मुक्तपीठ टीम
शनिवारपासून मुंबईसह राज्यातील विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे. सोमवारी अनेक सखल भागात पाणी साचलं. काही ठिकाणी दरड पडून घरांची पडझड पाहायला मिळाली. लोकल रेल्वे सेवा आणि एक्स्प्रेस गाड्यांनाही याचा फटका बसला. मुंबईतील जनजीवन पुन्हा विस्कळीत झालं आहे.
संपूर्ण कोकणात आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात पुढील पाच दिवस रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.मुंबईसह चार ते पाच जिल्ह्यांना हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे.
मुंबई
- मुंबई उपनगरातील बोरवली, कांदिवली तसेच मलाड भागांमध्ये मुसळधार पाऊस
- या पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
- मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
नद्यांना पूर
• मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून वाहणाऱ्या दहिसर नदीला पूर आला आहे.
• पुरामुळे ही नदी ओसंडून वाहत असल्याने सभोताली पूर परिस्थिती आहे.
• राष्ट्रीय उद्यानामधील वस्ती आणि कार्यालयातही पाणी शिरलं आहे.
• पावसाचा जोर असाच सुरु राहिला तर प्रशासनाला परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवावं लागेल.
• पण पाऊस थांबला तर पाण्याची पातळी कमी होण्यास मदत होईल.
• मुंबईतील दुसरी महत्त्वाची मानली जाणारी पोयसर नदीच्याही पाणी पातळीत वाढ झाली आहे.
• मिठी नदीच्या पाणीपातळीतही वाढ झाल्याने सभोताली धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.
मुंब्रा-कळवा
• मुंब्रा-कळवा दरम्यान धीम्या मार्गावरील लोकल सेवा तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या आहेत.
• मुसळधार पाऊस आणि कळवा स्टेशन रुळावर पाणी साचल्याने धीम्या मार्गावरील रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली आहे.
• मुंब्रा शीळ फाटा ते पनवेल-हायवे वाहतुकीसाठी बंद
बदलापूर
• बदलापूर परिसरात गेल्या २४ तासांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला मोठा पूर आला आहे.
• त्यामुळे बदलापूरच्या उल्हास नदीकिनाऱ्यावर असलेली चौपाटी पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे.
अंबरनाथ
- अंबरनाथ तालुक्यातील कोंडेश्वर धबधब्यानं देखील भीषण रौद्ररूप धारण केलं आहे.
- कोंडेश्वरच्या या धबधब्याला अतिशय मोठा प्रवाह सुरु झालाय.
- कोंडेश्वरच्या धबधब्याहून निघून भोज धरणामार्गे वाहणाऱ्या नदीला मोठा पूर आला आहे.
भिवंडी
• मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागात घरांमध्ये पाणी शिरल्याने अतोनात नुकसान झाले आहे.
• भिवंडीतील ग्रामीण भागात दापोडे गावात गोदामांचे बांधकाम करताना नैसर्गिक नाले बुजविले गेल्याने गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले.
• अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने कुटुंबियांचे घरातील सर्व फर्निचर पाण्याखाली गेले आहे .
• तर भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावरून भिवंडीकडे येणाऱ्या मार्गात हरिहर कंपाऊंड येथे गुडघाभर पाणी साचल्याने येथे वाहतूक कोंडी होऊन अनेक वाहने पाण्यात बंद पडल्याने ढकलत बाहेर काढावी लागत होती.
कल्याण-डोंबिवली परिसर
• कल्याण-डोंबिवलीत जोरदार पाऊस
• डोंबिवलीत अनेक सखल भागात पाणी साचलं आहे.
• कल्याण परिसरात काही रस्त्यांवर पाणी साचले दिसून आलं
• पाणी साचल्यामुळे डोंबिवली नांदीवली परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.
रायगड
• रायगड जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे
• पाताळगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
• नदीच्या पाण्याने इशारा पातळी ओलांडली.
• सध्याची पाणी पातळी २०.३० मीटर.
• बाणगंगा नदीने ईशारा पातळी ओलांडली आहे.
• मुरुड तालुक्यातील राजपुरी येथे दरड कोसळून काही घरांचे नुकसान झाले आहे.
• अलिबाग ते रामराज मार्गे रोहा रस्ता खचला.
• सहाण येथे हा मार्ग खचला असुन या रस्त्याचा काही भाग वाहतुकीसाठी बदं केला आहे.
• खोपोलीतील लौजी या रहिवाशी भागात पाणी साचले आहे.
रत्नागिरी
• चिपळूण, गुहागर, खेड परिसरात कालपासून पाऊस पडतोय
• मुसळधार पावसामुळे जगबुडी नदी इशार पातळीवर वाहत आहे.
• चिपळूण मधील शिवनदी व वाशिष्टी नदीच्या पाणी पातळीत वाढ
• नागरिकांनी सतर्क राहण्याचे प्रशासनचे आव्हान.
• खेड दापोली मुख्य महामार्गावर पुराचे पाणी आल्याने मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
• रत्नागिरी कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटात दरड कोसळली आहे.
नवी मुंबई
• नवी मुंबई परिसरात जोरदार पाऊस पडत आहे
• अनेक ठिकाणी पाणी साचले आहे
• ऐरोलीमध्ये पाणी साचल्याने चालकांना आपली गाडी पाण्यातून काढावी लागत आहे
• जोरदार पाऊस पडत असल्याने वेगळ्या मार्गाचा वापर करावा लागत आहे.
• नवी मुंबई तुर्भे पोलीस ठाण्यात पाणी शिरले आहे.
• मुसळधार पावसामुळे खारघर सेक्टर ५ येथील धबधब्यावर पाणी वाढल्याने पर्यटक धबधब्यावर अडकले होते.
• खारघर अग्निशमन जवानांनी जवळपास ११५ पर्यटकांना सुखरुप बाहेर काढले
कसारा घाट
• अती मुसळधार पावसामुळे कसारा घाटात दगड रुळावर पडले आहेत. उत्तर पूर्व घाटात एक लाईन बंद पडली आहे.
• रेल्वे मार्गावरही अडथळा निर्माण झाला आहे.
कोकण रेल्वेलाही फटका
• कोकण रेल्वेच्या मार्गावर दरड कोसळली.
• पहाटे ४ वाजल्यापासून कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली आहे.