मुक्तपीठ टीम
इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या मागणीमुळे त्याच्या चार्जिंग स्टेशनची मागणीही वाढली आहे. अनेक मोठ्या कंपन्या चार्जिंग स्टेशन्स उभारत आहेत. हिरो इलेक्ट्रिकही पुढील एका वर्षात देशात ५०,००० चार्जिंग स्टेशन्स उभारणार आहेत त्यासाठी हिरोने बोल्ट या इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग नेटवर्कशी भागीदारी केली आहे.
देशभरातील ७५० ठिकाणी चार्जर्स!
- बोल्ट हे इलेक्ट्रिक वाहन चार्जिंगचे प्रमुख नेटवर्क आहे.
- हिरो इलेक्ट्रिकने स्पष्ट केले की, या भागीदारी अंतर्गत, भारतभरातील ७५० हून अधिक हिरो इलेक्ट्रिक टच पॉइंट्सवर बोल्ट चार्जर बसवले जातील.
- याचा फायदा साडेचार लाखांहून अधिक ग्राहकांना होणार आहे.
- सुमारे २,००० हिरो इलेक्ट्रिक ड्रायव्हर्सना त्यांच्या घरी बोल्ट चार्जिंग युनिट्स मोफत मिळू शकतील.
फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनने जाहीर केलेल्या आर्थिक वर्ष २०२१-२२च्या आकडेवारीनुसार, हिरो इलेक्ट्रिकने २९टक्के मार्केट शेअरसह देशात पहिले स्थान पटकावले आहे, तर २१ टक्के मार्केट शेअरसह ओकिनावा दुसऱ्या, ११ टक्क्यांसह अँपिअर तिसऱ्या, एथर एनर्जी ९ टक्क्यांसह चौथ्या आणि प्युअर ७ टक्क्यांसह पाचव्या स्थानावर आहे.
हिरो इलेक्ट्रिकचे सीईओ सोहिंदर गिल यांच्या निवेदनानुसार, “आमचे ध्येय कार्बन-मुक्त मोबिलिटीला प्रोत्साहन देणे आणि निर्बाध ईव्ही प्रवासाचा अनुभव देण्यासाठी एक मजबूत चार्जिंग नेटवर्क तयार करणे हे आहे. ते म्हणाले की या टायअपमुळे लाखो हिरो इलेक्ट्रिक ग्राहकांचा प्रवास सुकर होईल.
पाहा व्हिडीओ: