मुक्तपीठ टीम
भांडुप जलशुद्धीकरण संकुल परिसरात मुसळधार पावसाचे पाणी शिरल्याने जलशुद्धीकरण केंद्रातील गाळणी आणि उदंचन संयंत्रे बंद करावी लागली. या कारणाने मुंबई महानगर क्षेत्रात बहुतांश भागांमध्ये आज (दिनांक १८ जुलै २०२१) होणारा पाणीपुरवठा बाधित झाला आहे. दरम्यान, संकुलातील जलशुद्धीकरण यंत्रणा सुरू करून मुंबईचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. पाणीपुरवठा झाल्यानंतर मुंबईकर नागरिकांनी पाणी उकळून प्यावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
मुंबई महानगर क्षेत्रात काल रात्रीपासून ठिकठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला आहे. भांडुप परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे, भांडुप जलशुद्धीकरण संकुलातील गाळणी आणि उदंचन संयंत्रामध्ये पावसाचे पाणी शिरले. या कारणाने तांत्रिक समस्या उद्भवली. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून विद्युत पुरवठा देखील खंडित करावा लागला. भांडुप संकुलातील या समस्येमुळे मुंबई महानगर क्षेत्रात बहुतांश परिसराला आज होणारा पाणीपुरवठा बाधित झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने शहर आणि पश्चिम उपनगरात पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही. पूर्व उपनगरांमध्ये देखील अंशतः पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे.
भांडुप जलशुद्धीकरण संकुल परिसरात मुसळधार पावसाचे पाणी शिरल्याने जलशुद्धीकरण केंद्रातील गाळणी आणि उदंचन संयंत्रे बंद करावी लागली. या कारणाने मुंबई महानगर क्षेत्रात बहुतांश भागांमध्ये आज (दिनांक १८ जुलै २०२१) होणारा पाणीपुरवठा बाधित झाला आहे.
(१/२)
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 18, 2021
भांडुप जलशुद्धीकरण संकुलात शिरलेले पावसाचे पाणी तातडीने उपसून गाळणी (filtration) व उदंचन (pumping) यंत्रणा परिसरामध्ये स्वच्छता करण्यात येत आहे. संबंधित संयंत्राची पाहणी करून आवश्यक ती दुरुस्ती केली जात आहे. आवश्यक ती सर्व तांत्रिक कार्यवाही करून पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी उपायुक्त श्री. अजय राठोर यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचारी भांडुप संकुलात उपस्थित आहेत.
संकुलातील पेयजल उदंचन यंत्रणा काही तासातच पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे. मात्र गाळणी यंत्रणा पूर्ववत होण्यासाठी जास्त कालावधी लागू शकतो. त्यामुळे पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर मुंबईकर नागरिकांनी पाणी उकळून नंतर प्यावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
पाणीपुरवठा बाधित होऊन झालेल्या गैरसोयीबद्दल महानगरपालिका प्रशासन दिलगिरी व्यक्त करत आहे. मुंबईकर नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात येत आहे.
Due to the inundation of rain water in the Bhandup Water Purification Complex, the Filtration and Pumping plants at the complex had to be shut down as a precautionary measure. Due to this, water supply in most of the parts of Mumbai has been disrupted today (July 18, 2021)
(1/2)
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 18, 2021
नगरसेवक राजू पेडणेकरांचे जनतेला आवाहन –
नगरसेवक राजू श्रीपाद पेडणेकर यांनी ते उपविभागप्रमुख असणाऱ्या वर्सोवा मतदारसंखातील प्रभागांमध्ये स्थानिक रहिवाशांना पाण्याचा वापर करताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे पाणी शुद्धीकरण प्रकल्पात समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे महापालिकेची यंत्रणा ती समस्या दूर करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. तरीही मुंबईकर म्हणूण आपण साथ देऊया. पिण्याचे पाणी थेट न वापरता उकळूनच वापरा, असे आवाहन त्यांंनी केले आहे.