– दिलीप नारायणराव डाळीमकर
त्या दिवशी १३-१४ वर्षाचा मुलगा तोंडातले आले म्हणून औषधी घ्यायला आला होता.बघितले तर त्याच्या तोंडात व्रण, जीभ लाल झाली होती. त्या मुलाला विचारले की “गुटखा खातो का?”सुरवातीला घाबरून तो नाही म्हणाला.त्याला म्हटलं तू खर सांग तरच तुझा इलाज होईल.नंतर मात्र तो गुटखा खात असल्याचे कबूल केले.
त्या मुलाला सांगितले की डॉक्टर कडे जाऊन तपासणी करून घे.तो डॉक्टर कडे तपासणी करून औषधीचे प्रिप्स्क्रिशन घेऊन आला.त्याने औषधं विकत घेतल व निघून गेला.
अशाप्रकारे गुटखा इत्यादी व्यसनाची सवय लहानपणीच लागत असते.बालपणी लागलेले व्यसन आयुष्यभर तसेच कायम राहते.बरेच पालकवर्ग मुलांना खाऊसाठी पॉकेट मनी देत असतात,पॉकेट मनीचा पैसा बरेच मुलं संगत सोबतीने असा गुटखा इत्यादी व्यसनासाठी वापरतात.
हल्ली तरुण वर्षात गुटखा तंबाखू व्यसनाचे प्रमाण वाढले आहे.गुटखा एक फॅशन झाली आहे.त्याला कारण ही तसेच आहेत.चित्रपटातील हिरो होरोईन जाहीराती करत असतात.त्यांच्या आवडत्या हिरो “केशर का दम”म्हणत गुटख्याची जाहिरात करत असतो. त्या जाहिरातीवर प्रभावित होऊन तरुण गुटखा खाऊन बघतात.एकदा का सवय लागली की व्यसनाच्या आहारी जातात.
गुटखा,तंबाखू सेवनाने मानवी शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात.त्या मध्ये प्रामुख्याने कँसर म्हणजे कर्करोग होतो.यात तोंडाचा कर्करोग, ओठाचा,जबड्याचा, फुफूसाचा, घशाचा,पोटाचा,किडनी मूत्राशयाचा कर्करोग गुटखा तंबाखू सेवनाने होतो.भारतात गुटखा तंबाखू सेवनामुळे तोंडाचा कँसर होण्याची संख्या वाढत आहे.
९० टक्के तोंडाचा कॅन्सर गुटखा तंबाखू धूम्रपान ने होत आहेत.
२०१२ मध्ये महाराष्ट्र सरकारनं राज्यात गुटखाबंदी लागू केली. तेव्हापासून आजतागायत गुटखाबंदी लागू आहे.
खरचं महाराष्ट्र राज्यात गुटखाबंदी आहे???
अगदी कुठल्याही पानटपरीवर जा तुम्हाला गुटखा सहज विकत मिळतो..
गुटखाबंदी झाल्यानंतर सुरुवातीला काही काळ गुटखा उत्पादक धास्तावले होते. मात्र, गुटखा उत्पादक, विक्रेत्यांनी समांतर व्यवस्था उभी करून बेकायदा गुटखाविक्रीचे जाळे निर्माण केले. परराज्यातील गुजरात आणि कर्नाटक देशातील इतर भागातून महाराष्ट्रातील विविध भागात गुटखा विक्रीसाठी पाठविला जातो. हप्तेखोरी, पोखरलेल्या यंत्रणेमुळे गुटखा विक्री राजरोस सुरू असून महाराष्ट्रात बेकायदा गुटखा विक्रीतून हजारो कोटींची उलढाल दरमहा होत असल्याची माहिती पुढे येत आहे.
गुटखा विक्रीच्या धंद्यात बडे माफिया आहेत.या गुटखा माफिया लोकांवर काही राजकिय व्यक्तीचा वरदस्त असतो. बऱ्याच वेळा हे गुटखा माफिया सरकारी यंत्रणेचे हात ओले करत असल्याने गुटखा बंदी असूनही आजरोजी महाराष्ट्रात खुलेआम विकल्या जात आहे.
गुटखाबंदी असूनही अवैधरित्या होत असलेली गुटखा विक्री मानवी शरिरावर मोठे दुष्परिणाम करत आहेत……
शेतकरी पुत्र ; लेखक- सामाजिक राजकीय विषयावर लेखन
ग्रामीण जीवनावर आधारित कविता लेखन