Wednesday, May 14, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

एन. डी. सरांची एक आठवण आणि त्यांच्या बोलण्यातील मिश्किल, भेदक भाष्य

January 17, 2022
in featured, घडलं-बिघडलं, व्हा अभिव्यक्त!
0
Heramb Kulkarni tribute to late ND Patil

हेरंब कुलकर्णी

एकदा एन डी पाटील सर आमच्या गावात आले. लेखनामुळे मला ओळखत होते. गप्पा मारल्या. त्यांनी थेट विचारले तू कुठे नोकरी करतोस ? मी शाळेचे संस्थेचे नाव सांगितले.तेव्हा तू माझ्या रयत शिक्षण संस्थेमध्ये ये तिथे मी तुला प्रकल्प प्रमुख करतो. वेगवेगळे उपक्रम संपूर्ण संस्थेसाठी राबव असे ते म्हणाले. मी थोडी टाळाटाळ केली. सर काहीच बोलले नाहीत त्यावेळी मोबाईल नव्हते. आठ दिवसानंतर सरांनी माझा त्यावेळचा लँडलाईन घरचा नंबर मिळवला. मी नोकरीला नगरला होतो.रात्री माझ्या वडिलांना त्यांनी फोन केला व तुम्ही मुलाला का सोडत नाही, त्याला सोडा अशी विनंती केली. वडिलांनी मला हे नंतर सांगितल्यानंतर आम्ही थक्कच झालो. ज्या शिक्षण संस्थेत हजारो शिक्षक प्राध्यापक होते तिथे एक शिक्षक आपल्या संस्थेला मिळावा म्हणून इतका पाठपुरावा करत होते. मी नाही म्हणालो तर वडील अडवतात का ? म्हणून वडिलांना फोन करणे ही या माणसाची शिक्षणविषयक तळमळ होती.

 

एका संस्थेतून दुसऱ्या संस्थेत जाणे व तिथे ही केवळ शिक्षक म्हणून न राहता वेगळी जबाबदारी घेणे यामध्ये कायदेशीर तांत्रिक अनेक अडचणी होत्या. तो विषय पुढे गेला नाही पण सरांचे प्रेम कायम राहिले. पेपरमध्ये येणाऱ्या माझ्या राजकीय कविता त्यांना आवडायच्या. वात्रटिका न म्हणता ते त्याला चिन्तनिका असे नाव त्यांनी ठेवले त्यात तुझी राजकीय समज व चिंतन मला दिसते असे ते म्हणायचे. कोल्हापूरला गेल्यावर भेट व्हायची.खूप वेळ द्यायचे.

 

ग्रामीण रुपक वापरुन ते जी उदाहरणे द्यायचे ती मोठी सुंदर असायची. वेतन आयोगाचे एकीकडे प्रचंड पगार व दुसरीकडे किमान वेतनाचे अतिशय कमी दिले जाणारे दर याबाबत एकदा मी त्यांना बोललो . कष्टकऱ्यांच्या बाबतीत सरकार इतके कठोर का ? असे विचारताच त्यावर ते हसून म्हणाले की कामाला जुंपलेल्या जनावराला मर्यादित चारा टाकला जातो की तो मेलाही नाही पाहिजे आणि काम पण केले पाहिजे.इतकीच कोणत्याही सरकारची कष्टकऱ्यांनाकडे बघण्याची भूमिका असते.. उद्या कामावर आला पाहिजे इतकी मजुरी दिली की बस..!!! सरांच्या त्या विनोदी बोलण्याला ही वेदनेची किनार असायची.

 

समाजाचे क्रीम कोणते ? याविषयी बोलताना ते म्हणायचे की मूठभर लोक शिकले; त्यांच्यातूनच समाजाचे वेगवेगळ्या क्षेत्रात नेतृत्व तयार झाले आणि त्याला बुद्धिवादी वर्ग समाजाची क्रीम म्हणतो. हे क्रीम आम्हाला मान्य नाही. असे सांगताना सर म्हणायचे “मोठ्या कढईत दूध उकळत ठेवल्यावर पातेलेभर दूध त्यातून बाजूला काढायचं, ते गॅस वर ठेवायचं आणि त्याची साय येईल त्याला क्रीम म्हणायचं ..असला खोटेपणा आम्हाला मान्य नाही. तुम्ही संपूर्ण कढईभर दूध उकळा आणि त्याची साय येईल त्याला आम्ही क्रिम म्हणू. तेव्हा समाजातील सर्व स्तरातील माणसे शिकल्यानंतर जे समाजाचे नेते बनतील. ते खऱ्या अर्थाने समाजाचे क्रीम असेल. इतकी मूलभूत दृष्टी सरांची असायची.

 

शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण या सरकारी शब्दाचीही ते खूप टिंगल करायचे. एकदा एका भाषणात ते म्हणाले “सरकारची सार्वत्रिकीकरण व्याख्या काय ? तर प्रत्येक गावात शाळा पोहोचली की झाले सार्वत्रिकीकरण !! म्हणजे विजेचे खांब प्रत्येक गावात टाकायचे आणि पाटलाच्या घरी लाईट लागली की खेड्यापाड्यात वीज पोहोचली असं म्हणायचे….असा हा प्रकार.
झोपडीत जेव्हा दिवा लागेल, ते विजेचे सार्वत्रिकीकरण आणि प्रत्येक घरातला पोरगा पदवीधर होईल तेव्हा ते शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण अशा सुंदर भाषेत सर बोलत राहायचे.

 

शेवटी भेटलो तेव्हा ते म्हणाले की समाज नेहमी सोप्या उत्तरांना भुलतो आणि प्रत्यक्ष व्यवस्थेशी टक्कर घेणे त्याला नको असते. हे सांगताना त्यांनी एक गोष्ट सांगितली . ते म्हणाले “एकदा एक वेडा पोलीस आयुक्तांकडे गेला आणि म्हणाला मला तातडीने संरक्षण द्या कारण रेल्वे कंपन्यांचे मालक माझा खून करणार आहेत. आयुक्त म्हणाले का ? तो म्हणाला “मी असा शोध लावला आहे की कदाचित रेल्वेची दुकानदारी मोडीत पडेल. आयुक्त म्हणाले” कसे काय?” तो म्हणाला “मी वीज आणि कोळसा न वापरता रेल्वे कशी चालवता येईल ? याचा शोध लावला आहे. त्यांची उत्सुकता वाढली. त्यांनी विचारले कसे काय ? तो म्हणाला “एक मोठा चुंबक रुळावर रेल्वे पासून समोर एक किलोमीटरवर ठेवायचा आणि चुंबकाच्या अलीकडे मोठा लाकडी ठोकळा ठेवायचा. लाकडी ठोकळा काढला की रेल्वे जोराने लोहचुंबकाकडे ओढली जाईल. आयुक्त म्हणाले “इथपर्यंत समजलं ,पण तिथून पुढे रेल्वे कशी पुढे सरकेल ? तो म्हणाला “रेल्वे इतक्या जोरात येईल की त्या धक्क्याने चुंबक परत पुढे एक किलोमीटर ढकलले जाईल आणि रेल्वे पुन्हा पुढे सरकेल….!!!

 

ही गोष्ट सांगताना सर हसायचे आणि आम्हीही खूप हसलो आणि नंतर सर त्यांचा खास पॉज घेऊन म्हणाले “अशी सोपी उत्तरे देणारे जादूगार प्रत्येक समाजाला हवे असतात. त्यांचा राजकीय फायदा नक्कीच होतो परंतु समाज बदलाची प्रक्रिया ही दीर्घकाळ असते त्याची उत्तरे इतकी सोपी असत नाहीत…

 

गंभीर प्रश्नावर लढताना तुम्हीही खूप गंभीर असले पाहिजे असा समज सरांकडे पाहून मोडीत निघायचा अतिशय मिस्कील शैलीत ते बोलत राहायचे प्रत्येक वाक्य सूत्ररूप असायचे..

 

याच शेवटच्या भेटीत सरांशी बोलताना रयत शिक्षण संस्थेच्या एकूणच वाटचालीबाबत काहीसे मतभेद असावेत असे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होते. ते इतकेच म्हणाले” रयतने मेडिकल कॉलेज काढावे असे सल्ले मला दिले जातात पण रयतचा जन्म त्यासाठी नाही. मेडिकल कॉलेज काढायला शिक्षण सम्राट गावोगावी पडले आहेत. आमचा जन्म खेड्यापाड्यातील लेकरांना शिक्षण देण्यासाठी झाला आहे आणि तेच त्याचे उत्तरदायित्व आहे… आणि तेच मी करत राहणार …..”
कर्मवीर भाऊराव पाटलांना केलेल्या कृती मागचे तत्वज्ञान सरांच्या शब्दाशब्दातून पाझरत असायचे…

 

माझे ‘दारिद्र्याची शोधयात्रा’ पुस्तक सरांना कौतुकाने पाठवले. तेव्हा सर आजारी होते.बोलणे फार समजत नव्हते.तरीही त्यांनी फोन केला आणि भरभरून बराच वेळ बोलत होते पण ते बोलणे फारसे समजत नव्हते मला जाणवले की सरांशी हे बहुदा आपले शेवटचे बोलणे असणार आहे….

 

महाराष्ट्रातील सर्वच जन आंदोलनांचे वकीलपत्र त्यांनी घेतलेले असायचे. नर्मदा जनआंदोलनापासून अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यापासून उल्का महाजन यांच्यासोबतच्या सेझच्यालढ्यापासून आझाद मैदानातील सर्वच आंदोलनांनी भूमिका ते सरकारला ऐकवाययचे.. कितीतरी आंदोलनांच्या मागण्या त्यांनी सरकारकडून मान्य करून घेतल्या असतील त्याची गणती नाही.

 

सर गेल्यानंतर जाणवते की मंत्रालयात गेल्यानंतर सगळे मंत्री उठून उभे राहतील असे आता कोणाला सोबत घेऊन जायचे ? अशी नावे दिवसेंदिवस खूप खूप कमी होत आहेत. प्रश्न गंभीर होत आहेत आणि चळवळींचे पाठीराखे मात्र निघून जात आहेत..
ही वेदना सरांच्या जाण्याने अधिक गहिरी झाली…

 

Heramb Kulkarni Author Education Expert

(हेरंब कुलकर्णी हे शिक्षण, सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ अभ्यासक आणि कार्यकर्ते आहेत. कोरोना काळात अनाथ झालेली मुलं, वैधव्य आलेल्या महिलांसाठीही ते कोरोना एकल पुनर्वसन समितीचे राज्य निमंत्रक म्हणून सातत्यानं कार्यरत आहेत.)


Tags: Heramb KulkarniKolhapurMaharashtraND Patilएन. डी.पाटीलकोल्हापूरहेरंब कुलकर्णी
Previous Post

राज्यात ३१ हजार १११ नवे रुग्ण, तर २९ हजारावर बरे! वाचा कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या महानगरात किती…

Next Post

भारतीय लष्करालाही स्वदेशी ‘भाभा कवच’, वजनानं हलकं, पण सुरक्षेत मजबूत!

Next Post
Bhabha kavach -17-1-22

भारतीय लष्करालाही स्वदेशी 'भाभा कवच', वजनानं हलकं, पण सुरक्षेत मजबूत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!