मुक्तपीठ टीम
देशातील इतर राज्यांसह महाराष्ट्रात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली आहे.ओमायक्रॉनचा संसर्ग महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रातील ओमायक्रॉन बाधितांची संख्या ५७८ वर पोहोचली आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र सरकारही सतर्क झाले आहे. महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी अधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात जर तिसऱ्या लाटेदरम्यान ८० लाख कोरोनाची प्रकरणे आढळली आणि जरी एक टक्के मृत्यूचा अंदाज लावला तरी आपण ८० हजार मृत्यूची नोंद होऊ शकते, अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे. तसेच टीव्ही, सोशल मीडियावर विसंबून ओमायक्रॉन आणि तिसऱ्या लाटेला सौम्य आणि कमी घातक असल्याचे समजू नका. ज्या लोकांचे लसीकरण झाले नाही, त्यांच्यासाठी तितकाच तो घातक असल्याचे ते म्हणाले.
काय म्हणाले डॉ. प्रदीप व्यास?
- डॉ. व्यास यांनी लिहिले आहे की, ‘राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येबद्दल तुम्हा सर्वांना माहिती आहे.
- सध्याच्या ट्रेंडच्या आधारे ज्या प्रकारे नवीन प्रकरणे वाढत आहेत.
- त्यानुसार जानेवारी २०२२ च्या तिसऱ्या आठवड्यात सुमारे २ लाख सक्रिय रुग्ण असतील अशी शक्यता आहे.
- यापैकी रुग्णालयात दाखल झालेल्यांसाठी आणि संसर्ग टाळण्यासाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत.
आताही डेल्टा व्हेरिएंटचाच जास्त संसर्ग!
- “मी तुम्हाला विनंती करतो की सोशल मीडिया/प्रिंट/इलेक्ट्रॉनिक मीडिया रिपोर्ट्सवर विसंबून असे मानू नका की, ओमायक्रॉन एक सौम्य प्रकार आहे.
- आपण तर्कशुद्ध आणि वैज्ञानिकदृष्ट्या विचार केला पाहिजे.
- मात्र, आत्तापर्यंतच्या जीनोम सिक्वेन्सिंगच्या परिणामांवरून असे दिसून आले आहे की सध्या संसर्ग झालेल्या ७०% लोकांमध्ये डेल्टा व्हेरिएंट मिळाला आहे.
- हा आकडा जिल्ह्यानुसार बदलतो.
कोरोनाची सध्याची लाट ही लस न घेणाऱ्यांसाठी अत्यंत धोकादायक!
- डॉ व्यास यांनी लिहिले, ‘अमेरिका, युरोप आणि दक्षिण आफ्रिकेतील कोरोना प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होण्याच्या तुलनेत भारतातील रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे.
- यावर शास्त्रज्ञांची वेगवेगळी मते आहेत.
- काहींनी याचे श्रेय ओमायक्रॉनला दिले, तर काहींनी राज्यात केलेल्या लसीकरणाला.
- अभ्यास दर्शविते की, कोरोनाची सध्याची लाट ही लस न घेणाऱ्यांसाठी अत्यंत धोकादायक आहे.
- हे लक्षात घेण्यासारखे आहे की सध्या, अमेरिकेत बहुतेक मुलांना संसर्ग होत आहे आणि त्यांना रुग्णालयात दाखल केले जात आहे.
- सध्याच्या लाटेमध्ये, लसीकरण न केलेल्या लोकांना जास्त धोका आहे.
८० हजार मृत्यू नोंद होऊ शकते!
- लसीकरणात सुधारणा करा आणि जीव वाचवा
- त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले, ‘तिसर्या लाटेत कोरोना बाधितांची संख्या खूप वाढणार आहे.
- जर तिसऱ्या लाटेदरम्यान ८० लाख कोरोनाची प्रकरणे आढळली आणि जरी एक टक्के मृत्यूचा अंदाज लावला तरी आपण ८० हजार मृत्यू नोंद होऊ शकते.
- त्यामुळे कोरोना किंवा ओमायक्रॉनची तिसरी लाट घातक नाही असे समजू नका.
- ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले नाहीत त्यांच्यासाठी हे धोकादायक आहे, त्यामुळे लसीकरण कव्हरेज सुधारा आणि जीव वाचवा.