Sunday, May 18, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

राज्याला आजही मुसळधार पावसानं झोडलं, अनेक ठिकाणी पूरस्थिती

September 29, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
heavy rainfall

मुक्तपीठ टीम

गुलाब चक्रीवादळाचा धोका राज्यातील अनेक जिल्ह्यांना हवामान खात्यानं दिला होता. सोमवार पासून मराठवाडा, औरंगाबादसह राज्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबई, पालघर ठाण्यात काही ठिकाणी पाणी भरलं आहे. मराठवाड्यात तर प्रचंड नुकसान झालं आहे. यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. शेतकऱ्यांचं यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

 

मुंबई

  • सुरु असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे.
  • वाहनधारकांना आणि सामान्यांना त्यातून वाट काढत जावं लागत आहे.
  • पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्यामूळे पाऊस लांबण्याची चिन्ह आहेत.
  • त्यामुळे मुंबईसह राज्यात पुढील ३ दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती.
  • त्यानुसार बुधवार सकाळपासूनचं मुंबईसह उपनगरात अधूनमधून मुसळधार पाऊस कोसळत आहे.
  • कुर्ला परिसरात मागील पाऊण तासांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे.
  • हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यांना येलो अलर्ट जाहीर केला आहे.
  • या पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेने देखील आपल्या सर्व विभागांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.
  • मुंबई-पुणे-नाशिक रोड जंक्शनवरच्या खारेगाव टोल नाक्यावर मोठ्या प्रमणात वाहतूक कोंडी झाली आहे.

 

कोकण

पालघर

  • गुलाब चक्रिवादळाच्या पार्श्वभूमीवर पालघरमध्ये अति मुसळधार पाऊस पडत आहे.
  • त्यामुळे नागरिकांना कारणाशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
  • तसेच पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हेल्पलाईन जारी केली आहे.

ठाणे

  • ठाण्यात अति मुसळधार पाऊस पडत आहे.
  • मंगळवार पासून ठाण्यात देखील पावसाने जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केली आहे.
  • सकाळपासूनच ढगाळ वातावरण झाले असून सखोल भागात पाणी देखील साचायला सुरवात झाली आहे.
  • त्यामुळे हवामान खात्याकडून आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे.
  • विना कारण बाहेर पडणाऱ्यासाठी शक्यतो घरीच राहण्याच्या सूचना जारी केल्या आहेत.
  • तसेच खाडी आणि समुद्र किनाऱ्यावरील ठिकाणी देखील न जाण्याचे आव्हान देखील केले आहे.

 

उत्तर महाराष्ट्र-

नाशिक-

  • गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे.
  • मालेगावमध्ये तब्बल ३ हजार हेक्टरवले पीक आडवे झाल्याने शेतकऱ्यांना जबर फटका बसला आहे.
  • तालुक्यातील बोलठाणसह इतर गावांचा पाण्यामुळे संपर्क तुटला आहे.
  • बुधवारी दुपारी १२ वाजेपर्यंत गंगापूर धरणातून १५,००० क्यूसेक पेक्षा अधिक विसर्ग करण्याची शक्यता आहे.
  • त्यामुळे नदी लगतच्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे.
  • आजही अतिवृष्टीचा इशारा विचारात घेता नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
  • पालखेड ,दारणासह सर्वच धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे.
  • लासलगाव, येवला नांदगाव या भागात ही जोरदार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं असून काही नागरिकांच्या घरात दुकानात देखील
  • पाणी शिरल्याच्या घटना घडल्यात, घोटी, इगतपुरी, सुरगाणा या तालुक्यात ही पावसाची जोर असल्यानं जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना सतर्क करण्यात आलं आहे.

जळगाव

  • जळगावमध्ये पावसाने कहर केला आहे.
  • त्यामुळे वाघूरचे धरणाचे २० दरवाजे उघडण्यात आले आहेत.
  • जिल्ह्यात अजूनही अतिवृष्टीची शक्यता आहे.
  • त्यामुळे नदीकाठच्या लोकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
  • धुळे येथून राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे ३५ जणांचे पथक शहरात आले आहे.
  • त्यातील दहा जणांचे पथक बोटीसह पाचोऱ्याला मदतीसाठी गेले आहे.
  • जळगाव जिल्ह्यातल्या वावदडा येथे पुलाचे काम सुरू आहे.
  • त्यामुळे या मार्गावर पर्यायी पूल उभारण्यात आला होता.
  • मात्र, हा पूल वाहून गेला आहे.
  • त्यामुळे येथील वाहतूक बंद पडली आहे. म्हसावदकडे जाणाऱ्या कुळकुळे येथे पुलावरून पाणी गेल्याने वाहतूक बंद पडलीआहे.

नंदुरबार

  • मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र मध्ये सुरू आसलेल्या मुसळधार पावसामुळं तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने हतनूर
  • सारंगखेडा प्रकाशा या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
  • तापी नदीवरील गुजरात राज्यातील सर्वात मोठा असलेसा उकाई धरणातून १८९५१३ क्युरेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

 

मराठवाडा

बीड

  • बीडमध्ये पावसामुळे अनेक ठिकाणी पूल वाहून गेले आहेत.
  • बीड जिल्ह्यातील अनेक खेड्यांचा संपर्क तुटलेलाच आहे.
  • यामुळे दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे.
  • माजलगाव तालुक्यातील गुजरवाडी येथील पूल वाहून गेला आहे.
  • रस्सीच्या सहाय्याने दुधाच्या कॅडची ने-आण करावी लागत आहे.

परभणी

  • परभणी जिल्ह्यात कापूस आणि सोयाबीनच्या शेतात गुडघाभर पाणी साचले आहे.
  • परभणी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
  • जिल्ह्यात यंदा १ लाख ७५ हजार हेक्‍टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले.
  • मंगळवारी पडलेल्या पावसामुळे परभणी जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर आला आहे.
  • परभणीच्या इंद्रायणी नदी काठच्या वडगाव सुक्रे येथील शेतीमध्ये गुडघ्यावर पाणी साचलंय.

नांदेड

  • जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गुलाबी वादळाचा मोठा फटका बसला आहे.
  • हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली.
  • नांदेड जिल्ह्यात सर्वत्र अतिमूसळधार पाऊस झाला आहे.
  • अतिवृष्टीमुळे अनेक छोट्या-मोठ्या नद्यांना महापूर आला आहे.
  • नांदेड जिल्ह्यात अतिमुसळधार पावसानं खरीप पिकासह बागायती पिकांचेही नुकसान झाले आहे.
  • नदीकाठच्या शेतजमीनी खरडून गेल्या आहेत.
  • तर सोयाबीन, कापूस खरीप पिकासह हळद, केळी, ऊस बागायती पिकांनाही मोठा फटका बसला आहे.
  • सततच्या होणाऱ्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकरी पूर्णपणे हवालदील झाला आहे.
  • जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीनांदेड जिल्ह्यात रात्रीपासून सर्वदूर अतिवृष्टी झाली आहे.

लातूर

  • मांजरा नदीच्या पाण्यात पोहरेगाव येथील तीन जण अडकले होते.
  • प्रशासनाला याची माहिती मिळाली.
  • अडकलेल्या तिघांना एनडीआरएफच्या टीमने जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली आज हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढले.

औरंगाबाद

  • मराठवाड्यात पावसाचं थैमान पाहायला मिळत आहे.
  • ७०० पेक्षा अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.
  • मराठवाड्यातील १० धरणांतून २ लाख ६५ हजार क्यूकेस एवढा विसर्ग सोडण्यात आला आहे.
  • औरंगाबाद जिल्ह्यातील गोंदेगाव, पोहरी बु. निंभोरा येथील २० घरांची पडझड झाली.
  • सोयगाव तालुक्यातील जरंडी तलाव ओव्हरफ्लो झाला आहे.
  • सिल्लोड तालुक्यात पूर्णा नदीला पूर आल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला.
  • वीजेचे खांब कोसळून विद्युत पुरवठाही खंडित झाला.
  • मुसळधार पावसामुळे २०० विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा देऊ शकले नाही.
  • या विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा परीक्षा होणार आहे.
  • ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही त्या विद्यार्थ्यांनी सीईटी सेलकडे मेल करावा, अशा विद्यार्थ्यांची परीक्षा लवकरच घेतली जाईल

 

विदर्भ

यवतमाळ

  • उमरखेडमधील गाळात फसलेली बस बाहेर काढली. चालक अजूनही बेपत्ता आहे.

Tags: AurangabadMarathwadaऔरंगाबादगुलाब चक्रीवादळमराठवाडामुंबई
Previous Post

वीर भगतसिंह स्मृती सन्मान ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ देशमुख यांना!

Next Post

“या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम” करणारे काव्यजिप्सी मंगेश पाडगावकर

Next Post
Chalitale Tower -14

"या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम" करणारे काव्यजिप्सी मंगेश पाडगावकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!