मुक्तपीठ टीम
मधुमेह हा असा आजार आहे की, तो एकदा कोणाला जडला की पुन्हा आयुष्यभर पाठलाग सोडत नाही. मधुमेह रुग्णांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने अनेक आजारांचा धोकाही वाढतो. मधुमेहामध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण खूप वाढू लागते. रक्तातील ग्लुकोज हा शरीरातील ऊर्जेचा मुख्य स्त्रोत आहे, जो आपल्याला सेवन केलेल्या अन्नातून मिळतो. मधुमेहाच्या रुग्णांसाठी आहारात काही पदार्थांचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. शेंगदाणे हे ही असाच एक पदार्थ आहे ज्याच्या सेवनामुळे शरीरात ऊर्जा राहते. मधुमेह असलेल्या रूग्णांनी शेंगदाणे तर खावेत परंतु, ते प्रमाणात खावेत.
हिवाळ्यात शेंगदाणे खाणे हे शरीरास फायदेशीर ठरते. प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, फॅट आणि फायबर भरपूर प्रमाणात असलेले शेंगदाणे शरीराला ऊर्जा देतात आणि प्रतिकारशक्ती मजबूत करतात. शेंगदाण्यात पोटॅशियम, तांबे, कॅल्शियम, मॅंगनीज आणि लोह असते ज्यामुळे पचनास मदत होते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी शेंगदाण्याचे सेवन खूप फायदेशीर आहे.
शेंगदाणे खाल्ल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो?
- शेंगदाणे हे असेच एक अन्न आहे ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स १४ आहे जो खूप कमी आहे.
- शेंगदाण्याचा ग्लायसेमिक इंडेक्स सफरचंदापेक्षा कमी आहे, त्यामुळे मधुमेही रुग्ण शेंगदाण्याचे सेवन करू शकतात.
- शेंगदाण्यामध्ये प्रथिने जास्त असतात आणि कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण कमी असते.
- शेंगदाण्यामध्ये चरबीचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे मधुमेही रुग्णांनी ते जास्त प्रमाणात खाणेही टाळावे.
- १०० ग्रॅम शेंगदाण्यामध्ये ५९० कॅलरीज असतात. मधुमेहाचे रुग्ण मर्यादित प्रमाणात शेंगदाणे खाऊ शकतात.
शेंगदाणा खाण्यासोबतच पीनट बटरही खाता येते. जे लोक सकाळी शेंगदाणे खातात, त्यांच्या रक्तातील साखर सामान्य राहते. जर उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या पदार्थांसोबत शेंगदाणे खाल्ले तर इन्सुलिनची वाढ देखील कमी होते. शेंगदाणामध्ये भरपूर मॅग्नेशियम असते जे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी प्रभावी आहे.