मुक्तपीठ टीम
कर्नाटकातील राजकारणात हिंदी भाषा नेहमीच वादात राहिली आहे. हिंदी भाषेच्या विरोधात मोर्चेही काढले जातात. हिंदीचा विरोध अजूनही शांत होताना दिसत नाही. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना पत्र लिहिले आहे की, मुख्यमंत्री बोम्मई यांनी करदात्यांच्या पैशाचा वापर करून हिंदी दिवस साजरा करू नये.’हिंदी दिवस’ साजरा केला गेला तर तो कन्नड लोकांचा अपमान असेल.
एचडी कुमारस्वामी म्हणाले की, जर कर्नाटकात ‘हिंदी दिवस’ साजरा केला गेला तर तो कन्नड लोकांचा अपमान असेल. पत्रात पुढे लिहिले आहे की, मुख्यमंत्री बोम्मई यांनी करदात्यांच्या पैशाचा वापर करून हिंदी दिवस साजरा करू नये. १४ सप्टेंबरला जबरदस्तीने हिंदी दिवस साजरा करणे हा कर्नाटकातील जनतेवर अन्याय होईल, असे ते म्हणाले.
करदात्यांच्या पैशाने हिंदी दिवस साजरा करू नका!!
- एचडी कुमारस्वामी यांनी सरकारला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कर्नाटकात १४ सप्टेंबर रोजी केंद्र सरकारने प्रायोजित केलेला हिंदी दिवस कार्यक्रम जबरदस्तीने साजरा करणे, हा राज्य सरकारचा कन्नड भाषेवर अन्याय आहे.
- मी आग्रह करतो की असे कोणतेही कारण नाही जेणेकरून कर्नाटक सरकारने करदात्यांच्या पैशाचा वापर करून हिंदी दिवस साजरा करावा.