मुक्तपीठ टीम
मुंबई म्हटलं की जागेची समस्या आलीच. त्यातही अनेकदा अनेक मेट्रोसारखे विकास प्रकल्प राबवताना इमारतींच्या गर्दीतून अंग चोरत वाट काढावी लागते. त्याचा फटका बसतो तो शेजारच्या इमारतींमधील रहिवाशांना. मेट्रोच्या वेगामुळे घरांनी हादरे बसत असल्याच्या तक्रारी सुरु होतात. त्यामुळे मुंबईतील नव्या मेट्रो मार्गासाठी जपानहून आयात केलेले खास रेल्वे ट्रॅक वापरले जात आहेत. त्यामुळे या मार्गाशेजारील इमारतींना हादरे बसणार नाहीत.
मुंबईतील भूमिगत मेट्रोच्या मार्गांवर आता जपानी रेल्वे ट्रॅक टाकण्याचे काम सुरू झाले आहे. जगातील सर्वात आधुनिक रेल्वे ट्रॅक खास जपानमधून मागवण्यात आला आहे. जवळजवळ ३३.५ किमी लांबीच्या मेट्रो-३ कॉरिडोरचे ट्रॅक वेल्डिंगचे काम ३८ टक्के पूर्ण झाले आहे. कुलाबा-वांद्रे-सिप्झ दरम्यान बांधलेला कॉरिडोर शेकडो हेरिटेज इमारतींतून जात आहे. या कारणास्तव, बांधकाम प्रक्रियेदरम्यान तसेच ट्रॅकची निवड करताना विशेष खबरदारी घेतली जात आहे.
मुंबईच्या मेट्रोसाठी जपानहून रेल्वे ट्रॅक
१. जमिनीपासून सुमारे २० ते २५ मीटर अंतरावर मेट्रो धावणार आहे.
२. लगतच्या इमारतींवर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी जपानकडून आधुनिक ट्रॅक घेण्यात आले आहेत.
३. हे ट्रॅक देशातील अन्य रेल्वे ट्रॅकपेक्षा २० ते २२ व्हीडीबी कमी हादरतात.
४. दोन्ही दिशेसह ३३.५ किमी मार्गासाठी एकूण ६६.०७ किलोमीटर ट्रॅक ठेवला जाणार आहे.
५. मार्चपासून कॉरिडॉरच्या मार्गावर ट्रॅक टाकण्याचे काम सुरू झाले.
६. आतापर्यंत सुमारे अडीच किलोमीटरपर्यंत ट्रॅक टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे.
८. जपानमधून समुद्रमार्गे ट्रॅक मुंबईला आले आहेत.