मुक्तपीठ टीम
राज्यात मुंबईसह अनेक भागांत पावसाने रौद्ररुप घेतलं आहे. बुधवार रात्रीपासून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडत असून अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. कोल्हापुरात पंचगंगा नदी इशारा पातळी ओलांडण्याची भीती आहे तर दुसरीकडे चिपळूणमध्ये २००५ ची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त होत आहे. काही ठिकाणी पावसामुळे दरडी कोसळत आहेत. याचा थेट परिणाम रेल्वे वाहतूकीवर झाला असून वाहतुककोडींची परिस्थिती निर्माण झाली आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी पुढील दोन दिवस खबरदारीचे आहेत.
रत्नागिरी-
- रत्नागिरी-अतिवृष्टी मुळे बावनदीला पुर आला आहे.
- काजळी नदीही दुथडी भरुन वाहत आहे.
- दुकानं, घरं पाण्याने भरली आहेत.
- खेड शहरात मोठया प्रमाणावर पावसाचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
- खेर्डी येथील महावितरणचे ३ कर्मचारी उपविभागीय विद्युत कार्यालयात पाणी शिरल्याने अडकून पडले आहेत.
- भोर- वरंधा मार्गावर पाणी शिरल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.
- धामणी येथे पुराचे पाणी घुसल्याने लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.
- रत्नागिरी ते सोमेश्वर – लोणदे – चिचखरीला जाणारा मार्ग बंद आहे.
- चिपळूण शहरातील वशिष्ठी आणि शिव नदीला पूर आला आहे.
- चिपळूणमध्ये बाजारपेठ पाण्याखाली गेली आहे.
- शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी शिरले असून मुंबई-गोवा महामार्ग, कराड रोड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
- तर शहरातील ब्रिटिशकालीन बहादूर शेख पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
- अनेक घरांमध्ये छपरापर्यंत पाणी आल्याने शेकडो लोक पाण्यात अडकले आहेत.
- एनडीआरएफ आणि कोस्ट गार्डची टीम थोड्याच वेळात चिपळूणात दाखल होणार
- कोस्ट गार्डचा हॅलिकॅाप्टरच्या सहाय्याने लोकांना रेस्क्यू करणार
रायगड-
- कर्जत तालुक्यातील उमरोली येथे दरड कोसळली.
- महाडमध्ये कंबरेपेक्षा जास्त पाणी साचलंय.
- सावित्री नदीने धोकापातळी ओलांडली आहे.
- मुंबई गोवा हायवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय.
- तटरक्षक दलाची 2 पथके महाडकडे रवाना.
- कोलाड येथील महेश सानप यांचे बचाव पथकही रवाना.
- महाड शेतशिवाऱ्यामंध्ये पाणी गेल्यानं भात शेतीचं नुकसान होण्याची भीती आहे.
- पाली येथील अंबा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.
- बाजीरे धरणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
- पोलादपूर शहरात जुना महाबळेश्वर रस्त्यावर पाणी आले आहे
- रायगडात नेरळ कळंब मार्गावर पाणी आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
कोल्हापूर
- कोल्हापूरातील पावसात वेग वाढ असून पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
- चगंगा नदीची पाणीपातळी ३६ फुटांवर पोहोचली आहे.
- अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
- शहरातील सखल भागात पाणी साचलं आहे.
- खानविलकर पेट्रोल पंप परिसरातील रस्त्यावर एक ते दीड फूट पाणी
- एनडीआरएफची दोन पथकं कोल्हापूरच्या दिशेने रवाना
- कोल्हापूर शहरासाठी एक तर शिरोळ साठी एक टीम रवाना
- कोल्हापूर जिल्ह्यातील सकल भागात पुराच पाणी
- कोल्हापूर गगनबावडा मार्गावर पुराचं पाणी आलं असून कोल्हापूर गगनबावडा मार्गावरची वाहतूक बंद करण्यात आली आहे.
- तसंच मांडुकली येथं कुंभी नदीचं दोन फूट पाणी रस्त्यावर आलं आहे.
- शाहुवाडी तालुक्यातील गेळवडे धरणातील पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.
- कासारी नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे.
- गडहिंग्लज तालुक्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे.
- नीलजी आणि ऐनापूर हे दोन बंधाऱ्यावर पाणी आल्यानं वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेत.
- कोल्हापूर शहरातील अनेक उपनगरात पाणी शिरले
- रामानंद परिसरातील २०० नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
- मनपाच्या आपत्ती दलाकडून रेस्क्यू ऑपरेशन ला सुरुवात झाली आहे.
सिंधुदुर्ग-
- जिल्ह्यात सकाळपासून पावसाची संततधार सुरु असून जिल्ह्यात पुढील ५ दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
- कुडाळ मधील माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीला पूर आला आहे.
- आंबेरी पुलावर पुराचे पाणी आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे
- अनेक भागात विद्युतपुरवठा खंडित झाला आहे.
- २७ गावांचा तालूक्याशी संपर्क तुटला आहे.
- कणकवली तालुक्यातील फोंडाघाट एस्टी स्टँडमध्ये पाणी शिरलं.
- करूळ आणि भुईबावडा घाट मार्गावरची वाहतूक बंद आहे.
- कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक फोंडाघाट मार्गे वळविण्यात आली होती.
विरार,वसई-
- अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे.
- वसई तालुक्यातील १० ते १२ गावांना तानसा नदीच्या पुराचा विळखा पडला आहे.
- तानसा धरण ओव्हर फ्लो झाल्याने मध्यरात्रीच्या सुमारास नदीला पूर आला आहे.
- अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे.
- वसईतील सनसिटी-गास रस्ता ४ दिवसापासून पाण्याखाली गेला आहे.
- वसईतील सनसिटी-गास रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले आहे.
विदर्भ-
- विदर्भातंही मुसळाधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
- हवामान विभागाने पुढील दोन दिवस विदर्भात ॲारेंज अलर्ट जारी केला आहे.
- विदर्भातील गडचीरोली आणि चंद्रपुर या दोन जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
- चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या सुमारे ४२ टक्के एवढा पाऊस पडला आहे.
- गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्याने धरणाचे दोन दरवाजे उघडून ५०० क्युमेक्स एवढा जल विसर्ग नदी प्रवाहात सोडला जाणार आहे.
- पुढच्या काही तासात वैनगंगा नदीकाठच्या गावांना व शेतीला प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
- जिल्ह्यातील लाल नाला सिंचन प्रकल्प ७५ टक्के भरला असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे.
- अमरावती जिल्ह्यातील लहान मोठ्या नद्या सध्या दुथडी भरून वाहत आहेत.
- मेळघाटातील अनेक पुलावरून पाणी वाहत आहे.
- जिल्हा मुख्यालयापासून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
- वाशिम जिल्ह्यात मुसळधार पाऊस चालू आहे.
- काटेपूर्णा नदीला पूर आल्याने कुत्तर डोह या गावाचा संपर्क दोन दिवसापासून तुटलेला आहे.
- अकोला जिल्हातल्या बाळापूर तालुक्यात जोरदार पाऊस झाला आहे.
- व्याळा ते रिधोरा दरम्यान ढगफुटी सदृश स्थीती निर्माण झाली आहे.
- व्याळा गावात अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे.
- रिधोरा परीसरात मोठ्या मुसळधार पाऊस पडत आहे.
- रिधोऱ्यातही अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे.
- राष्ट्रीय महामार्गावर वाहतूककोंडीची परिस्थिती निर्माण झाली आहे.
सांगली-
- सांगलीच्या शिराळा येथील मांगले कांदे पूल पाण्याखाली गेला आहे.
- यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे.
- कृष्णा नदीची पाणी पातळी १९ फुटावर गेली आहे.
- कृष्णा नदीवरील सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
- तर वारणा नदीवरील दोन पूल पाण्याखाली आले आहेत.
सातारा-
- साताऱ्यातील संगममाहुली येथील कैलास स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे.
- अंत्यसंस्काराचे १४ अग्निकुंड पाण्याखाली गेले आहे.
- मृत कोरोनाबधितांवर अंत्यसंस्कार करण्याची समस्या निर्माण झाली आहे.
- महाबळेश्वर जवळच्या चतुरबेट येथील कोयना नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने या भागातील १२ गावांचा संपर्क तुटला आहे.
- मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि पुण्यातील घाट माथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
पुणे-
- पुण्यात येत्या काही तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
- रात्री शहरात झाला संततधार पाऊस पडला.
- धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे.
संगमेश्वर तालुका
- निवधेतील फुट ब्रिज वाहून गेला
- कासारकोळवण मधील साकव वाहून गेला आहे यामुळे आता देवरुख – मार्लेश्वर मार्गावरून या गावात जाण्याचा मार्गच बंद झाला आहे.
भिवंडी
- भिवंडी शहर व ग्रामीण भागातील अनेक भागात सखल भागात पाणी साचले आहे.
- हजारों घरात पाणी शिरलं आहे.
- घरातील संपूर्ण वस्तू व रेशन गहू तांदूळ व जीवनाश्यक वस्तू या पाण्यात भिजल्याने नागरिकांचे नुकसान झाले आहे.
कल्याण डोंबिवली-
- कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील फळे, फुले व भाजीपाला आवार पाण्यात गेलं आहे.
- कल्याण खाडीचे पाणी बाजार आवारात घुसले आहे.
- मुसळधार पावसामुळे कल्याण पश्चिमेकडील वालधुनी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे.
परभणी-
- परभणी जिल्ह्यात पुन्हा एकदा अतिवृष्टी झाली आहे.
- सर्वत्र पाणीच पाणी झाले असुन गोदावरी,दुधना नद्या तुडुंब भरून वाहत आहेत
- करपरा नदीला पूर आला आहे.
- परभणी-जिंतुर महामार्ग बंद पडला आहे.
- वाहतूक बंद झाल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
- परभणी-पाथरी राष्ट्रीय महामार्ग ही बंद आहे.
नाशिक-
- धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची जोरदार हजेरी लावली आहे.
- २४ तासांत गंगापूर धरण क्षेत्रात २३४ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.