मुक्तपीठ टीम
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहीहंडीचे आयोजन करून सामान्यांचे आरोग्य धोक्यात घालण्याची राजकीय चूक अनेकांनी केली. पण ठाण्यात मात्र तसं करण्याऐवजी त्याच पैशातून आरोग्याच्या महायज्ञाचे आयोजन करण्यात आले. डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व टेम्बी नाका मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याहस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
या आरोग्य शिबिरात नेत्ररोग, ऍन्जिओग्राफी, एन्जोप्लास्टी, हृदयरोग, मूत्रविकार, किडनी, विकार, ईसीजी, मधुमेह, स्त्रियांचे आजार, बालरोग, हर्निया, अपेंडिक्स, आतड्यांचे विकार, कान-नाक-घसा, मणक्याचे आजार, या सर्व आजारावर मोफत तपासणी व मोफत औषध वाटप तसेच मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप करण्यात आले.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत काम करणाऱ्या सर्व डॉक्टर्स नर्सिंगस्टाफ यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते ट्रॉफी व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले तसेच ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे यांच्या हस्ते लसीकरण स्टाफ, होरायझन हॉस्पिटल,इशा नेत्रालय, कायझेन हॉस्पिटल मधील डॉक्टर्स व स्टाफ यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी आमदार रविंद्र फाटक, ठाणे महानगरपालिकेचे महापौर नरेश म्हस्के, उपमहापौर सौ.पल्लवी कदम, महिला आघाडी मीनाक्षी शिंदे, ठाणे महानगरपालिका परिवहन सभापती विलास जोशी, नगरसेवक सुधीर कोकाटे उपस्थित होते.