मुक्तपीठ टीम
कोरोना संकट काळात ऑनलाइन पद्धतीने अनेक वैद्यकीय महाविद्यालयांना घाईघाईत परवानगी देण्यात आली होती. त्यातील अनेक वैद्यकीय महाविद्यालयांनी नियमांचा भंग केल्याच्या तक्रारी आल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अशा १२ खासगी वैद्यकीय महाविद्यालयांची अचानक तपासणी करण्यात आली आहे. या १२ खासगी महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्रासह ५ राज्यांतील खासगी वैद्यकिय महाविद्यालयांचा समावेश आहे. एक खासगी वैद्यकीय महाविद्यालय योग्य आणि नियमांचे पालन न केल्याच्या तक्रारींवरून बंद करण्यात आले आहे, तर ११ संस्थांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.
मंत्रालयाकडून कारणे दाखवा नोटीस
- केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडे आलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेण्यात आली.
- केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने तीन ते सहा डॉक्टरांची टीम तयार केली.
- तपासणीदरम्यान वैद्यकीय महाविद्यालय चालविण्यासाठी आवश्यक रुग्णांची कमी संख्या, कागदावर दाखविण्यात आलेल्या प्राध्यापकांची संख्या आणि संरचनात्मक त्रुटी अशा अनेक त्रुटी आढळून आल्या.
- या संस्था वैद्यकीय शिक्षणासाठी किमान मानक आवश्यकता पूर्ण करू शकल्या नाहीत.
- त्यामुळे यातील एक बंद करण्यात आले आहे.
- उर्वरित वैद्यकीय महाविद्यालयांना मंत्रालयाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
- तपासणीत आढळलेल्या त्रुटी आणि तक्रारींबाबत महाविद्यालयांविरुद्ध पुढील कारवाईचा निर्णय राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (NMC) घेईल.
संपूर्ण तपासणीवर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे लक्ष!
- या संपूर्ण प्रकरणाची अचानक तपासणी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी वैयक्तिकरित्या केली होती.
- अचानक तपासणीची गुप्तता पाळली जावी आणि वैद्यकीय महाविद्यालयांची विहित प्रोटोकॉलनुसार तपासणी व्हावी यासाठी आरोग्यमंत्र्यांनी महापालिका आणि मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक कोअर टीम तयार केली होती.
- एवढेच नव्हे तर तपास पथकातील सदस्यांनाही संबंधित महाविद्यालयाची पूर्व माहिती दिली नाही, त्याउलट माहिती मिळाल्याच्या दिवशी अचानक तपासणी करण्यास सांगण्यात आले.
- मंत्रालय वैद्यकीय शिक्षणेच्या गुणवत्तेशी तडजोडीबाबत वैद्यकीय शिक्षणाच्या गुणवत्तेशी तडजोड करण्यासाठी शून्य सहनशीलता धोरणावर काम करत आहे.