मुक्तपीठ टीम
राज्याच्या आरोग्य विभागात तातडीने १६ हजार पदांची भरती केली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. क आणि ड वर्गातल्या १२,००० तर अ आणि ब वर्गातील प्रत्येकी २ हजार कर्मचाऱ्याची भरती केली जाणार आहे. भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी तातडीनं आदेश जारी करण्यात येतील, असे राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. एकीकडे वैद्यकिय सुविधांचा तुटवडा निर्माण असताना आरोग्य कर्मचाऱ्यांचीही कमतरता भासत आहेत, तसेच तिसरी लाटेला वेळीच रोखण्यासाठी तयारी करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून रिकाम्या जागा भरण्याची मागणी करण्यात आली होती. त्या मागणीला मान्यता मिळाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. यासाठीचा आदेश लवकरच जारी करण्यात येईल.
आरोग्य भरतीत कोणत्या विभागात किती पदे?
- अ वर्ग – २०००
- ब वर्ग – २०००
- क आणि ड वर्ग – १२ हजार