे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या मोठ्या खंडपीठाकडे पाठवले आहे.
कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय योग्य की अयोग्य?
- हिजाब प्रकरणावर सुनावणी करताना कर्नाटक उच्च न्यायालयाने ‘हिजाब हा इस्लाम धर्मातील अनिवार्य धार्मिक प्रथेचा भाग नाही’ असे म्हटले होते.
- यानंतर उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले.
- कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय योग्य की अयोग्य यावर अनेक याचिकांवर निर्णय घ्यायचा आहे.
- या प्रकरणी न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठाने यापूर्वी निर्णय राखून ठेवला होता.
प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या मोठ्या खंडपीठाकडे
- हिजाब बंदी प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे.
- खंडपीठाने या प्रकरणावरील युक्तिवाद १० दिवस ऐकून घेतल्यानंतर २२ सप्टेंबर रोजी निर्णय राखून ठेवला होता.
- कर्नाटक उच्च न्यायालयाने राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील हिजाबवरील बंदी उठवण्यास नकार दिला होता.
- या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.
- आज यावर निर्णय येणार होता.
- आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या मोठ्या खंडपीठाकडे गेले आहे.